जेव्हा रक्तदाब खूप कमी होतो, तेव्हा मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे काही महत्त्वाची लक्षणे जाणवू शकतात.
लक्षणं आणि कारणे समजून घ्या –
चक्कर येणे / डोळ्यांसमोर काळोख येणे
उभं राहताना मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे डोकं हलकं वाटणे किंवा काळोख येणे.
अशक्तपणा आणि थकवा
शरीरातील अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास थकल्यासारखे आणि अशक्तपणा वाटू शकतो.
धूसर दिसणे
काही वेळासाठी दृष्टी धूसर होऊ शकते.
मळमळ / उलटी
‘लो BP’मुळे काही व्यक्तींना मळमळ किंवा उलटी होऊ शकते.
थंड, ओलसर त्वचा
हात-पाय थंड पडणे किंवा घाम येणे जाणवू शकते.
हृदयाची धडधड वाढणे
BP कमी झाल्यावर शरीर रक्ताभिसरण टिकवून ठेवण्यासाठी हृदयाची गती वाढवू शकते.
बेशुद्ध पडणे
मेंदूपर्यंत रक्तपुरवठा खूप कमी झाल्यास व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. हे गंभीर लक्षण आहे.
हेही वाचा – शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!
कधी जास्त धोका समजायचा?
- वारंवार चक्कर येत असेल.
- चालताना तोल जात असेल.
- एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडत असेल.
- खूप अशक्तपणा जाणवत असेल.
- छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल.
अशा परिस्थितीत विलंब न करता वैद्यकीय मदत घ्या.
घरी काय काळजी घ्यावी?
- पुरेसे पाणी प्या
शरीरात पाणी कमी झाल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो.
- थोडं-थोडं खा
मोठ्या जेवणाऐवजी दिवसातून 4–5 वेळा थोडं थोडं खाणे, काही व्यक्तींना फायदेशीर ठरू शकते.
- मिठाचे प्रमाण वाढवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या
काही परिस्थितीत मीठ वाढवणे योग्य नसते.
- बेडवरून पटकन उठू नका
आधी सावकाश बसा आणि मग उभे राहा.
- खूप वेळ उपाशी राहू नका
नियमित आणि संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा – HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब
महत्त्वाचं लक्षात ठेवा!
रक्तदाब कमी होणे, हे काही वेळा साधे असू शकते; पण सतत किंवा वारंवार रक्तदाब कमी होत असेल तर त्यामागचे कारण शोधणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ –
- रक्ताची कमतरता
- डीहायड्रेशन
- हृदयाशी संबंधित समस्या
- काही औषधांचा परिणाम
- इतर वैद्यकीय कारणे
वारंवार रक्तदाब कमी होत असल्यास स्वतःहून औषध किंवा मीठाचे प्रमाण बदलू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.


