Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः । क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥12॥ मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें । मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥71॥ तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावति समस्त । परी ते कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥72॥ वाचूंनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाही सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥73॥ जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तेंवांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 18 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्थी 19:38; नक्षत्र : कृत्तिका 17:31 योग : सिद्धी 17:41; करण : बव 09:14, कौलव 30:07 सूर्य : कन्या; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:21 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:53) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस चांगला असेल. काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन उपक्रम सुरू करू…

Read More

ॲड. कृष्णा पाटील साधारणपणे दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. त्याचा फोन आला… “सर, प्रवीण बोलतोय. मी आता सुरतला आहे. माझे वडील तुमच्याकडे येणार आहेत. त्यांना कधी भेटाल सांगू?” मी म्हणालो, “उद्या सकाळी नऊ वाजता…” प्रवीणचे वडील आले. बरोबर प्रवीणचे मामा होते, ते सांगू लागले. “काल हे शेतातून घरी येत होते. सायकलवर होते. अचानक समोरून जीप आली. सायकलवर धडकली. हे खाली पडले. गुडघ्याला लागलं. ती पोरं पसार झाली. गावतलीच होती, देसायांची… रात्री आठ वाजता जेवणं झाली. घराबाहेर गलका ऐकायला आला. 10-15 जण आले होते. त्यांनी दारावर लाथा मारल्या. यांना खाली पाडून मारलं. पत्नीलाही मारलं. देसायांच्या घराण्याला धडा शिकवायचा. काय बी होऊ द्या. त्यांना…

Read More

दत्तात्रय पांडुरंग मानुगडे वेळ सकाळची होती… त्या दिवशी रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. गेला आठवडाभर अभ्यास करून कंटाळा आला होता. वर्गामध्ये खेळातून झालेली भांडणे… भांडणांमध्ये फुटलेल्या पाट्या. त्याच्यासाठी हातावर खाल्लेल्या दोन दोन छ्डया… या राहून राहून आठवत होत्या. आज रविवार म्हणून आईने गावातील घर सारवण्यासाठी बेत आखला होता. आई मला म्हणाली, “आज शाळेला सुट्टी आहे तर, माझ्याबरोबर आपल्या गावाकडच्या घराकडे चल. मी शिडीवर बसून भिंत सारवून घेते. तू फक्त सारण्याचा कपडा खालून माझ्या हातात दे. मी सारवून घेते…” “अगं आई, मला कसे जमणार?” मी म्हणालो. “तुला न जमाय काय झाले? शाळेला सुट्टी आहे म्हणून तुला काम सांगते. रानात बसून काय…

Read More

हर्षा गुप्ते भारतात अळूच्या पानांचा आणि देठांचा उपयोग लज्जतदार अन्नपदार्थांसाठी केला जातो. अळूपासून कर्नाटकाच्या दक्षिण तसेच उडुपी भागात पात्रोडे, केरळात चेंबिला करी आणि गुजरातमध्ये पात्रा असे पदार्थ बनविले जातात. तर, महाराष्ट्रात अळूवडी आणि अळूचे फतफते हे प्रकार प्रसिद्ध आहेत. अळूवडी देखील वेगवेगळ्या पद्धतीने बनविली जाते. आपण पाहूयात भरली अळूवडी. तयारी आणि कृतीचा एकूण कालावधी – सुमारे अर्धा तास पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी साहित्य अळूवडीचा कच्चा उंडा – 1 मध्यम आकाराचे बटाटे – 3 भिजवलेले शेंगदाणे – अर्धी वाटी कातलेले खोबरे – अर्धी वाटी हिंग – चिमुटभर मोहरी – 1 लहान चमचा मीठ – चवीनुसार चिली फ्लेक्स – पसंतीनुसार तेल…

Read More

सतीश बर्वे माझे ऑपरेशन एकदाचे व्यवस्थित पार पडले अन् माझ्यासकट राहुल, अभिषेक, सुमेध आणि ऋषिकेश सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. गेले कित्येक दिवस सगळेजण माझ्यासाठी खूप  धावपळ करत होते, कारण माझे घरचे असे कोणीच नव्हते इथे येण्यासारखे. ऑपेरेशनच्या आदल्या दिवशी मात्र सगळेच मनातून घाबरलेले होते. माझ्या खोलीतील वातावरण भावूक झाले होते. प्रत्येकाची समजूत काढणे मला खरोखरच कठीण गेले होते… पण माझा देवावर, डॉक्टरांवर आणि स्वतःवर विश्वास होता. मला खात्री होती यातून मी सहलीसलामत बाहेर येईन! कारण माझी इच्छाशक्ती जबरदस्त होती. माझ्यात सुधारणा झपाट्याने होत होती आणि कदाचित आठवड्यानंतर मला घरी जायची परवानगी मिळणार होती. आधी आम्ही ठरल्याप्रमाणे ऑपरेशननंतर अभिषेकने चैतन्यला अमेरिकेत…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥9॥ माझे अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥58॥ तो चालिला संगे न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ॥ 59॥ वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥10॥ एर्‍हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा केवेळीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 17 आश्विन शके 1947; तिथि : तृतीया 22:54; नक्षत्र : भरणी 20:02 योग : वज्र 21:32; करण : वणिज 12:37 सूर्य : कन्या; चंद्र : मेष 25:23; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:22 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे आनंद मिळेल. व्यावसायिकांना लहान प्रवासाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना…

Read More

प्रदीप केळुस्कर भाग – 1 मी माझ्या केबिनमध्ये बसून उद्याचा अग्रलेख लिहित होतो, यावेळी मी कुणाचाही फोन घेत नाही, पण माझ्या असिस्टंटने मला कळवले, फक्त संपादकासाठी म्हणून परदेशातून एक फोन आला आहे… मी चडफडत फोन उचलला. पलीकडून एका स्त्रीचा आवाज होता… “नमस्ते, प्रवीण बाबू बात कर रहे हैं क्या?” “हां, आप कौन और किधर से बात कर रही हैं?” “प्रवीण बाबू, मैं अमला शेख, दुबई से बात कर रही हूं…” “अच्छा, लेकिन मेरे पास आप का क्या काम है?” “प्रवीण बाबू, मैंने पता किया हैं, कि आप कोल्हापूर के सबसे मशहूर अखबार वाले हैं, मैं आप की बहन जैसी हूं…”…

Read More

माधवी जोशी माहुलकर भाग – 1 खरंतर, जीवन आणि मृत्यू या दोन घटनांवरच मनुष्य आपल्या आयुष्यातील आराखडे तयार करतो. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून वर्तमानातील सुखाचा विचार कधीच करत नाही, त्यामुळेच भौतिक गोष्टींच्या मागे लागून आपण जगण्यातला आनंद गमावतो. एखाद्याचे जगणे लक्षात राहते नाहीतर, मरणे लक्षात राहते! परंतु यामध्ये एखादी घटना जर अचंबित करणारी असेल तर, ती मात्र कायमची लक्षात राहते. त्यावरच आधारीत ही गोष्ट आहे. एक गाव होते. त्या गावातील चार-पाच सधन घर सोडली तर, इतर लोक साधारण परिस्थितीतील किंवा शेतकरी कुटुंबातील होते. त्या गावामध्ये अठरापगड जातीची लोक राहात होती. त्यामुळे गावाचा भांडणतंट्याचा निवाडा तिथल्या पंचायतीच्या सहाय्याने होत असे.…

Read More