Author: Team Avaantar

हेमा पाटील भाग – 1 “व्हय गं, वरुटा कुटं हाय? आधी पाळण्यात वरूटा घालायचा आस्तो. आक्षी पैलटकरीन असल्यागतच वागतीयास जनू!” सासूच्या या दरडावत बोलण्याने बाळाला अंगावर पाजत असलेली उमा गोरीमोरी झाली. बाळाला ताईसाहेबांच्या मांडीवर देऊन ती स्वयंपाकघरात आली. तिथला वरवंटा घेऊन तिने कापडाने स्वच्छ पुसला आणि तो घेऊन ती बाहेर आली. त्या वरवंट्याला झबले, टोपडे घालून तिने तो वरवंटा सासूबाईंच्या हातात दिला. पारूबाईंनी तो वरवंटा हातात झेलत आपल्या लेकींना हाका मारल्या… “व्हय गं सारजे, लक्षुमी, यश्वदे या की हिकडं. बाळाला पाळण्यात घालायचा मान आत्याचा आस्तो. तुम्ही कुटं घुटमळत बसलाय? व्हा की पुढं…” आईचा खणखणीत आवाजात झालेला नावाचा गजर ऐकून बाळाच्या…

Read More

अध्याय तेरावा आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूचे ॥1॥ जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे । सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥2॥ वक्तृत्व गोडपणें । अमृतातें पारु म्हणे । रस होती वोळगणें । अक्षरांसी ॥3॥ भावाचें अवतरण । अवतरविती खूण । हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेदें ॥4॥ श्रीगुरूचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय । तैं येवढें भाग्य होय । उन्मेपासी ॥5॥ ते नमस्कारूनि आतां । जो पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसें म्हणे ॥6॥ श्रीभगवानुवाच :- इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥1॥ पार्था परिसिजे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 04 आषाढ शके 1948; तिथि : एकादशी 20:08; नक्षत्र : स्वाती 16:28; योग : शिव 10:53; करण : वणिज 07:08; सूर्य : मिथुन; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 निर्जला एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष इंग्रज कादंबरीकार जॉर्ज ऑर्वेल टीम अवांतर इंग्रज कादंबरीकार, स‌मीक्षक आणि विचारवंत जॉर्ज ऑर्वेल यांचा जन्म 25 जून 1903 रोजी भारतातील मोतीहारी (बंगाल) येथे झाला. त्यांचे खरे नाव होते…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पांडुसुता । ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥238॥ ऐसें निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें । बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥239॥ राया जो निर्मळु । निष्कल लोककृपाळु । शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥240॥ जो धर्मकीर्तिधवळु । अगाध दातृत्वें सरळु । अतुलबळें प्रबळु । बळिबंधनु ॥241॥ जो पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥242॥ जो भक्तजनवत्सलु । प्रेमजनप्रांजलु । सत्यसेतु सकळु । कलानिधी ॥243॥ तो कृष्णजी वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा । सांगतुसे येरु दैवाचा । आइकतु असे ॥244॥ आतां ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 जून 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 03 आषाढ शके 1948; तिथि : दशमी 18:11; नक्षत्र : चित्रा 13:58; योग : परिघ 10:22 ; करण : वणिज अहोरात्र; सूर्य : मिथुन; चंद्र : तुळ ; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे टीम अवांतर रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म 24 जून 1892 रोजी नागपूर येथे झाला. मुंबई विद्यापीठातून…

