Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
मनीषा गोगटे दसरा झाल्यावर वेध लागतात ते, दिवाळीचे. हळूहळू घराघरातून फराळाचा घमघमाट यायला सुरुवात होते. या दिवाळी फराळ तयारीतील पहिला पदार्थ म्हणजे अनारसा! कारण त्याला करण्यास जास्त दिवस लागतात. साहित्य जाडे तांदूळ – अर्धा किलो (ज्याचा भात मोकळा होतो, असा कोणताही जुना तांदूळ) गूळ – तांदूळ पिठीच्या निम्म्या प्रमाणात पातळ साजूक तूप – साधारणपणे दीड टेबलस्पून खसखस – साधारणपणे दीड टेबलस्पून केळे किंवा दूध – अगदी किंचित तेल – अनारसा तळण्यासाठी हेही वाचा – Recipe : सात्विक पंचामृत केक कृती तांदूळ स्वच्छ धुवून तीन दिवसांसाठी भरपूर पाण्यात भिजवून ठेवायचा. पाणी रोज बदलून नवीन पाण्यात तांदूळ भिजवावेत. यामुळे तांदळाला आंबूस वास येत…
हिमाली मुदखेडकर नणंदेच्या मुलाचे लग्न ठरले आणि अनेक वर्षांनी पुन्हा एकदा जालन्याला जाण्याचा योग आला. लग्न तर एन्जॉय करायचेच आणि आरामही! असा सुटसुटीत कार्यक्रम ठरवून जालन्यात पाऊल ठेवले. नणंदेकडे पाहुण्यांचे उधाण आले होते… अगदी उत्सवाचे वातावरण… सनई चौघडे… सगळेच अगदी साग्रसंगीत! या सगळ्यात हिची मधे मधे लुडबुड सुरू होतीच… पण तिला कुणी फारसे महत्त्व देत नव्हते, उलट हाडतुडच येत होती बिचारीच्या वाट्याला… “सुले… काय तुझं इथे? हो बाजूला…” कुणीतरी वसकन ओरडले तिच्यावर… तशी ती तणतणत बाजूला झाली आणि रागात निघून गेली. ‘सुलू…’ हिला मी विसरलेच होते. तसं तिला लक्षात ठेवावं, असा तिचा माझा फारसा सहवासही नव्हताच. तिची माझी पहिली भेट…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा श्री भगवानुवाच : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥5॥ तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥41॥ तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी । बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपली तूं ॥42॥ मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । ते समस्तही…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 16 आश्विन शके 1947; तिथि : द्वितीया 26:22; नक्षत्र : अश्विनी 22:45 योग : हर्षण 25:32; करण : तैतिल 16:08 सूर्य : कन्या; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:23 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी विचार आणि ऊर्जा यांचा योग्य वापर करा. विचार न करता खर्च करणे किती नुकसान करणारे असते याचा प्रत्यय येईल. व्यावसायिकांना…
डॉ. अस्मिता हवालदार रणांगण वाचायला घेतली तेव्हा प्रथम अर्पण पत्रिका पाहिली ‘_ मादमायसेल रोला यांस.’ ही कोण? प्रश्नच पडला. मी जेव्हा ही कादंबरी वाचली त्यावेळी गुगलून उकल करण्याची सोय नव्हती. विश्राम बेडकर यांची ‘रणांगण’ कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड समजली जाते. यावर इतक्या समीक्षा आहेत की, समीक्षांचे संकलन पुस्तक रूपाने होऊ शकेल. प्रतिक्रिया सर्व प्रकारच्या आहेत… ॲसिडिक न्यूट्रल अल्कलाइन! अत्यंत टुकार ते मराठीत यानंतर असे कादंबरी लेखन झालेच नाही इथपर्यंत… मी दोन्ही मतांशी सहमत नाही! पहिले महायुद्ध संपलेले असते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभे असते, तेव्हा हे कथानक घडते. त्यावेळी विमान प्रवास फारसा नसल्याने बोटीनेच प्रवास केला जात असे.…
