Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Recipe : स्वादिष्ट सुरळीच्या वड्या (खांडवी)

    July 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …अन् ती 32 वर्षं झोपली!
    आरोग्य

    …अन् ती 32 वर्षं झोपली!

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरJuly 15, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, डॉ प्रज्ञावंत देवळेकर, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, लेखक प्रज्ञावंत देवळेकर, कॅरोलिना ऑल्सन, कॅरोलिना ऑल्सनची गोष्ट, 32 वर्षे झोपलेली कॅरोलिना, 32 वर्षे झोपणारी कॅरोलिनी, वैद्यकशास्त्रातील गूढ, वैद्यकशास्त्रातील गूढ कथा, कॅरोलिनाला हिस्टेरिया, कॅरोलिनाला डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “सकाळी लवकर जाग यायचंही एखादं औषध द्या डॅाक्टर, ही लवकर उठतच नाही…” आपल्या मुलीसोबत सर्दी खोकल्याची औषधं घ्यायला आलेल्या आईनं विनंती कम आदेश दिला.

    “नाही, उलट सर्दीच्या औषधानं थोडीशी झोप वाढेल,” मी त्यांना सांगितलं. दोघी हसत रवाना झाल्या. पण मला इकडं कॅरोलिना ॲाल्सन आठवली…

    साल असावं 1876…

    हिवाळ्याची एक थंडगार संध्याकाळ… स्वीडनच्या छोट्याशा ओक्नो गावात समुद्र किनाऱ्याजवळच्या एका साध्या घरात 14 वर्षांची कॅरोलिना ऑल्सन रोजच्या प्रमाणे शाळेतून घरी परतली. तिच्या डोळ्यात नेहमीचा उत्साह नव्हता; उलट तिच्या कपाळावर एक जखम होती आणि डोकं प्रचंड दुखत होतं.

    शाळेतून येताना तिला एक अपघात झाला होता. काही म्हणतात, बर्फावर पडली, तर काही म्हणतात दातदुखीनं त्रस्त झाली… काहीही असो, पण त्या रात्री ती झोपली आणि पुढची 32 वर्षे ती झोपलेली राहिली!

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    हे ऐकून कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण ही आहे कॅरोलिनाची खरीखुरी रहस्यमयी वैद्यकीय कथा!! जणू काही एखाद्या परीकथेतील ‘स्लीपिंग ब्युटी’ची वास्तविक आवृत्ती…

    कॅरोलिनाचा जन्म 1861 साली झाला. ती एक सामान्य धार्मिक कुटुंबातील मुलगी होती. आईबाबा साधे शेतकरी आणि तिच्या भावंडांसोबत ती आनंदानं आपलं बालपण व्यतित करत होती. पण त्या फेब्रुवारीच्या एका दिवशी सर्व काही बदललं…

    तिला तीव्र डोकेदुखी आणि दातदुखी सुरू झाली. डॉक्टरांना बोलावलं पण त्यांना काही समजलं नाही. कॅरोलिनानं काही दिवस त्रास सहन केला आणि मग ती अंथरुणाला खिळली. तिची आई एक प्रेमळ आणि समर्पित स्त्री तिच्या बाजूला बसली.

    “मला झोप येतेय,” असं कॅरोलिनानं म्हटलं आणि ती खोल निद्रेत गेली. सुरुवातीला कुटुंबाला वाटलं सकाळी जाग येईल, पण दिवस उगवले, रात्री झाल्या आणि कॅरोलिना जागी होईना! तिच्या श्वासोच्छ्वास सामान्य होते, पण डोळे उघडत नव्हते. तिचं शरीर हलत नव्हतं, बोलत नव्हतं… हे काय होतं? कोमा? हायबरनेशन? की काही वेगळंच?

    गावात बातम्या पसरल्या. डॉक्टर येऊ लागले. आधी स्थानिक वैद्यांनी तपासलं… त्यांना वाटलं तिला पक्षाघात झाला असावा. मग स्टॉकहोममधून तज्ज्ञ आले. त्यांनी तिच्या डोळ्यात प्रकाश टाकला, तिला सुई टोचली, पण कॅरोलिनाची काहीच प्रतिक्रिया नव्हती.

    तिची आई सांगत असे, “ती फक्त दूध आणि साखरेचं पाणी पिते.” पण कसं? आई तिच्या तोंडात चमच्याने हे द्रव ओतत असे आणि कॅरोलिना ते गिळत असे… वर्षानुवर्षे हेच चाललं. कॅरोलिनाचे केस लांब वाढले, नखे वाढली… पण तिचं शरीर कमकुवत झालं नाही, उलट ती निरोगी दिसत होती.

