Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…
    आरोग्य

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरMay 20, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, संशयाचे भूत, संशयपिशाच्च, पत्नीबद्दल तरुणाचा संशय, पत्नीचे हसणे संशयास्पद, पत्नीचे फोनवर बोलणे संशयास्पद, तरुणाचा मानसिक आजार, ॲाथेल्लो सिंड्रोम, डिल्यूजनल जेलसी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

     

     

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    अजून टेबल टिश्यूनं पुसायचं राहिलं होतं; प्रिस्क्रिप्शन पॅड-पेन वगैरे अद्यापही ड्रॉव्हरमधून काढलं नव्हतं…. तोच चटकन तो आत ओपीडीत आला…

    तो – डॉक्टर, भयंकर डोकं दुखतंय…

    मी – हो, पलीकडं पडा, मी चेक करतो…

    तो – दोन दिवस झालेत झोप नाही.

    मी- तपासतो…

    तो – ती मला फसवत आहे!

    आताशा त्याचा आवाज थरथरायला लागला होता; रागानं नव्हे तर, एका खोलवर दाटून आलेल्या आतल्या एका अनामिक भीतीनं…

    थोडक्यात माहिती घेतली. वय साधारण 38 वर्षं. खासगी बांधकाम व्यावसायिकाकडं काम करणारा… सुसंस्कृत, उच्चशिक्षित.

    बायकोचीही खासगी ठिकाणी कंत्राटी नोकरी, दहा वर्षांचा संसार… बाहेरून सगळं परफेक्ट, पण त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी घुसलं होतं – ते म्हणचे संशयपिशाच्च!

    हेही वाचा – Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!

    अजून माहितीअंती कळलं की, सगळं सुरू झालं एका अत्यंत अशा साध्या प्रसंगानं… एक दिवस त्याच्या पत्नीचा फोन ‘व्यस्त’ आला. दुसऱ्या दिवशी तिनं नवीन साडी नेसली आणि तिसऱ्या दिवशी कामावरून थोडी उशिराच घरी आली इतकंच…

    पण एवढ्यानं त्याच्या मनात एक वाक्य कोरलं गेलं ते म्हणजे, ”ती काहीतरी लपवतेय!”

    अन् मग संशयानं खतपाणी घालायला सुरुवात केली. जे कधी अस्तित्वातच नव्हते, असे पुरावे त्यानं जमा करायला सुरुवात केली… तो तिचा फोन तपासू लागला. त्याला व्हॉट्सॲपवरचे काकांचे साधे Good Morning सदृश्य मॅसेजेस संशयास्पद वाटू लागले!

    तिच्या कार्यालयातला शिपाई “जास्तच हसतो” असा साक्षात्कार त्याला झाला… ”माझ्याकडे पुरावे आहेत” अधूनमधून तो पुटपूटू लागला…

    पुरावे काय? तर तिचा आवाज फोनवर कधी कधी वेगळा वाटतो, ती अलीकडं जास्त वेळ आरशासमोर थांबते, ती माझी आधीसारखी काळजी घेत नाही… सगळं काही तथ्यहीन! पण त्याच्यासाठी ते अढळ सत्य होतं. हळूहळू मनातली जळजळ वाढत जाऊन आता संशय फक्त विचार राहिला नव्हता, तर तो त्याची आंतरिक भावना बनला होता. राग, मत्सर, अपमान, भीती सगळं एकत्र…

    तो अचानक तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊ लागला. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी करू लागला. घरात सीसीटीव्ही बसवायचा विचार करू लागला… बायको प्रारंभी रडत म्हणायची, ”मी काहीच चुकीचं केलेलं नाही…” पण तो ऐकायला तयार नव्हता… आता तिनं याला इग्नोर करायला सुरूवात केली, याची चिडचिड अजूनच वाढत चालली…

    तणाव – निद्रानाश – चिडचिड यांचं चक्रव्यूह तयार झालं..

    आता निदानाचा क्षण आला होता, मी आता त्याला एक प्रश्न विचारायचं ठरवलं, जो कदाचित ‘निर्णायक’ ठरणार होता…

    मी शांतपणं विचारलं, ”जर उद्या त्यांच्या सगळ्या मैत्रीणी, सगळे पुरूष सहकर्मचारी लेखी देणार असतील की, तुमची पत्नी निर्दोष आहे, तर तुम्ही ते मान्य कराल?”

    तो क्षणभर थांबला… आणि म्हणाला, ”नाही, ते कशाला खरं बोलतील? उलट सगळे मिळून मला फसवतीलच!”

    इट्स क्लिअर कट केस ॲाफ ‘डिल्यूजनल जेलसी’ अर्थातच निव्वळ संभ्रम; याला वैद्यकिय भाषेत ‘ॲाथेल्लो सिंड्रोम’ म्हणतात जिथं तर्क, पुरावा, वास्तव सगळं अपयशी ठरतं…

    काही दिवस झोपेसाठी, तणावशामक, मूड इलेवेटर्स अशी लक्षणजन्य औषधं दिले की, हळूहळू नक्कीच फरक पडेल… पण त्या इतकंच महत्त्वाचं असेल, पत्नीला दोषमुक्त करणं, तिची सुरक्षितता तपासणं आणि फक्त दोघांचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं समुपदेशन करणं…

    हेही वाचा – …यह तो अलगही ‘केमिकल लोच्या’

    लगेच नाही पण हळूहळू का होईना, संशयाची तीव्रता कमी होत जाईल आणि एक दिवस गडी स्वत:च म्हणेल, ”डॉक्टर, कदाचित मीच जरा जास्त विचार करत होतो…” आणि हे वाक्यच बदलाचा पहिला टप्पा असेल..

    शेक्सपियरचा ॲाथेल्लोही याच संशयामुळं डेस्डेमोनाचा जीव घेतो… आधुनिक ॲाथेल्लो सिंड्रोम जर वेळेवर ओळखला नाही तर, प्रकरण चिघळू शकतं..

    मानसिक आजार कुठलाही असो समस्या समोरच्याच्या वागण्यात नव्हे तर, ती रुग्णाच्या मेंदूत तयार झालेल्या चुकीच्या धारणेत असते!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    भूक लागत नाही?

    August 19, 2026 आरोग्य

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026 आरोग्य

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    भूक लागत नाही?

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरAugust 19, 2026

    “डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम…

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.