Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!
एक जोडपं ओपीडीत आलं होतं. तिला ॲसिडिटी आणि डोकेदुखीचा त्रास होता… जुजबी पूर्वइतिहास विचारून, सगळे पॅरामीटर्स चेक करत तिला लक्षणजन्य औषधं दिली… पण दोघांच्या काहीतरी खाणाखुणा सुरू होत्या. “काही विचारायचं का?” मीच त्यांना विचारलं, तेव्हा “काही नाही डॉक्टर ही म्हणते तुम्हीही औषध घ्या,पण मला काही झालेलं नाही,” त्यानं हसत सांगितलं. “झालं नाही कसं? परवा कार्डिओलॅाजिस्टकडं जाऊन आले. ईसीजी केला होता… काल डायलमध्ये मी न्युरोचा नंबर बघितला…” तिनं तक्रार नोंदवली. “ठीक आहे, औषधं नका घेऊ… अगदी WHOत जाऊन दाखवा, पण एकदा सांगा तरी काय तक्रार आहे?” मी त्याला थोडं कम्फर्टेबल केलं. “काही नाही ओ डॅाक्टर, डोळे आणि नाक चुरचुरायचे म्हणून एका…
वैद्यकीय व्यवसायात दिवसाची सुरूवातच संवादानं होते… “काय होतंय? कधीपासून होतंय?” थोड्या वेळापूर्वी समोर एक तरुण त्याच्या आईसोबत येऊन बसला होता एकदम चिडीचूप… कदाचित तो विचारात असावा किंवा आजारपणामुळं गप्प असावा, असा माझा समज झाला अन् त्याचा मरगळलेला मूड बदलावा आणि त्यानं मनमोकळं बोलावं, या हेतूनं मी थोड्या हक्कानं आणि उत्साहानं म्हणालो, “अहो… बोला की!” पुढच्याच क्षणी त्याच्या आईनं खाली मान घालून अत्यंत क्षीण आवाजात उत्तर दिलं, “त्याला बोलता येत नाही डॉक्टर…” तो क्षण… आणि त्या ठिकाणी पसरलेली ती नीरव शांतता काळजाचा ठोका चुकवून गेली… माझ्या उत्साही स्वराचा प्रतिध्वनी मलाच अपराधी वाटू लागला… मी ज्याला ‘मूड’ समजत होतो, ते तर त्याचं…
सकाळीच ओपीडीत एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ आले. व्यवस्थित कपडे, देहबोलीत आत्मविश्वास… “डॉक्टर, बाकी सगळं ठीक आहे, फक्त रिपोर्टमध्ये थोडी साखर वाढलेली दाखवली आहे…” त्यांनी माझ्या हातात त्यांचे रिपोर्ट सुपूर्द करत सांगितलं. मी रिपोर्ट पाहिला Fasting, PP, HbA1c सगळेच स्पष्टपणे मधुमेहाकडं इशारा करत होते. “तुम्हाला डायबिटिस आहे,” मी शांतपणं सांगितलं. ते लगेच हसले, “नाही नाही डॉक्टर, आमच्या घरात कुणालाच नाही. मी चालतो-फिरतो, काम करतो मला डायबिटिस कसा असेल?” इथे सुरू झाली एक वेगळीच कथा… ही होती Denialची (नाकारण्याची) आणि त्यामागं लपलेली मानसिक प्रक्रिया Self-Serving Bias… Self-Serving Bias म्हणजे काय तर फक्त आपल्याला अनुकूल असलेली माहिती स्वीकारणं आणि नको असलेली माहिती नाकारणे!…
सकाळीच ओपीडीत एक तरुण आई आपल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती… म्हणाली, “डॉक्टर, खोकला आहे, पण औषध नको! प्लस तुमची फी देते, पण काही घरगुती उपाय असेल तर सांगा.” “का? औषधं का नको?” मी हसत विचारलं. “औषधांमध्ये केमिकल्स असतात ना! साइडइफेक्ट्स होतात प्लस सवय लागते… घरगुती उपाय, नैसर्गिक असतात तेच सेफ…”- माऊली पुटपुटली. इथं सुरू झाला एक परिचित, पण गुंतागुंतीचा विषय ‘Natural Fallacy’! ‘Natural Fallacy’ म्हणजे नैसर्गिक तर्कदोष; “जे नैसर्गिक आहे, तेच चांगलं आणि सुरक्षित आहे आणि जे औषध आहे ते कृत्रिम आणि त्यामुळं धोकेदायक” असा समज. हा विचार ऐकायला अत्यंत आकर्षक वाटतो, पण नेहमीच खरा असतो का? हेही…
“डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम बोललं जातं; ‘भूक लागत नाहीये’ म्हणजे काय? जेवावसं वाटत नाही? खाल्लं की पोट गच्च होतं? थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं? इच्छा होते, पण जात नाही की भावनाच उडाली? संकल्पनात्मक पातळीवर हे वाटतं तितकं सहज साधं प्रकरण नाही… आपल्याला भूक लागत नाही म्हणजे नेमकं काय होतं? कधीपासून सुरू झालं? त्याचे शरीरावर काय परिणाम झाले? याची ढोबळ का होईना कारणमीमांसा गरजेची असते. पेशंट जेव्हा म्हणतो, “भूक लागत नाही” तेव्हा डॉक्टरच्या डोळ्यांसमोर फक्त रिकामं ताट नसतं, तर तो मेंदू-पोट-संप्रेरके-भावना यांचा गुंतागुंतीचा खेळ उलगडत असतो. भूक न लागणं…
