Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आत्म्याचा खरा साक्षात्कार
    अध्यात्म

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीSeptember 24, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, माया, द्वैत अद्वैत, आद्य शंकराचार्य माया, ज्ञानाचा प्रकाश, सत्यज्ञान, आत्म्याचा खरा साक्षात्कार
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माया / भाग – 5

    सर्वेषु भूतमात्रेषु

    आत्मभावो यदा भवेत्।

    शत्रुं मन्येत को तत्र

    वह्नौ शैत्यं यथा भवेत्॥

    – गीताव्रत

    आपण अनेकांना आपले मित्र मानतो, तर काहींना आपले शत्रू मानतो. हा मैत्रीचा आणि शत्रुत्वाचा भाव आपल्या मनात का निर्माण होतो, तर जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा वेगळे मानतो, तेव्हाच तिथेच द्वेष किंवा स्पर्धा निर्माण होऊ शकते. पण ज्या साधकाच्या अंतःकरणात सर्व भूतमात्रांविषयी म्हणजेच जगातील प्रत्येक सजीवाविषयी आत्मभाव निर्माण झाला आहे, त्याच्या बाबतीत काय होते? आत्मभाव म्हणजे जो आत्मा माझ्यात आहे, तोच आत्मा समोरच्या व्यक्तीतही प्रकाशत आहे, ही अत्यंत प्रखर जाणीव म्हणजे आत्मभाव! एकदा का ही जाणीव झाली की, कोणालाही शत्रू मानणे हे पूर्णपणे अशक्य आणि हास्यास्पद वाटते.

    आद्य शंकराचार्यांनी यासाठी अत्यंत सुंदर उदाहरण दिले आहे की, “अग्नीत थंडपणा इच्छिण्यासारखेच ते आहे.” अग्नीचा मूळ स्वभाव जाळणे, उष्णता आणि प्रकाश देणे हा आहे; तिथे थंडपणा कसा सापडणार. “आत्म्याचा स्वभाव हा पूर्णपणे एकत्व आणि प्रेमाचा आहे, तिथे शत्रुत्व कसे सापडणार?”

    आपण संत मुक्ताबाईने दिलेले उदाहरण घेऊया! मुक्ताबाई रागावलेल्या ज्ञानेश्वरांना म्हणतात,  “आपण जेवत असताना अनेकदा चुकून आपलाच दात आपल्याच जिभेला जोरात चावतो आणि आपल्याला खूप वेदना होतात. पण त्या वेळी आपण काय करतो. आपण रागाने तो दात पाडून टाकतो का? नक्कीच नाही. कारण दात आणि जीभ हे दोन्ही एकाच शरीराचे भाग आहेत हे आपल्याला पक्के माहीत असते. जिथे असे अद्वैत असते तिथे सूड घेण्याची किंवा शत्रू मानण्याची भावना कधीच निर्माण होत नाही.

    हेही वाचा – अहंकाराचे समूळ उच्चाटन करणारे सत्यज्ञान

    ज्ञानी माणसाचे या संपूर्ण विश्वावर असेच अद्वैत प्रेम असते.

    दिक्कालकार्यकारणैः

    आत्मनो न हि बन्धनम्।

    आत्मचिन्तनमग्नस्य

    कालादिभिर्न बन्धनम्॥

    – गीताव्रत

    आपले आयुष्य तीन मुख्य गोष्टींनी बांधलेले असते आणि त्या गोष्टी म्हणजे काळ, दिशा आणि कार्यकारणभाव! आपण वेळेच्या बंधनात असतो. आपण एखाद्या विशिष्ट जागी म्हणजे दिशेत किंवा अवकाशात असतो आणि आपण जे काही करतो, त्याला एक कारण असते आणि त्याचे एक फळ किंवा कार्य असते. पण आपला जो मूळ आत्मा आहे, त्याचा या तिन्ही गोष्टींशी काहीएक संबंध नसतो. त्यामुळे जो महापुरुष नेहमी आत्मचिंतनात मग्न असतो, त्याला या काळाशी आणि दिशांशी काहीही कर्तव्य उरत नाही.

