Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    May 27, 2026

    वैद्यकीय सल्ला म्हणजे उपचाराचा आत्मा!

    May 27, 2026

    असेही काही तर्काच्या पलीकडचे!

    May 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वैद्यकीय सल्ला म्हणजे उपचाराचा आत्मा!
    आरोग्य

    वैद्यकीय सल्ला म्हणजे उपचाराचा आत्मा!

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरMay 27, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, डॉक्टरी सल्ल्याचे महत्त्व, औषधोपचारांची गरज, औषधोपचाराबरोबर सल्ला महत्त्वाचा, डॉक्टरी सल्ला, उपचाराची दिशा, डॉक्टरी सल्ला रोडमॅप, औषधांना व्यायामाची जोड महत्त्वाची, औषधोपचाराला पूरक आहार गरजेचा,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “डॉक्टर, औषधं नियमित घेतो मी… सल्ला वगैरे काही नको,” दर महिन्याला बीपी-शुगरची औषधं लिहून घ्यायला आलेले काका दरवेळी सांगत… आणि हे वाक्य ते इतक्या आत्मविश्वासात बोलत की, जणू औषधं म्हणजेच वैद्यक आणि बाकी सगळं निव्वळ बकवास! वय साठीच्या आसपास, वजन थोडंसं जास्त पण रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही ‘नियंत्रित’ असं त्यांचं ठाम मत!!

    कंट्रोलमध्ये कसं? तर “गोळ्या चालू आहेत ना!”

    मधुमेहाची एक गोळी सकाळी आणि एक संध्याकाळ, बीपीची एक सकाळी, कोलेस्ट्रॉलची एक रात्री गोळी रात्री… बस्स… एवढंच!!

    अन् आहार, विहार, व्यायाम, तपासण्या, डोस बदल वगैरे हे सगळं त्यांच्या दृष्टीने डॉक्टरांचे छंद!

    “गोड कमी करा,” सांगितलं तर, ठरलेलं उत्तर – “फक्त चहाच तर पितो.”

    “मीठ कमी ठेवा,” म्हटलं तर “थोडंसं जास्त झालं तर काय फरक पडतो? गोळी तर घेतोय…”

    वर्षानुवर्षे अशीच चालली; औषधं जोमात पण सल्ला कोमात…

    एके दिवशी चप्पल चावल्याचं निमित्त झालं अन् सकाळी काका थेट बेशुद्ध झाले. घरच्यांनी इमर्जन्सीत मोठ्या रुग्णालयात नेलं… आंखों के सामने अंधेरा चट्टान की तरह अडिग, हाथ-पैर सुन्न… जैसे कोई सांप सूंघ गया हो, शुगर तारामंडल में और बीपी भी आसमान छूता हुआ…

    इन्स्टिट्यूट्सचे प्रोटोकॅाल्स असतात, त्यांनी यच्चयावत सगळ्या तपासण्या केल्या, HbA1c वाढलेलं, किडन्यांचा बॅंड वाजलेला, लिव्हरवर सूज.. तिथं आठेक दिवसांत लाखो रुपयांना चुना लावून काका तिथं फॅालो-अप देण्याआधी आज माझ्याकडं आले होते…

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    “पण डॉक्टर… मी औषधं तर घेत होतो,” काकांनी ठेवणीतलं वाक्य फेकलं.

    यावर त्यांना जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो…

    “हो, औषधं घेत होतात पण वैद्यकीय सल्ला? तो कुठं पाळत होतात? स्पोर्ट श्यूज वापरायचा सल्ला दिला होता, घेतले? दिवसातून एकदा पंधरा मिनिटे डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी ठेवण्याचा सल्ला दिला होता, पाळला? योग – जिम काहीतरी जॅाइन करायला सांगितलं होतं, केलं? औषधं म्हणजे फक्त एक साधन असतं, पण सल्ला म्हणजे ‘रोडमॅप’ असतो. औषधं घेतल्यानं आकडेवारी नियंत्रणात राहते, पण सल्ला न पाळल्याने उपचाराची दिशाच भरकटते… वैद्यकीय सल्ला म्हणजे भाषण नव्हे, तो उपचाराचा आत्मा असतो..,”

    हेही वाचा – Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!

    थोडक्यात औषधं काय करायचं, हे ठरवत असले तरी वैद्यकीय सल्ला कसं? कधी? किती? हे शिकवतो… सल्ला न पाळता फक्त औषधं घेणं म्हणजे नकाशा न पाहता गाडी चालवणं! कुठं पोहोचाल याची अजिब्बात खात्री नसते, पोहोचाल पण कधी? याचीही शाश्वती नसते, कारण वैद्यक हे गोळ्यांइतकंच ‘शहाणपणावर’ चालतं!


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026 आरोग्य

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026 आरोग्य

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    By रविंद्र परांजपेMay 23, 2026

    मागील दोन लेखांत आपण लेखनातून आणि वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या…

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 16, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    May 27, 2026

    वैद्यकीय सल्ला म्हणजे उपचाराचा आत्मा!

    May 27, 2026

    असेही काही तर्काच्या पलीकडचे!

    May 27, 2026

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026

    Dnyaneshwari : पुत्राचे अपराध, जरी जाहले अगाध

    May 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मे 2026

    May 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 310
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 433
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 215
    • मैत्रीण 19
    • ललित 657
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    May 27, 2026

    वैद्यकीय सल्ला म्हणजे उपचाराचा आत्मा!

    May 27, 2026

    असेही काही तर्काच्या पलीकडचे!

    May 27, 2026
    Most Popular

    दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    May 27, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.