Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माहेरपण

    September 26, 2026

    रक्तदाब कमी झालाय… कसे ओळखायचे?

    September 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं

    September 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, September 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माहेरपण
    ललित

    माहेरपण

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरSeptember 26, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, माधवी जोशी माहुलकर, लेखिका माधवी जोशी माहुलकर, माधवी जोशी, माधवी माहुलकर, माहेर सासर, माहेरपण, आईवडिलांची माया, नणंद भावजय नाते, माहेरपण जपणे, माहेर तुटणे, आईवडिलांच्या पश्चात माहेर, माहेरची ओढ, नणंदेशी मैत्री, भावजयीशी मैत्री,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मी दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट वाचली या विषयावर. छानच पोस्ट होती… पण आई-वडील गेले की, माहेरपण संपतं हे काही माझ्या मनाला पटेना. मान्य आहे की, आई-वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही; पण त्याचा अर्थ माहेरपण संपलं, असा नाही होऊ शकत.

    लहानपणापासून ज्या घरात आपण राहिलो, ज्या भावंडांशी खेळलो, भांडलो, एकमेकांशी घरातील सुखं-दुःख वाटून घेतली, एकमेकांच्या यश-अपयशात सहभागी झालो… ते घर, ती माणसं आई-वडील नसतील, तर एकाएकी परकी कशी होतील?

    खरं पाहिले तर, लग्न होऊन सासरी गेलेल्या सर्वच स्त्रिया आपले माहेर, माणसं सोडून परक्या घरी येऊन त्या घराला घरपण देतात. तिथल्या माणसांमध्ये दुधातील साखरेप्रमाणे मिसळून जातात, मग आई-वडील नसले तर, आपलेच घर आपल्याला परके का बरं वाटावे?

    हेही वाचा – घरघंटीची उपयुक्तता नेमकी किती?

    आपण जसे स्वतःचे घर सोडून, लग्न होऊन दुसरीकडे आलेलो असतो, त्याप्रमाणे आपली भावजयपण तिचे स्वतःचे घर, आई-वडील, भावंड सोडून तुमच्या घरची सून म्हणून आलेली असते. खरंतर, अशाच वेळी नणंद, भावजयीचे घट्ट मैत्रीचे नाते विणता आले पाहिजे. पाठच्या बहिणीवर जसे प्रेम करतो, तसे एकमेकींवर करता आले पाहिजे.

    नणंद म्हणून एकीने आपला तोरा मिरवायचा नाही, तर भावजय म्हणून दुसरीने तिला आपला रूबाब दाखवून सारखे हिणवायचे नाही… दोघींनीही एकमेकींच्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचे नाही… नणंद मग ती कोणीही असो, भावजय आली की, भावावरचा आपला हक्क कमी करायचा. लहान असो किंवा मोठी… भावांच्या संसारात लुडबूड करायची नाही. भावजयीशी मैत्रीचे असे काही घट्ट नाते विणायचे की, प्रसंगी तीच तुमचा खंबीर आधार बनली पाहिजे. भाऊ-भावजय धावत तुमच्याकडे यायला हवेत!

    खरं सांगायचं तर, खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात तुमचे नाते तुटायला आणि एकदा का हे नाते दुरावले, की ते सांधता सांधता आयुष्य निघून जातं… पण दुखावलेली मन काही जुळत नाहीत. उलट, मी तर म्हणेन की, घरातील मोठी कोणी असो, नणंद किंवा भावजय, तिने दुधावरच्या सायीसारखी माया केली पाहिजे सगळयांवर. मग मला सांगा, अशा घराचे माहेरपण कसे बरे संपेल? जो भातुकलीचा खेळ तुम्ही लहानपणी खेळला असाल, तो भातुकलीचा खेळ तुम्हाला मोठेपणी पण खेळायचा असतो… पण अंगावर जबाबदारीची चादर पांघरून!

    हेही वाचा – सुपर मार्केट अन् सुपर खरेदी!

    एकमेकींचे आई-वडील बनून सासर आणि माहेर दोन्ही घरी एकोपा टिकवून ठेवला पाहिजे. नात्यांमध्ये सहज सुंदरता आणली तर, तुमचे माहेर संपण्याचा प्रश्न येतोच कुठे? कारण, आई-वडील गेल्यावर हाच एक महत्त्वाचा दुवा असतो आणि नणंद-भावजयीचे नातेपण तितकेच मोलाचे असते. माहेरपण हवे असेल तर, काही गोष्टी तडजोडीने, तर काही गोष्टी मायेने आत्मसात करता यायला पाहिजेत.

    मनामध्ये माहेरपण संपल्याचा विचार आणायचाच कशाला?

    हक्काने माहेरी जावे… बहीण-भावंडांशी लहानपणासारखेच निरागस क्षण घालवावेत… वहिनीशी थोडी धुसफूस करावी… मस्करी करावी, जशी आईशी करतो तशीच! आणि मग तिची समजूत काढून मस्त गप्पांचे फड रंगवावेत… लहान होऊन भाच्यांच्या विश्वात हळूच डोकवावे आणि अशा अगणित आठवणी मनामध्ये साठवून आपल्या घरी परतावे, ते परत मनामध्ये आनंदाचा संचार करत आणि गुणगुणतच “असं माहेर सुरेख बाई  खेळायला मिळते….”

    माहेरपण टिकवणे, हे असे आपल्या हातात असले पाहिजे.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    शर्वाय आणि आराध्याचा झाला विवाह, पण…

    September 25, 2026 ललित

    सासूबाईंची उमावर कृपादृष्टी

    September 25, 2026 ललित

    बाप्पा आले आणि जगण्याचा अर्थ सांगून गेले!

    September 25, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शर्वाय आणि आराध्याचा झाला विवाह, पण…

    By प्रणाली वैद्यSeptember 25, 2026

    भाग – 44 शर्वाय पुढे आला, त्याने आराध्याचा हात हलकेच धरला. ते दोघे गुरुजींसमोर उभे…

    सासूबाईंची उमावर कृपादृष्टी

    September 25, 2026

    बाप्पा आले आणि जगण्याचा अर्थ सांगून गेले!

    September 25, 2026

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माहेरपण

    September 26, 2026

    रक्तदाब कमी झालाय… कसे ओळखायचे?

    September 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं

    September 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 सप्टेंबर 2026

    September 26, 2026

    शर्वाय आणि आराध्याचा झाला विवाह, पण…

    September 25, 2026

    सासूबाईंची उमावर कृपादृष्टी

    September 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 449
    • अवांतर 214
    • आरोग्य 151
    • पंचांग आणि भविष्य 599
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 947
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माहेरपण

    September 26, 2026

    रक्तदाब कमी झालाय… कसे ओळखायचे?

    September 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं

    September 26, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.