Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …म्हणून मी मरणार नाही!
    ललित

    …म्हणून मी मरणार नाही!

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरMay 25, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, रिक्षावाल्याची करूण कहाणी, रिक्षावाल्याच्या कुटुंबातील आजारपण, रिक्षावाल्याची कॅन्सरग्रस्त पत्नी, रिक्षावाल्याचे दु:ख, रिक्षावाल्याला मरणाची भीती, रिक्षावाल्याचे आजारी कुटुंब, चिंताग्रस्त रिक्षावाला
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ओपीडीत नेहमीप्रमाणेच पेशंटची गर्दी होती. एक पेशंट माझ्यासमोर आला. “थोडं बीपी वाढलंय… एक ईसीजी करावा लागेल,” पेशंटची लक्षणं आणि वाढलेला रक्तदाब बघून मी रुटिन सल्ला दिला. तो म्हणाला,

    “डॉक्टर, मी एक साधा रिक्षावाला… रोज सकाळी लवकर उठून रिक्षा घेऊन निघतो. प्रवासी शोधतो, मीटर फिरवतो, दिवसभर शहरभर धावपळ करतो… घरी खंगलेली आई, कॅन्सर पेशंट बायको, ऐन विशीत अंगावरून वारं गेलेला मुलगा आणि मतिमंद मुलगी हे माझी वाट पाहात असतात. ईमानेइतबारे कमावलेले पैसे सगळे त्यांच्यासाठीच. कर्ज फेडायला, औषधोपचाराला, जेवणाला सगळं काही त्यांच्यासाठी… पण मी आता थकलोय… खूप थकलोय…

    बायको यावेळची किमो सहन करू शकेल का, सांगता येत नाही… पण हीच एक आशा असल्याचं डॉक्टर सांगतात.

    रोजचं हॉस्पिटल, आईचीही औषधं, मुलाची फिजिओथेरपी सगळं काही फक्त रिक्षाच्या कमाईतून चालवतोय… दिवसभर अर्धपोटी धावपळ करून रोज रात्री बायकोच्या डोळ्यातील वेदना पाहून काळीज पिळवटून निघतं. ती केविलवाणं हसण्याचा प्रयत्न करत म्हणते, ”काळजी करू नका, होईल सर्व ठीक…” पण तिची आणि माझीही झुंज किती कठीण आहे, ते मी मनोमन जाणतो.

    एकुलता एक मुलगा… हातात आला असं वाटावं तेवढ्यात डोकंदुखीचं निमित्त झालं, बोबडी वळली… तो आता वीसचा झालाय, पण पॅरलिसीसमुळं बेडवर पडून असतो. ऐन तारुण्यात त्याची ही व्यथा! त्याला चालता यावं म्हणून किती प्रयत्न केले… फिजिओथेरपी – डॉक्टर -औषधं सगळं… पण तो हलू शकत नाही. त्याच्या डोळ्यातील निराशा पाहिली की, मला लाज वाटते. मी पोटच्या पोराला आजवर काय देऊ शकलो? फक्त प्रेम आणि अश्रू?

    …आणि माझी मुलगी… माझी छोटी लाडकी परी… ती मतिमंद आहे. बोलता येत नाही नीट, समजत नाही जग… तिला शाळेत पाठवायचंय… पण खर्च? तिच्या एका हसण्यानं मला अगदी जग जिंकल्यासारखं वाटतं!

    हेही वाचा – कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी

    पण रात्री कधी कधी छाती दडपून येते, थंड घाम सुटतो, छातीत बारीक कळ उमटते… तेव्हा प्रश्न पडतो, मी अचानक झोपेतच गेलो तर? नाही… नाही हे शक्य नाही… मला असं जाता येणार नाही!

    मी जागं रहातो, मी इमानानं जगतो, कुणाला फसवत नाही, कुणाला चुकीचं बोलत नाही… रोज रिक्षा चालवतो, थकतो आणि घरी येऊन सर्वांचे भेसूर चेहरे बघतो…

    हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!

    काय सांगू? शक्ती संपत आलीय, कर्ज वाढतंय, कमाई कमी होतेय, आईच्या गोळ्या दोन दिवसांपासून संपल्यात, बायकोच्या उपचाराला पैसे नाहीत, मुलाच्या औषधालाही नाहीत आणि मुलीच्या शाळेलाही नाहीत…! कर्ज काढलं, व्याज वाढलं, लोकं तगादा लावतात… त्यांचीही चूक नाही. जीव जाण्याच्या भीतीनं रात्री झोपत नाही.. एक विचार येतो, मी मेलो तर सगळं संपेल! पण… पण… चुकून जगलो तर? हे सगळे ‘मला’ कसं सांभाळता येणार?

    आज तुम्ही ईसीजी फुकट करणार, दोन दिवसांची औषधंही देणार… पण परवाचं काय? नकोच ते… माफ करा मला… फक्त एक पेनकिलर द्या… चुकीचंय हे मला माहिती आहे… पण चिंता करू नका, मी मरणार नाही, मला मरता येणारच नाही!”

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026 ललित

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026 ललित

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    By पराग गोडबोलेMay 25, 2026

    रविवारी, नेहेमीप्रमाणे डोंबिवलीत फडके रोडला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालो. रविवार सकाळची ही प्रदक्षिणा फार उत्साहवर्धक असते…

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 308
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 431
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 652
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.