Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – काम आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. दुपारपर्यंत पैसे कमावण्यात व्यग्र रहाल. पैसे मिळतील, पण अनावश्यक खर्चही होऊ शकतो. हातपाय दुखणे, थकवा जाणवणे आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कमी मेहनतीत जास्त पैसे मिळवण्याच्या प्रलोभनामुळे विश्वासघात होऊ शकतो, म्हणून लोभ टाळा. वृषभ – काही मनोरंजक घटना घडतील, ज्यामुळे आनंदी व्हाल. दुपारपर्यंत नफा आणि नवीन संधी असा दुहेरी लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून अशी बातमी मिळू शकते जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. घरात वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन – नफ्याच्या संधी मिळतील,…
दीपक तांबोळी नवी कोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दूर खेळत असलेली सायली धावतच तिच्याजवळ आली. “माझी नवी सायकल… माझी नवी सायकल” सायकलवरून हात फिरवता फिरवता सायली उद्गारली. नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता. समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली. पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकाने पहात होती. लोकांची धुणीभांडी करून साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता. दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं. सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता… दुसऱ्या दिवसापासून पार्वती ‘नाही नाही’ म्हणत असताना सायली सायकल घेऊन शाळेत गेली. अर्थात, सायकल…
आराधना जोशी दसरा झाल्यावर वेध लागतात ते, दिवाळीचे. हळूहळू घराघरातून फराळाचा घमघमाट यायला सुरुवात होते. या दिवाळी फराळात झटपट होणारी, न फसणारी आणि चवीला अतिशय सुंदर लागणारी 7 कप बर्फी कशी करायची, ते आपण बघूया. पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी विशेष आहार माहिती : शाकाहारी साहित्य (ज्या वाटीने बेसन मोजून घ्याल त्याच वाटीने इतर साहित्यही मोजून घ्यावे. म्हणजे प्रमाण बरोबर येईल.) हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा कृती तयारीस लागणारा वेळ – 5 मिनिटे बर्फीसाठी साहित्य भाजण्याचा वेळ – अंदाजे 25 मिनीटे बर्फीचे मिश्रण गार होण्यासाठी – अंदाजे 1 तास एकंदर वेळ – 1 तास 30 मिनिटे हेही…
चंद्रशेखर माधव साधारण एक महिन्यापूर्वीची घटना. माझ्या कंपनीत सुदीप नावाचा एक तरुण इंजिनीअर सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन विभागात जॉइन झाला. पहिल्याच दिवशी आम्हा सर्वांशी त्याची ओळख करून देण्यात आली. आमचे ऑफिस पुण्यातील पिरंगुट येथे आहे आणि आम्हा बऱ्याच जणांची घरं तिथून लांब आहेत. त्यामुळे साहजिकच आम्हाला घरातून सकाळी बऱ्यापैकी लवकर निघावे लागते. दोन तीन दिवसांतच दुपारी जेवायला एकत्र जाण्याच्यावेळी बऱ्यापैकी संवाद घडून आला. परिणामी, तो आमच्यामध्ये पटकन रुळला. तो जॉइन झाल्यानंतर साधारण सात-आठ दिवसांनी मी काही काम असल्याने तो बसतो त्या ठिकाणी पोहोचलो. सुदीप जागेवर नव्हता. इतरांना विचारलं तेव्हा समजलं की, तो सुट्टीवर आहे. नुकताच जॉइन झालेली व्यक्ती सुट्टीवर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा आतां अविवेककुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥122॥ दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते । ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥25॥ जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं । गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें ॥123॥ तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥124॥ दैवास्तव देहाचें पाळण । ऐसा निश्चयो परिपूर्ण । जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगें ॥125॥ आतां…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 23 आश्विन शके 1947; तिथि : नवमी 10:33; नक्षत्र : पुष्य 11:59 योग : साध्य 26:56; करण : वणिज 22:29 सूर्य : कन्या; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:17 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. त्यामुळे आज काहीतरी निराळे, वेगळे काम करावेसे वाटेल आणि तुम्ही ते कराल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर उत्पन्नही वाढेल.…
माधवी जोशी माहुलकर दिवाळीत केले जाणारे फराळाचे पदार्थ हे घरीच केलेले असावेत, नाही का? कमीत कमी चिवडा, चकली आणि बेसनाचे लाडू तरी घरी करावेत! नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कामाच्या व्यापामुळे हे पदार्थ करायला वेळ नसतो, परंतु वेळ मिळाला तर हे तीन पदार्थ वर्षातून एकदा घरी करावेत. तसंही आजकाल चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे यासारखे पदार्थ वर्षभर दुकानांमध्ये उपलब्ध असतात. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीत हे पदार्थ घरी करण्याचा अनुभव आणि मजा काही वेगळीच आहे. यामध्ये सातत्य आहे आणि आपण स्वतः केलेल्या उत्कृष्ट पाककृतीचे समाधान आहे! गृहिणीने केलेल्या चकली, लाडू यांचे तोंड भरून कौतुक जेव्हा तिच्या घरातील लोक करतात तेव्हा, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद…
चंद्रकांत पाटील आदिती गार्डनमध्ये रोज सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा भरायचा… चेष्टा, विनोद चालायचे, वाढदिवस साजरे व्हायचे, नाटक,सिनेमा, राजकारण यांच्यावर गप्पा चालायच्या… वसंतराव या सर्वांमध्ये भरभरून भाग घ्यायचे… अगदी आनंदी आनंद असे. पण आज वसंतराव या मिटींगमध्ये नव्हते. दूरवरच्या झाडाखाली खिन्नपणे बसून राहिले होते. आकाश ढगाळ झालेले… एरवी वार्याच्या झुळकेने हालणारी झाडे, वेली स्तब्ध झाली होती… वातावरण सुन्न झाले होते… केव्हाही पाऊस पडेल असे वाटत होते. वसंतराव एका नामांकित कंपनीतून रिटायर झाले होते, तेव्हापासून ते पुण्यातच राहत. वसंतरावानां एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी इंग्लंडला आणि मुलगा यूएसमध्ये! घरी दोघेच नवराबायको. सकाळी उठल्या-उठल्या हास्यक्लब, योगा नंतर चहा… तोपर्यत पेपर आलेला असे,…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥112॥ हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥113॥ म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥114॥ गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः । यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥23॥ तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस चांगला जाईल. व्यवसायात अनपेक्षित फायदा आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. काही अडथळे येऊ शकतात, परंतु कठोर परिश्रमाने त्यावर यशस्वीपणे मात करता येईल. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध सुधारतील. आज जुने मित्र भेटू शकतात. आज आरोग्य चांगले राहील. वृषभ – दिवसभरात संमिश्र अनुभव येतील. व्यवसाय चांगला राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना फलदायी ठरतील. वैयक्तिक कारणास्तव कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा. मिथुन – दिवस सामान्य असेल. शिक्षण आणि नोकरी संदर्भात काही चांगल्या…