Read More

हिमाली मुदखेडकर भाग – 4 पहिल्या सुनावणीनंतर जवळपास दोन महिने उलटले होते. मध्यंतरीच्या काळात आणखी दोन सुनावण्या होऊन गेल्या होत्या. त्या दिवशी ॲड. विभा शेलार यांनी अनिकेत पुरंदरेला आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. टेबलावर अनेक फाइल्स, कागदपत्रं आणि नोट्स पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा अधिक गंभीर भाव होते… “आपल्याला आणखीन जास्त विस्तृत स्वरूपात मांडावा लागेल आपला मुद्दा, त्याकरिता आणखी पुरावे लागतील. सानिकाच्या मनात नेमके काय चालले होते, ते तर आता सांगू शकत नाही. म्हणूनच तिच्या आठवणींना साक्षीदार बनवायचं आहे,” त्या म्हणाल्या. अनिकेत शांतपणे ऐकत होता. विभा पुढे म्हणाल्या, “तिची पर्सनल डायरी… डॉक्टरांशी संवादाचे ई-मेल्स… अगदी व्हॉटसॲपवरील त्यासंदर्भातील चॅटिंग सुद्धा! एकूणच जुन्या…

Read More

नीलिमा कदम जांगडा चपाती शेकताना जेव्हा कधी कधी वाफ हातावर येते, तेव्हाच्या पोळल्याच्य वेदना कुकरचा, तव्याचा चटका लागल्यावरची भगभग तुझ्या माझ्या स्त्रियांशिवाय कशा कोणाला कळणार? हे सगळं नेमकं उजव्या हातालाच होतं! अजून कामं उरकायची आहेत मलम कसं लावणार? हा प्रॉब्लेम तुझ्या माझ्याशिवाय इतरांना कसा समजावणार…? बहिणाबाईंनी म्हणून ठेवलंय ‘आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’ आजही हे घडतंच आहे… चूल जाऊन गॅस, इंडक्शन आले तरीही चटका अजूनही बसतोच आहे… आता कुठे नदीवर जाऊन कपडे धुवायचेत वॉशिंन मशीन दिमतीला आहे… पण तिचं शर्टची कॉलर चोळणं, सॉक्स चोळून मगच मशीनमध्ये टाकणं हे रोजच सुरू आहे… हेही वाचा – स्मृतीगंध… गाण्यांची वही हल्लीची मुलं बारा…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥20॥ ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥230॥ तैसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे । जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥231॥ परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसीं । मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥232॥ परि मातें परम करूनि । इयें अर्थीं प्रेम धरूनि । हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥233॥ पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी । उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥234॥ तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 जून 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  02 आषाढ शके 1948; तिथि : नवमी 16:39 ; नक्षत्र : हस्त 11:53; योग : वरियान 10:12 ; करण : तैतिल 29:22; सूर्य : मिथुन; चंद्र : कन्या 24:52 ; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नाटककार वसंत शांताराम देसाई टीम अवांतर नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई यांचा जन्म 27 डिसेंबर 1904 रोजी झाला. मराठी रंगभूमीचा चालता बोलता कोश…

Read More

हिमाली मुदखेडकर भाग – 3 याचिका दाखल होऊन आता जवळपास तीन महिने उलटले होते. या तीन महिन्यांत अनिकेतचं आयुष्य पुन्हा एकदा बदललं होतं. पूर्वीची निराशा… मरगळ… जाऊन बर्‍यापैकी त्याच्यात ध्येयासक्ती दिसून येत होती. दोन वर्षापासून जगण्याचं कारण शोधणारा तो आता कोर्टाच्या पायऱ्या चढत, उतरत होता. त्याला मिळालेल्या आशेच्या किरणांसाठी त्याला संपूर्ण व्यवस्थेशी लढावं लागणार होतं 0000 त्या सकाळी न्यायालयाच्या इमारतीसमोर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. वकील, पक्षकार सगळ्यांची लगबग सुरू होती. कोर्टाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या अनिकेतच्या हातात फाइल होती. हात किंचित थरथरत होते. आयुष्यात पहिल्यांदाच तो कोर्ट-कचेरीचा अनुभव घेत होता. “घाबरलात?” ॲड. विभा शेलारांनी विचारलं. “खरंतर हो… याआधी कधीच मी…” “काळजी वाटणे साहजिक…

Read More