Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
रविंद्र परांजपे निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण मागील लेखात दिनचर्येपासून मार्गदर्शनाचा श्रीगणेशा केला. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून केल्यास त्याचे मिळणारे फायदे देखील आपण जाणून घेतले. पूर्वापार प्रचलित असलेल्या उक्तीचे आपण पुन्हा स्मरण करूया. लवकर निजे, लवकर उठे, तयास ज्ञान, सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा लाभे. या उक्तीची सुरुवात रात्री लवकर झोपावे, अशी आहे. या लेखात आपण लवकर झोपण्याविषयी माहिती घेऊया. रात्री लवकर झोपणे दररोज रात्री वेळेवर झोपणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे रात्री 9:30 ते 10 या दरम्यान झोपी जावे. रात्री 10 वाजेपर्यंत कफाचा काळ असल्याने त्या वेळेपर्यंत झोपणे निरामय आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच हितावह असते. फार दिवसांपूर्वी मी रात्री लवकर झोपण्याविषयी…
माधवी जोशी माहुलकर आज खूप दिवसांनी हंडीतला मसूर पुलाव केला. कधी कधी घरी एकटं असलं की, माझ्या आवडी निवडीनुसार स्वयंपाक करत असते. रोजच्या रामरगाड्यातून वेळ काढावाच लागतो कधी कधी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, नाही का? मसूर पुलाव मला विशेष आवडतो. करायला सोपा आणि वन पॅाट मिल म्हणून बेस्ट आहे. साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात कृती हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी टीप्स
दीपक तांबोळी भाग -2 सरकारी नोकरीतील 39 वर्षांच्या सेवेनंतर मकरंद कापडे निवृत्त झाला. कोरोना काळातच निवृत्त झाल्याने केवळ पाच जणांच्या उपस्थितीत त्याचा निरोप समारंभ झाला. जड अंत:करणाने तो घरी आला. त्याच्या हाताखालच्या एकाही इंजीनियरने त्याची भेट घेतली नव्हती किंवा साधा फोनही केला नव्हता. इतकं सगळ्यांशी चांगलं वागूनही लोकांनी साध्या शुभेच्छा देण्याचंही सौजन्य दाखवलं नव्हतं. काय कारण असेल? असा तो विचार करत होता. “साहेब सूर्यवंशी साहेब आलेत…” मुरली म्हणाला. तशी त्याची तंद्री भंगली. त्याने दाराकडे पाहिलं, सूर्यवंशी हातात बुके घेऊन उभा होता. “या, या, सूर्यवंशी!” सूर्यवंशी चेहऱ्यावर मोठं हसू घेऊन आत आला. “सॉरी साहेब, आज आपल्या ऑफिसमधला एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे…
हिमाली मुदखेडकर पुण्यात पाषाण आणि बाणेरच्या मधे सोमेश्वर वाडी नावाचे ठिकाण आहे. इथे साधारण 900 वर्षे जुने सोमेश्वर महादेवाचे एक खूप सुंदर हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराचा परिसर भव्य असून अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले दगडी बांधकाम आहे. येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. मुळा नदीची उपनदी असणार्या राम नदीच्या काठावर हे मंदिर आहे. मंदिराला चार प्रवेश द्वार असून मुख्य प्रवेशद्वारा समोर एक भव्य चाळीस फूट उंचीची दीपमाळ आहे. दगडी कोरीवकाम असणारी एक भिंत सभोवताली असून तिच्या एका कोपर्यात एक छान गॅलरी आहे. त्या गॅलरीत मोडी लिपीतील जुनी पत्रे, चित्रे, काही खास छायाचित्रे जतन करून ठेवली आहेत. मंदिरात ठिकठिकाणी स्मरण शिळा……
