Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : आनंदाचे बालपण देता येते, स्पष्ट करणारे ‘चीपर बाय द डझन’

    August 24, 2026

    दोन स्पेशल

    August 23, 2026

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!
    आरोग्य

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरJune 24, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, डॉ. चार्ल्स ड्र्यू, रक्तपेढीचा जनक डॉ चार्ल्स ड्र्यू, ब्लड बँकेचा जनक डॉ चार्ल्स ड्र्यू, कृष्णवर्णीय डॉ चार्ल्स ड्र्यू, अमेरिकेतील वर्णभेद, रक्तसाठा आणि रक्तवाहतूक, मानवतेचा रंग लाल, माणसानं माणसाला वाचवावं, डॉ चार्ल्स ड्र्यूचा करूण अंत, प्लाज्मा फॉर ब्रिटन
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सकाळीच ओपीडीत एक महिला आली होती… बीपी, शुगर, ओटू सगळं ड्रॉप! काल उपवास होता, म्हणे… त्यांना “नका करू,” म्हटलं तर म्हणे, “आमच्यात तसं चालत नाही, करावचं लागतं.”

    “आमच्यात हे चालत नाही,” वगैरे सांगत, हे ‘तुमचं-आमचं’ करणारे ‘चमण लोक’ भेटले की, मेंदूत एक तीव्र सणक जाते! तरीही, ‘उपवास करा – सलाइन भरा’ ही योजना आठवून मी यांना मनोमन माफ करतो, पण दरवेळी मला ड्र्यूची आवर्जून आठवण येते.

    साल असावं 1904 वॉशिंग्टन डी.सी.मध्ये एका अतिशय सामान्य कुटुंबात चार्ल्स ड्र्यू जन्मला. त्याचे पालक अल्पशिक्षित असले तरी, त्यांनी या मुलाला एक धडा नेहमी दिला, “जिथं गरज आहे, तिथं तू कामाला नाही म्हणू नकोस.”

    ड्र्यू विद्यार्थी म्हणून हुशार होताच, सोबत एक प्रवीण खेळाडूही होता; पण त्याची ओढ मात्र विज्ञानाकडं होती… विशेषतः, ‘रक्त’ या गोष्टीबद्दल त्याला विशेष कुतूहल होतं. “हे लालसर द्रव्य जीव कसं वाचवतं?” याचा शोध घेण्यासाठी तो कॅनडा, अमेरिका अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत गेला…

    1940च्या दशकात युरोपमध्ये युद्धाचं बिगुल वाजलं; रणांगणावर जखमी झालेल्या सैनिकांना भरलेल्या गाड्या शहरातील रस्त्यावर फिरू लागल्या. हॉस्पिटल्स अक्षरश: तुडूंब भरून वाहू लागले… सगळ्यात मोठं आव्हान बनलं होतं ‘रक्तपुरवठा’!

    कारण, त्या वेळी ‘रक्तपेढी’ ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्यानं रक्त काही तासांनंतर खराब होत असे आणि याच वेळी ड्र्यूच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली… “रक्त वेगवेगळ्या घटकांत विभागून थंड वातावरणात ठेवलं तर?” यामुळं रक्त अधिक काळ टिकू लागलं. त्यानं ‘प्लाज्मा फॉर ब्रिटन’ नावाचा एक प्रकल्पच सुरू केला.

    हेही वाचा – जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    तो फक्त वैज्ञानिक नव्हता तर, तो एक अतिशय जबरदस्त व्यवस्थापकही होता. हजारो बाटल्या प्लाझ्माच्या जहाजानं युद्धापूर्वीच युरोपात पोहोचू लागल्या… यातली एकेक बाटली म्हणजे सैनिकांसाठी मृत्यू आणि जीवन यातलं अंतर होती; लोकांनी त्याला नाव दिलं, ‘रक्तपेढीचा जनक’!

    रक्तसाठा, रक्तवाहतूक आणि आधुनिक ब्लड बँक ही त्याचीच देणगी…

    ड्र्यूचं हे निर्भेळ यश सर्व जगभर पसरलं, पण त्यावेळी अमेरिकेत वर्णभेद अजूनही खोलवर रुतलेला होता. एका क्षणी इतका विचित्र आदेश आला की, तो वैज्ञानिक असूनही सुन्न झाला… तो आदेश होता “रक्ताच्या बाटल्या ‘श्वेत’ आणि ‘कृष्णवर्णीय’ अशा दोन गटांत ठेवाव्यात”!

    ड्र्यू प्रचंड संतापला… “रक्त फक्त लाल असतं रेऽऽ त्यात भेद नसतो… त्यात मानवतेचा रंग असतो.”

    पण त्याच्या या आवाजाकडं कुणीच लक्ष दिलं नाही. ड्र्यूला स्वतःच्या तयार केलेल्या कार्यक्रमातून थेट राजीनामा द्यावा लागला. ही जखम त्याच्या मनात कायमचीच खोलवर रुतून राहिली.

    3 एप्रिल 1950 रोजी ड्र्यू कारनं प्रवास करत असताना अचानक त्याच्या कारचा अपघात झाला; त्याचं वाहन उलटलं, शरीर रक्तबंबाळ झालं, हातपाय मोडले… जवळच दक्षिणेकडील गावात एक हॉस्पिटल होतं, तिथं बातमी पोहोचली – जखमी एक डॉक्टर आहे, पण तो कृष्णवर्णीय आहे…

    ओघानं उपचार उशिरा देण्यात आले, हलगर्जीपणा झाला आणि जगाला रक्तदानाची, रक्तसाठवणीची शिकवण देणारा भला माणूस स्वतः रक्ताच्या अभावानं मृत्यूमुखी पडल्याची भयानक घटना घडली…

    हेही वाचा – जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    अर्थातच, तो वाचू शकला असता, जर त्या हॉस्पिटलनं त्याला योग्य वेळी उपचार दिले असते! पण त्याच्या त्वचेच्या रंगानं विज्ञानावर मात केली… काही मिनिटांतच रक्तपेढी या संकल्पनेचा जनक, ज्यानं नाव-गाव माहीत नसलेल्या लाखो सैनिकांना वाचवलं होतं… त्या वैज्ञानिकानं आपल्याच शरिरातील रक्ताची धार थांबताना पाहिली!

    अखेरीस डॉ. चार्ल्स ड्र्यूचा प्रवास कायमचा संपला.

    आज जगाच्या प्रत्येक शहरात रक्तपेढ्या आहेत, प्रत्येक आपत्कालीन शस्त्रक्रियेत, प्रत्येक अपघातात, प्रत्येक प्रसूतिगृहात जेव्हा एखादा डॉक्टर रक्ताची बॅग उचलतो तेव्हा कुठंतरी ड्र्यू नावाचा वैज्ञानिक शांतपणे हसत असतो…

    त्याचा मृत्यू अन्यायानं झाला पण त्याचं योगदान अमर आहे, कारण तो मानत होता, “माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!”

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    भूक लागत नाही?

    August 19, 2026 आरोग्य

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026 आरोग्य

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    भूक लागत नाही?

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरAugust 19, 2026

    “डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम…

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : आनंदाचे बालपण देता येते, स्पष्ट करणारे ‘चीपर बाय द डझन’

    August 24, 2026

    दोन स्पेशल

    August 23, 2026

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 870
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : आनंदाचे बालपण देता येते, स्पष्ट करणारे ‘चीपर बाय द डझन’

    August 24, 2026

    दोन स्पेशल

    August 23, 2026

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.