Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!
“सकाळी लवकर जाग यायचंही एखादं औषध द्या डॅाक्टर, ही लवकर उठतच नाही…” आपल्या मुलीसोबत सर्दी खोकल्याची औषधं घ्यायला आलेल्या आईनं विनंती कम आदेश दिला. “नाही, उलट सर्दीच्या औषधानं थोडीशी झोप वाढेल,” मी त्यांना सांगितलं. दोघी हसत रवाना झाल्या. पण मला इकडं कॅरोलिना ॲाल्सन आठवली… साल असावं 1876… हिवाळ्याची एक थंडगार संध्याकाळ… स्वीडनच्या छोट्याशा ओक्नो गावात समुद्र किनाऱ्याजवळच्या एका साध्या घरात 14 वर्षांची कॅरोलिना ऑल्सन रोजच्या प्रमाणे शाळेतून घरी परतली. तिच्या डोळ्यात नेहमीचा उत्साह नव्हता; उलट तिच्या कपाळावर एक जखम होती आणि डोकं प्रचंड दुखत होतं. शाळेतून येताना तिला एक अपघात झाला होता. काही म्हणतात, बर्फावर पडली, तर काही म्हणतात दातदुखीनं…
सकाळीच एक ग्रुप रिक्षातून बेशुद्ध तरुणीला घेऊन आलं होतं… बिचारी ॲाफिसमध्येच गळपटली होती… बीपी आणि शुगर हलकंस ड्रॅाप होतं. थोडा स्पिरिटचा बोळा हुंगवला तसं ठसका देत ती शुद्धीत आली, पण तिची दातखीळ बसलेली होती! “चक्कर येऊन बेशुद्ध पडली की फिट आली?” मी त्यांना विचारलं; पण त्यांना यातली काहीच कल्पना नव्हती. तिच्या ॲाफिसला फोन लावला तेव्हा संमिश्र आणि अजून गोंधळात टाकणारी माहिती मिळाली… “चक्कर येऊन बेशुद्ध पडली काय किंवा फिट आली असली तरी उपचारापश्चात तिला निश्चितच बरं वाटेल, मात्र पण ‘फिट’ असेल तर, किमान पुढचे 24 तास ऑब्झर्वेशनखाली ठेवावं लागेल,” मी माहिती दिली. हेही वाचा – आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च…
हल्ली नियमित थकवा, सांधेदुखी, अशक्तपणा ही तक्रार घेऊन येणाऱ्या पेशंट्समध्ये पोस्टकोविड एलिमेंट तर आहेच, याउपर या कालावधीत चणेफुटाण्यासारखं औषधं खाण्याच्या सवयीचा वाटाही तितकाच मोठा आहे. ब्लड टेस्ट केली असता अनेकात फॉस्फेटची पातळी खूप कमी असल्याची दिसते, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं बॅलन्स बिघडलेलं आढळतं आणि हाडांची डेन्सिटी टेस्ट अर्थात डेक्झा स्कॅन या तपासणीत हाडांची प्रचंड झीज झालेली आढळते… पेशंट्सना प्रचंड आश्चर्य वाटतं, “हे कसं काय झालं? मी तर सगळं खातो, मला तर कुठला आजारही नाही… ब्ला… ब्ला…” त्यांना समजावून सांगावं लागतं, “काकाजी, तुम्हाला औषधं खाण्याचा आजार आहे, त्याचं काय?” “छ्याऽऽ कधी? अधूनमधून डोलो घेतो आणि आठवड्यातून दोनेकदा आणि विशेषत: ड्रिंक्स वगैरे झालं…