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः । कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥15॥ मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें । कर्मे केलीं समस्तें । धर्नुधरा ॥82॥ परी तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतीचि पेरलीं । तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली । मोक्षहेतु ॥83॥ एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नोहे ॥84॥ किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत् ते…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 ऑक्टोबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 19 आश्विन शके 1947; तिथि : पंचमी 16.43; नक्षत्र : रोहिणी 15:19 योग : व्यतिपात 14:06; करण : गरज 27:26 सूर्य : कन्या; चंद्र : वृषभ 26:24; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:20 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस शुभ राहील. तुमच्या प्रयत्नांना सगळ्याच आघाड्यांवर यश मिळेल. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक बाबी अनुकूल असतील. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी…
लीना जोशी परुळेकर केस हा आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे. आपल्या केसांबद्दल माहिती जाणून घेण्याची आपल्याला कायम उत्सुकता असते. आपले केस कशा प्रकारचे आहेत? काय काय केले तर, आपले केस चांगले रहातील? त्यांची निगा कशी राखायची? असे प्रश्न मनात असतात. पण त्यासाठी आपण आधी केसांबद्दल थोडी basic माहिती घेऊ. आपले केस हे प्रथिनांनी बनलेले असतात, त्वचेच्या आत जो केसांचा भाग असतो, त्याला ‘केसांची मुळे’ म्हणतात. जो भाग त्वचेच्या बाहेर असतो त्याला shaft म्हणतात. त्वचेच्या बाहेर केसांचा जो भाग असतो, तो मृत (dead) असतो; म्हणूनच केस कापले, विंचरले, त्यांची काहीही स्टाईल केली तरी, आपल्याला दुखत नाही. तेच केस ओढले गेले तर,…
प्रणाली वैद्य भाग – 8 डॉक्टर देवदत्त पुढे सांगू लागले… “विश्वासच्या तोंडून चंदन नगरचं नाव ऐकलं आणि या मोहरेबाबत समजलं… माझ्या संपूर्ण अभ्यासात त्या नगरातून असं पुराणकालीन वस्तू घेऊन कोणीही जिवंत परतलेलं नाही… तुमच्याबाबत नक्कीच काहीतरी विशेष घडलंय, हे तेव्हाच माझ्या ध्यानात आलं आणि पुन्हा या विषयावर काम करायला मनाने भाग पाडलं… मला माझ्या या कामात आता तुमचे सहकार्य लागेल अन् तुम्हाला ते द्यावेच लागेल… कारण, ही मोहोर तुम्ही आणली आहे आणि ती तुम्हाला असं शांत बसूही देणार नाही… याची प्रचिती तुम्हाला येतच आहे!” डॉक्टर देवदत्त यांचं बोलणं ऐकून मुलं हैराण होऊन एकमेकांकडे पाहात होती… “घाबरू नका, तुम्हाला यात काहीच…
माधुरी साने पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचे मिश्रण. आयुर्वेदात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने पंचामृत बनवले जाते. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते तीर्थ म्हणून दिले जाते. आता आपण ढोबळी मिरचीचे पंचामृत कसे बनवले जाते, ते जाणून घेऊया. साहित्य ढोबळी मिरच्या – 2 मध्यम आकाराच्या बटाटे – 2 धणे – पाव वाटी जिरे – पाव वाटी लाल मिरच्या – 4 ते 5 सुके खोबरे किस – अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे – अर्धी वाटी भिजवलेले काजू – अर्धी वाटी दालचिनी – 1 इंच काळीमिरी – 4 ते 5 लवंग – 2 ते…
माधवी जोशी माहुलकर भाग – 2 चरायला नेलेल्या गाई-म्हशी संध्याकाळी परत घेऊन येत असताना धनगर दिनूला, बाभळीच्या झाडावर एका माणसाने गळफास घेतल्याचे पाहिले आणि दरदरून घाम फुटला. कसंबसं स्वतःला सावरत काट्याकुट्यातून धावत त्याने गावाकडे धूम ठोकली. दिनूला कशाचेच भान नव्हते. घामाने ओलेचिंब झालेला दिनू धापा टाकत, जोरजोराने ओरडतच सरळ गावच्या सरपंचांच्या घरामध्ये घुसला. सरपंचांच्या घरची मंडळी आणि गावातले काही लोक आधीपासूनच तिथे बसलेले होते… त्यांच्या गप्पाटप्पा सुरू होत्या. दिनूची आरडाओरड ऐकून सर्व उठून उभेच राहीले. दिनूला कसबसं रामा गड्याने शांत केलं आणि पाण्याचा तांब्या देत “काय झालंय ते नीट सांग…” म्हणून सांगितलं. दिनूने पाण्याचा तांब्या पहिले घटाघटा रीता करून घसा…