जपानस्थित ‘एकैशी’ पर्वतराजीत एक सुंदर आणि शांत झेनमठ होता. तिथं फक्त दोघंजणच रहात – एक वयोवृद्ध झेनगुरु युमा आणि त्यांचा एक तरुण उत्साही शिष्य इत्सुकी… शिष्य बुद्धिमान होता पण त्याला वाटायचं, “गुरुजी जे सांगतात तेच जगातलं अंतिम सत्य!” एकेदिवशी गुरुजींनी शिष्याला विचारलं, “तुला जगातलं सर्वात सुंदर दृश्य कोणतं वाटतं?” “गुरुजी, सूर्योदय! अंधारातून प्रकाश जन्म घेतो, तेच सर्वात सुंदर!” इत्सुकी लागलीच उत्तरला. गुरुजी काहीच न बोलता फक्त मंद हसले आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी शिष्याला पुन्हा बोलावलं आणि तोच प्रश्न विचारला, “आता सांग, सर्वात सुंदर दृश्य कोणतं?” “गुरुजी, उत्तर तर तेच आहे, सूर्योदय…” तो पुन्हा उत्तरला. हेही वाचा – आस्तिक आणि नास्तिक…
“डॉक्टर, ही गोळी घेतली तरच झोप लागते, घेतली नाही तर झोप लागत नाही,” पेशंटनं गोळ्यांचं रिकामं पाकीट दाखवलं. आजच्या अतिरिक्त मानसिक ताणतणावाच्या जगात ही आणि अशी औषधं अनेकांसाठी तारणहार झाली आहेत; पण हाच तारणहार डोस चुकला, औषधांची संख्या वाढली किंवा सल्ल्याशिवाय औषधं एकत्र घेतली तर, तीच जीवघेणी ठरू शकतात! असे पेशंट आले की, मला मेथड ॲक्टिंगचा राजकुमार अभिनेता ‘हिथ लिजर’ आठवतो… जोकरची भूमिका करून जगभरात खळबळ उडवणारा हा अभिनेता वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी अकाली गेला… ना ड्रग्सचा अतिरेक, ना आत्महत्येचा स्पष्ट हेतू… फक्त अफवांचा बाजार! मग नेमकं घडलं तरी काय? हिथ लिजरच्या मृत्यूमागे एक शब्द वारंवार वापरला जातो, तो म्हणजे…
एक 45च्या आसपासची टिपिकल भारतीय गृहिणी ओपीडीत आली होती. चेहरा उतरलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केसांची घनता कमी झालेली, खांदे झुकलेले, त्वचा निस्तेज आणि हातात नेहमीची फाईल… बिचारीची तक्रारही तिच्यासारखी साधीच होती, ”डॉक्टर, पोट काही केल्या नीट होत नाही. सारखं जुलाब, पोटात मुरडा, कधी उलटी, कधी अॅसिडिटी, कधी गॅसेस तर कधी नुसताच गच्चपणा…” नेहमीप्रमाणं कारणमीमांसा सुरू झाली – औषधं, पाणी, ताणतणाव, इतर आजारांचा इतिहास… पण सगळं ठीक! मग सहज विचारलं, ”जेवणाचं काय? तुम्हीच बनवता?” उत्तर आलं, अगदी अभिमानानं… “हो डॉक्टर, मीच बनवते.” हेही वाचा – त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’ “…आणि काहीच वाया घालवत नाही?” – मी. “हो.…
फूड पॉयझनिंग झालेली दोन भावंडं ओपीडीत आली होती. कालही तीन मित्रांनी याच तक्रारीसाठी, डे-केअर ट्रीटमेंटही घेतली होती आणि सकाळपासून आमच्या एका सिस्टरलाही सेम त्रास सुरू होता… रजिस्टर मागवून कालच्या मित्रांपैकी एकाला फोन केला, त्यानं मित्रासोबत बर्गर खाल्ल्याचं समजलं. आज आलेल्या भांवडांनी सुद्धा बर्गर खाल्ला होता आणि सिस्टरनंही काल बर्गरच खाल्ला होता! मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, आणि हा योगायोग निश्चितच नव्हता. या सगळ्यांनी एकाच ठिकाणी बर्गर खाल्ला होता… ‘जस्ट डायल’वरून त्याचा फोन नंबर शोधला आणि दूषित सोर्सची माहिती घ्यायला सांगत, त्यांनी असे न केल्यास कायदेशीर तक्रार नोंदवावी लागेल, अशी पुस्तीही जोडली. कधीकधी ब्योमकेश बक्षीसारखं सत्यान्वेषी व्हावं लागतं! डॉट्स जुळले की,…
डोकं दुखत असलेली एक महिला ओपीडीत आली होती, चौकशीअंती नुकतीच तिची प्रसुती झाल्याचं कळलं आणि बाळ रात्रभर त्रास देत असल्यानं पुरेशी झोप होत नसल्याचं कारणही समोर आलं. आपल्याकडं बाळ प्लान करणं म्हणजे ‘होऊ देणं’ किंवा ‘न होऊ देणं’ इथपर्यंतच मर्यादित आहे! या बदलास कसं सामोरं जायचं? कसं मॅनेज करायचं? प्लान ए बी सी काय असणार आहे? बॅकअप कसा देणार? याबद्दल कुणीच सारासार विचार करत नाही, किंबहुना विचार करणाऱ्यांना वेड्यात काढलं जातं… लक्षणजन्य औषधं देत तिला रवाना तर, केलं पण इकडं मला रँडी गार्डनरची आठवण झाली… साल 1964 असावं… अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधला सॅन डिएगोचा एक साधासुधा माध्यमिक शाळेतला विद्यार्थी रँडी गार्डनर. ना…