सकाळीच ओपीडीत एक महिला आली होती… बीपी, शुगर, ओटू सगळं ड्रॉप! काल उपवास होता, म्हणे… त्यांना “नका करू,” म्हटलं तर म्हणे, “आमच्यात तसं चालत नाही, करावचं लागतं.” “आमच्यात हे चालत नाही,” वगैरे सांगत, हे ‘तुमचं-आमचं’ करणारे ‘चमण लोक’ भेटले की, मेंदूत एक तीव्र सणक जाते! तरीही, ‘उपवास करा – सलाइन भरा’ ही योजना आठवून मी यांना मनोमन माफ करतो, पण दरवेळी मला ड्र्यूची आवर्जून आठवण येते. साल असावं 1904 वॉशिंग्टन डी.सी.मध्ये एका अतिशय सामान्य कुटुंबात चार्ल्स ड्र्यू जन्मला. त्याचे पालक अल्पशिक्षित असले तरी, त्यांनी या मुलाला एक धडा नेहमी दिला, “जिथं गरज आहे, तिथं तू कामाला नाही म्हणू नकोस.” ड्र्यू…
‘खोकला’ ही किरकोळ तक्रार घेऊन आलेल्या अन् एव्हाना मिसरूडही न फुटलेल्या मुलाच्या छातीला स्टेथो लावला आणि माझ्याच छातीत धस्सऽऽ झालं! त्याला किंवा त्याच्या आईला वाटत असलेला हा ‘खोकला’ म्हणजे थंडी किंवा प्रदूषणामुळं निश्चितच नव्हता; अन् हा खोकला साधाही नव्हता… एखाद्या जुन्या डिझेल इंजिनसारखा श्वासाचा आवाज सोबत पाचेक मिनिटं जोरजोरानं खाकरल्यानंतर आणि खोकल्यानंतरच थोडा ‘कफ’ पडून घसा साफ होण्याची तक्रार! पठ्ठ्याकडून तिनेक डॅाक्टर आधीच गाठून झाले होते… कफ सिरपच्या चारेक बाटल्याही रिचवल्या होत्या… सरतेशेवटी तो आज माझ्याकडं आला होता. मला 99% गुपित उलगडलं होतं, पण थेट विचारणं थोडं शिष्टसंमत वाटत नव्हतं म्हणून थोडं आडून विचारलं, “बेटा, दिवसभर बरा असतोस, पण हा…
“डॉक्टर विनासाखरेचा चहा पितोय, मिठाई बंद, बाहेरचं काहीच खात नाही, कोल्ड्रिंकला हात लावत नाही… तरी रिपोर्टमध्ये शुगर 230!” पेशंटनं ओपीडीत आल्या आल्या वकिली थाटात रिपोर्ट टेबलवर आदळत विचारलं. हा प्रश्न आजकाल इतक्यांदा ऐकायला मिळतो की, अनेकदा पेशंटच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहूनच हसू येतं… टीटीचं इंजेक्शन म्हणजे गंजलेलं लोखंड लागल्यास, रेबिजचं इंजेक्शन म्हणजे फक्त श्वान चावल्यास तसंच आपल्याकडं बहुतेकांना वाटतं ‘साखर’ म्हणजे फक्त किराणा दुकानातून आणलेली पांढरी साखर! खरी गोष्ट अशी आहे की, आपल्या शरीराला ‘ग्लुकोज’ मिळवण्यासाठी फक्त साखरेच्या डब्यावर अवलंबून राहावं लागत नाही; शरीराकडं स्वतःची एक भन्नाट ‘साखर निर्मिती यंत्रणा’ असते! मानवी शरीर हा एक अत्यंत बुद्धिमान कारखाना आहे. त्याला मेंदू…
एक गृहस्थ पाठदुखीसाठी ओपीडीत आले होते, खिशावरच्या बिल्ल्यावरनं ते रिक्षाचालक असल्याचं लक्षात आलं, लक्षणजन्य औषधं देत त्यांच्या पाठदुखीचं कारणं “रिक्षाचा पाटा तुटलाय” असं सांगितलं तेव्हा ते प्रारंभी गोंधळले पण नंतर हळूच तत्वत: सहमत झाले… सामान्यत: ‘पाटा’ हा शब्द रिक्षावाल्यांच्या भाषेत वापरला जातो, पण तांत्रिक भाषेत त्याला लिफ स्प्रिंग म्हणतात; ही रिक्षाच्या मागील बाजूला पातळ, वाकलेली, धातूची अनेक पट्ट्यांची एक व्यवस्था असते. हे पट्टे एकावर एक ठेवून ‘स्प्रिंग पॅक’ बनतं आणि यामुळं रिक्षेला सस्पेन्शन मिळतं म्हणजे धक्के कमी जाणवतात; या स्प्रिंगचं काम रस्त्यावरील खड्डे, उंच-सखल भाग, स्पीडब्रेकर्स यांचा झटका कमी करणं – वाहनाची स्थिरता राखणं – वजन सहन करणं हे असतं.…