सतीश बर्वे अलीकडेच, 1 ऑक्टोबरला सकाळी मार्केटला चाललो होतो, तेव्हा अचानक मागून आवाज आला, “ओ दादा…” मी मागे वळून पाहिले तर, एक चिमुरडी हातात झेंडूच्या फुलांचे तोरण घेऊन उभी होती… जमिनीवर ठेवलेल्या तिच्या टोपलीत झेंडूच्या फुलांची बरीच तोरणं व्यवस्थितपणे ठेवलेली होती. “ले लो ना दादा…” तिचा आर्जवी स्वर… “आपका डान्स भी देखती हूं मै रोज!” तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो… मला एकदम आठवलं, आमच्या नवरात्र मंडपाच्या पुढच्याच चौकात आंध्र प्रदेशातून आलेली बरीच कुटुंब रस्त्याच्या कडेला चादर अंथरून त्यावर झेंडूच्या फुलांची मोठी रास ओतून तोरणं करत असतात दिवसरात्र. चिल्लीपिल्ली मुलं देखील मोठ्या माणसांना जमेल तशी मदत करत असतात… हेही…
कामिनी व्यवहारे केळफुलाची स्वादिष्ट भाजी तयार होते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही असेही आहेत, ज्यांना या केळफुलाची माहिती नसेल. केळ्यांच्या घडाने आकार घेतला म्हणजे त्याच्या टोकाला असलेले केळफूल त्या घडातील केळ्यांच्या शेवटच्या फणीपासून थोड्या अंतरावर कापून काढून घेतात. त्याच केळफुलाचा भाजीसाठी उपयोग होतो. शिवाय ते काढून घेतल्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्यांचे वजन वाढते. आरोग्याच्या दृष्टीने केळफूल फायदेशीर आहे. यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. यात फायबर, प्रथिने, पोटॅशिअम, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि ई जीवनसत्त्व असते, असे तज्ज्ञ सांगतात. याच केळफुलाचे खमंग वडेही तयार करता येतात. पाहूयात त्याची रेसिपी – पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य…
चंद्रकांत पाटील मी रिटायर झाल्यानंतर माझ्यासमोर एकच टार्गेट होते… ते म्हणजे दोन नंबरच्या चिरंजीवांचं लग्न करणे, पहिल्याला काही कारणाने विलंब झाला होता म्हणून याचे लवकर बघायला सुरवात केली, मुली बघायच्या चालू होत्या… हा आयटी कंपनीत होता, चांगला पगार होता… पण नोकरी करता करता त्याने कधी काळी ऑस्ट्रिलियन व्हिजासाठी अर्ज केला होता आणि तो सहा महिन्यांपूर्वी त्याला मिळाला होता. पण घरात लग्नाची चर्चा सुरू आहे म्हणून तो बोलला नव्हता. पण त्याची जशी जशी मुदत संपत आली, तसे तो तिकडे जाण्याची घाई करू लागला. आम्ही दोघे नवरा-बायको म्हणालो, “अगोदर लग्न कर बाबा अन् मग जा! तसा तो थांबलाही चार महिने, पण लग्न…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥3॥ तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वता । भ्रांति न करीं ॥27॥ हें जीवींचे निज गुज । परी केवीं राखों तुज । जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥28॥ तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥29॥ तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों । जरी…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑक्टोबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 15 आश्विन शके 1947; तिथि : पौर्णिमा 09:17, प्रतिपदा 29:53; नक्षत्र : रेवती 25:28 योग : ध्रुव 09:31, व्याघात 29:34; करण : बालव 19:37 सूर्य : कन्या; चंद्र : मीन 25:28; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:23 पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 नवान्न पौर्णिमा, कार्तिक स्नानारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. पैसा बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकतो, त्यामुळे चांगले…

