दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 नोव्हेंबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 13 कार्तिक शके 1947; तिथि : चतुर्दशी 22:36; नक्षत्र : रेवती 12:34
- योग : वज्र 15:42; करण : गरज 12:24
- सूर्य : तुळ; चंद्र : मीन 12:34; सूर्योदय : 06:39; सूर्यास्त : 18:04
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वैकुंठ चतुर्दशी
पौर्णिमा प्रारंभ रात्री 10.36
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस शुभ आणि फायदेशीर असेल. मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यवसायिकांना चांगला नफा मिळू शकेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज पाहुणे येऊ शकतात. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम होईल.
वृषभ – आजचा दिवस त्रासदायक असू शकतो. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, मात्र त्यावर सहज मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी अनुभवी लोक तुम्हाला पाठिंबा देतील. नोकरदार जातकांना इतर ठिकाणाहून चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात, ज्या तुम्ही स्वीकाराल. पदोन्नतीची देखील शक्यता आहे, ज्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण असेल.
मिथुन – आजचा दिवस संमिश्र असेल. कोणत्याही कामात घाई करणे योग्य ठरणार नाही. सारासार विवेक आणि संयमाने काम करावे लागेल. उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखावा लागेल. कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याचा असेल. पैसे उधार घेण्याचा विचार करणाऱ्यांच्या पदरी निराशा येऊ शकते.
कर्क – दिवस खूप भाग्यशाली असेल. काही अपूर्ण कामे पूर्ण केल्याचा आनंद मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कला आणि साहित्य क्षेत्रातील जातकांना मोठा सन्मान मिळू शकतो. नोकरदार जातकांना काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात काही अडथळे येत असतील तर त्यावर उपाय मिळू शकतो. अडकून पडलेले पैसे मिळू शकतात.
सिंह – दिवस चांगला जाईल. काही क्षेत्रांमध्ये लक्षणीय फायदा होईल. कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका, संयम बाळगा, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांना ते परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंद आणि शांतीने परिपूर्ण असेल.
हेही वाचा – दूरदर्शन… कृष्ण-धवल आठवणींना उजाळा!
कन्या – आज मर्यादित कार्यक्षेत्रात काम करावे लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना कामात चांगले यश मिळू शकते. मात्र कोणतेही काम करताना अधिक सावधगिरी बाळगा, जोखीम घेण्याचे टाळा. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी तर जास्तच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्तेवरून तणाव असू शकतो. एखादा लहान प्रवास करावा लागू शकतो.
तुळ – प्रत्येक कामात यश मिळेल. एखादे काम पूर्ण झाल्याने खूप आनंद होईल आणि आत्मविश्वास वाढेल. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांना नफ्याच्या संधी वाढू शकतात. नवीन करारासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला असेल. कायदेशीर वादात अडकलेल्यांना दिलासा मिळू शकेल.
वृश्चिक – आजचा दिवस शुभ राहील. प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. नवीन कामाच्या शोधात असलेल्यांना मोठे यश मिळू शकते. इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. संततीबद्दलच्या चिंता बऱ्याच प्रमाणात कमी होतील.
धनु – आजचा दिवस संमिश्र असेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना मित्राच्या मदतीने काही नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. एखाद्या शुभकार्यात सहभागी होण्यासाठी लहानसा प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबात काही वाद होऊ शकतात, तेव्हा राग नियंत्रण ठेवा. संततीच्या संदर्भात एखादी चांगली बातमी ऐकू येईल.
मकर – दिवस शुभ आणि प्रगतीने भरलेला असेल. मात्र काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना लक्षणीय यश मिळू शकते. अर्थात, कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहा. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. दिवसाच्या उत्तरार्धात तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या.