“डॉक्टर, औषधं नियमित घेतो मी… सल्ला वगैरे काही नको,” दर महिन्याला बीपी-शुगरची औषधं लिहून घ्यायला आलेले काका दरवेळी सांगत… आणि हे वाक्य ते इतक्या आत्मविश्वासात बोलत की, जणू औषधं म्हणजेच वैद्यक आणि बाकी सगळं निव्वळ बकवास! वय साठीच्या आसपास, वजन थोडंसं जास्त पण रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही ‘नियंत्रित’ असं त्यांचं ठाम मत!! कंट्रोलमध्ये कसं? तर “गोळ्या चालू आहेत ना!” मधुमेहाची एक गोळी सकाळी आणि एक संध्याकाळ, बीपीची एक सकाळी, कोलेस्ट्रॉलची एक रात्री गोळी रात्री… बस्स… एवढंच!! अन् आहार, विहार, व्यायाम, तपासण्या, डोस बदल वगैरे हे सगळं त्यांच्या दृष्टीने डॉक्टरांचे छंद! “गोड कमी करा,” सांगितलं तर, ठरलेलं उत्तर – “फक्त चहाच…
ओपीडीत नेहमीप्रमाणेच पेशंटची गर्दी होती. एक पेशंट माझ्यासमोर आला. “थोडं बीपी वाढलंय… एक ईसीजी करावा लागेल,” पेशंटची लक्षणं आणि वाढलेला रक्तदाब बघून मी रुटिन सल्ला दिला. तो म्हणाला, “डॉक्टर, मी एक साधा रिक्षावाला… रोज सकाळी लवकर उठून रिक्षा घेऊन निघतो. प्रवासी शोधतो, मीटर फिरवतो, दिवसभर शहरभर धावपळ करतो… घरी खंगलेली आई, कॅन्सर पेशंट बायको, ऐन विशीत अंगावरून वारं गेलेला मुलगा आणि मतिमंद मुलगी हे माझी वाट पाहात असतात. ईमानेइतबारे कमावलेले पैसे सगळे त्यांच्यासाठीच. कर्ज फेडायला, औषधोपचाराला, जेवणाला सगळं काही त्यांच्यासाठी… पण मी आता थकलोय… खूप थकलोय… बायको यावेळची किमो सहन करू शकेल का, सांगता येत नाही… पण हीच एक आशा…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर अजून टेबल टिश्यूनं पुसायचं राहिलं होतं; प्रिस्क्रिप्शन पॅड-पेन वगैरे अद्यापही ड्रॉव्हरमधून काढलं नव्हतं…. तोच चटकन तो आत ओपीडीत आला… तो – डॉक्टर, भयंकर डोकं दुखतंय… मी – हो, पलीकडं पडा, मी चेक करतो… तो – दोन दिवस झालेत झोप नाही. मी- तपासतो… तो – ती मला फसवत आहे! आताशा त्याचा आवाज थरथरायला लागला होता; रागानं नव्हे तर, एका खोलवर दाटून आलेल्या आतल्या एका अनामिक भीतीनं… थोडक्यात माहिती घेतली. वय साधारण 38 वर्षं. खासगी बांधकाम व्यावसायिकाकडं काम करणारा… सुसंस्कृत, उच्चशिक्षित. बायकोचीही खासगी ठिकाणी कंत्राटी नोकरी, दहा वर्षांचा संसार… बाहेरून सगळं परफेक्ट, पण त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी…