    डॉक्टर हैराण झाले. एकानं म्हटलं, “ही हिस्टेरिकल केस आहे. कदाचित मानसिक आघातामुळं झालंय.” दुसऱ्यानं सांगितलं, “कदाचित मेंदूला इजा झाली असावी.” पण कुणालाच निश्चित उत्तर मिळालं नाही.

    कॅरोलिनाची आई तिची काळजी घेत राहिली… तिला साफ करत, तिचे कपडे बदलत राहिली. आईच्या प्रेमाची ही एक अनोखी कहाणी होती. तब्बल 32 वर्षे एकटीने लढणारी आई!

    वेळ सरत गेली. 1890च्या दशकात कॅरोलिनाची बातमी युरोपभर पसरली. पत्रकार येऊन फोटो काढत. डॉक्टर अभ्यास करत. एकदा तर तिला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न झाला, पण तिच्या आईनं स्पष्ट नकार दिला… “माझी मुलगी इथेच राहील,” ती म्हणाली.

    1908 साली मात्र एक चमत्कार घडला. एप्रिल महिन्यात कॅरोलिनाच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी, घरात काम करणाऱ्या मोलकरणीनं कॅरोलिनाच्या खोलीतून आवाज ऐकला… ती धावत गेली आणि बघते तर काय? कॅरोलिना चक्क जागी झाली होती. तिचे डोळे उघडे होते आणि ती विचारत होती, “आई कुठंय?”

    एव्हाना तिचं वय आता 46 झालं होतं. पण तिला वाटत होतं की, ती अजून 14 वर्षांचीच आहे. तिच्या स्मृतीत फक्त त्या अपघातापर्यंतचाच काळ होता. ती उठली, चालली आणि हळूहळू सामान्य जीवन जगू लागली.

    पण हे सगळं खरंच होतं का? वैद्यकीय जगात आजही हे रहस्य आहे. काही तज्ज्ञ म्हणतात. कॅरोलिनाला मानसिक आजार झाला असावा – हिस्टेरिया किंवा डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर, ज्यामुळं ती स्वतःला ‘झोपलेली’ समजत असे…

    आईनं तिला लपवून ठेवलं असावं गुपचूप खायला देऊन. कारण 32 वर्षे फक्त द्रवावर जगणं शक्य नाही आणि तिचे स्नायू कमकुवत झाले नव्हते!

    हेही वाचा – ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    अजून एक थिअरी म्हणजे कदाचित ती खरोखरच कोमात होती, पण तिच्या आईने तिला जिवंत ठेवलं. कॅरोलिना कधीच या काळाबद्दल बोललं नाही; ती फक्त म्हणत असे, “मला स्वप्नं पडत होती.”

    ती पुढे वयाच्या 88 वर्षापर्यंत जगली. तिने लग्न केलं नाही आणि 1950 साली शांतपणे मृत्यूला सामोरी गेली. तिच्या कबरीला भेट देणारांना आजही तिथं जाऊन ‘स्लीपिंग ब्युटी’ची आठवण येते…

    ही कथा आहे विज्ञान आणि रहस्याचे मिश्रण! एका मुलीची गोष्ट जी जगाला संभ्रमात टाकून झोपली आणि जागी झाल्यावरही तिचं रहस्य कायम राहिलं…

    कधीकधी वैद्यकीय जगात अशा गोष्टी घडतात ज्या कुठल्याच पुस्तकातही नसतात!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    July 11, 2026 आरोग्य

    गुंतागुंतीचा माणूस…

    July 8, 2026 आरोग्य

    वातविकारासाठी आहार मार्गदर्शन

    July 4, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    मधुमेह नियंत्रणासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    By रविंद्र परांजपेJuly 11, 2026

    मागील दोन लेखांमधून आपण वातविकारासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण मधुमेह…

    गुंतागुंतीचा माणूस…

    July 8, 2026

    वातविकारासाठी आहार मार्गदर्शन

    July 4, 2026

    पोळी बदलली… आणि विचारही!

    July 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Recipe : स्वादिष्ट सुरळीच्या वड्या (खांडवी)

    July 15, 2026

    …अन् ती 32 वर्षं झोपली!

    July 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव 

    July 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जुलै 2026

    July 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 360
    • अवांतर 197
    • आरोग्य 130
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 490
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 236
    • मैत्रीण 24
    • ललित 780
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अण्णांचं मृत्युपत्र

    July 15, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Recipe : स्वादिष्ट सुरळीच्या वड्या (खांडवी)

    July 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.