कुंभ – व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. काही नवीन संपर्क बनवाल जे खूप फायदेशीर ठरू शकतात. अतिशय कठीण कामे सहजपणे पूर्ण करू शकाल, त्यामुळे कार्यक्षमतेबाबत अभिमान बाळगावा, असे काही क्षण येतील. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला सौदा मिळू शकतो. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
हेही वाचा – …अन् कुटुंबप्रेमाला आसुसलेल्या बबलीची कळी खुलली!
मीन – दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा, अन्यथा विरोधक वरिष्ठांकडे तुमच्याबद्दल कागाळ्या करतील. आज खूप काळजीपूर्वक काम करा. दिवसभरात कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या संदर्भात काही चांगली बातमी समजेल. घरी काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतात.
दिनविशेष
ह्यूमन कॉम्प्युटर शकुंतला देवी
टीम अवांतर
प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आणि ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 रोजी बंगळुरू येथे झाला. विलक्षण प्रतिभा असलेल्या शकुंतला देवी यांना ज्योतिषी, लेखिका, बासरी वादक अशा अनेक कला अवगत होत्या. तीन वर्षे वयाच्या शकुंतला देवी एकदा पत्ते खेळत असताना गणितातील त्यांची विलक्षण प्रतिभा त्यांच्या वडिलांनी त्यावेळीच हेरली. वयानं लहान असतानाही शकुंतला ज्या वेगानं अंक लक्षात ठेवत असत, ते पाहून त्यांचे वडील आश्चर्यचकित होत असत. पाच वर्षांच्या झाल्यानंतर त्यांनी गणितातील प्रश्नही सहज सोडवण्यास सुरुवात केली. त्या चार वर्षांच्या असतानाच म्हैसूर विद्यापीठाच्या एका मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भारतासह जगभरात त्यांच्या गणितीय ज्ञानाबद्दल माहिती होण्याचं हे पहिलं पाऊल होतं. आपली प्रतिभा ही ईश्वराची देणगी आहे असं म्हणणाऱ्या शकुंतला देवी या गणिताला केवळ ‘कॉन्सेप्ट’ आणि ‘लॉजिक’ मानत असत. गणिताबद्दलच्या आपल्या ज्ञानाची चमक त्यांनी जगभरातील असंख्य महाविद्यालये, विद्यापीठे, थिएटर, रेडिओ आणि टेलिव्हिजन कार्यक्रमातही दाखवली. 1977 मध्ये अमेरिकेत शकुंतला देवी यांनी कॉम्प्युटरच्या क्षमतेशी स्पर्धा करून दाखवली. त्यावेळी त्यांनी 188132517 या संख्येचं घनमूळ सांगितलं होतं. 1982 साली शकुंतला देवी यांनी 13 अंकांचा गुणाकार केवळ 28 सेकंदात सांगून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. मोठ-मोठ्या संख्यांची गणितं काही सेकंदात सोडवणाऱ्या शकुंतला देवी यांच्याबद्दल 1988 साली कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ प्रा. आर्थर जेन्सन यांनी अभ्यास केला होता. प्रा. जेन्सन यांनी त्यांच्या अहवालात म्हटलंय की, एखाद्या गणिताचं उत्तर वहीत लिहिण्याआधीच शकुंतला देवींकडे उत्तर तयार असायचे. शकुंतला देवी यांच्याकडे असणाऱ्या ज्योतिषविद्येतून आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी मोठ-मोठे नेते त्यांच्याकडे रांगा लावून बसत. त्यांच्या अद्भुत प्रतिभेला समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ हजारो प्रश्नांसह त्यांच्यावर अभ्यास करत असत. 1977 मध्ये शकुंतला देवी यांनी वर्ल्ड ऑफ होमोसेक्शुअलवरही पुस्तक लिहिलं. भारतात समलैंगिकतेवर हे पहिलं पुस्तक मानलं जातं. शकुंतला देवी रामानुजन पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. 21 एप्रिल 2013 मध्ये त्यांचं बंगळुरूमध्ये निधन झालं. 2020 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित ‘शकुंतला देवी’ या नावाचा चित्रपट देखील आला होता. या चित्रपटात विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली होती.