    चित्रपटात पडद्यावर नायक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करताना दिसतो. त्या चित्रपटात अनेक वर्षे उलटून गेलेली दिसतात. नायक लहानाचा मोठा होतो. कधी डबल रोल असतो. कधी नायक मरण पावतो आणि त्याचा मुलगा म्हणून तोच नायक पुन्हा तसाच्या तसा पडद्यावर येतो. काही घटना घडतात आणि त्याचे परिणाम तिथे दिसतात. पण या सर्व गदारोळात तो जो मूळ पांढरा पडदा आहे, तो कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. त्या पडद्याचे वय वाढत नाही. एवढ्या वेळेत पडदा म्हातारा होत नाही. खूप मोठा गोळीबार होतो, पण पडद्याला एकही गोळी लागत नाही. काळ दिशा आणि सर्व घटना केवळ त्या चित्रपटात असतात मूळ पडद्यावर त्यांचा कोणताही ओरखडा उमटत नाही. चित्रपट संपला की, पडदा तिथेच आणि तसाच अलिप्त उरतो. आपला आत्मा हा त्या पडद्यासारखा आहे. त्याच्यावर जन्म आणि मृत्यूचे अनेक चित्रपट येतात आणि जातात पण आत्मा कोणत्याही काळाने वयाने किंवा दिशेने कधीच बांधला जात नाही, तो नेहमीच सर्वव्यापी आणि सनातन असतो.

    यथाकाशं विशुद्धं हि

    न लिप्तं वस्तुना भवेत्।

    तथात्मा सर्वभूतेषु

    जरामृत्युविना भवेत्॥

    – गीताव्रत

    आकाशात अनेक गोष्टी घडत असतात. कधी काळेभोर ढग दाटून येतात, कधी विजांचा कडकडाट होतो, कधी प्रचंड पाऊस पडतो, तर कधी एखादे विमान त्यातून उडत जाते. आकाशात सुगंधही असतो आणि दुर्गंधीही असते. पण इतके सर्व होऊनही ते शुद्ध आणि असीम आकाश कोणत्याही वस्तूला चिकटत नाही किंवा कोणत्याही गोष्टीने ते लिप्त आणि दूषित होत नाही. धूर आकाशातच विरघळतो, पण आकाशाला तो कधीच काळे करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्राणिमात्रांच्या ठायी वसत असलेला आपला आत्मा अत्यंत शुद्ध आणि अलिप्त असतो. तो अनेक शरीरांमध्ये प्रवेश करतो… शरीर लहानपणापासून म्हातारपणाकडे जाते… शरीराला विविध रोग होतात… आणि शेवटी ते शरीर मृत्यू पावते. पण या सर्व प्रवासात आत्मा कोणत्याही शरीराच्या दोषांनी लिप्त होत नाही. तो जरा म्हणजेच म्हातारपण मृत्यू आणि भय या सर्व गोष्टींपासून पूर्णपणे मुक्त असतो.

    आरशासमोर जर आपण एखादा पेटता दिवा ठेवला, तर आरशात आगीचे प्रतिबिंब दिसते, पण तो आरसा स्वतः कधीच भाजून निघत नाही. आरशासमोर बर्फ ठेवला, तर आरसा थंडीने कुडकुडत नाही. तसेच, देहात राहूनही आत्मा देहाच्या कोणत्याही अवस्थेने दूषित होत नाही; तो नेहमी आपल्या मूळ शुद्ध स्वरूपातच विद्यमान असतो.

    नित्यमुक्तस्य मे लोके

    कर्तव्यं किं नु शिष्यते।

    ज्ञानरूपस्य शुद्धस्य

    ह्यज्ञानं नैव शिष्यते॥

    – गीताव्रत

    मनात नेहमी अस्वस्थता असते की, मला अमुक एक गोष्ट करायची आहे, माझे अमुक एक कर्तव्य पूर्ण करायचे आहे, किंवा माझ्या आयुष्यात ही गोष्ट करायची राहून गेली. आपण आयुष्यभर याच कर्तव्यांच्या ओझ्याखाली जगत आलेलो असतो. पण जो ज्ञानी मनुष्य आहे, तो अत्यंत खात्रीने म्हणतो की, नित्यमुक्त अशा मला माझे कोणतेही कर्तव्य उरणे शक्य नाही. कारण, आत्मा हा पूर्णपणे शुद्ध ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्यात अज्ञानाचा कोणताही लवलेश नसतो आणि जिथे अज्ञान नाही, तिथे कोणतेही कर्तव्य उरत नाही. हे अतिशय गोड सत्य आपण एका वेगळ्या दृष्टांतातून समजून घेऊया. म्हणून आत्म्याशी शक्य तितका आवर्जून संपर्क असावा.

    एक अतिशय कष्टाळू प्रामाणिक विद्यार्थी आहे, जो रात्रंदिवस अभ्यास करतो आहे. तो परीक्षा देतो, पास होत जातो आणि शेवटी त्याला सर्वोच्च पदवी प्राप्त होते. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला पुन्हा शाळेत जाऊन पहिलीची पाटी गिरवण्याचे कोणतेही कर्तव्य उरेल का? तर, नक्कीच नाही. कारण त्याने ज्ञानाचे अंतिम ध्येय गाठलेले असते.

    नदी जेव्हा डोंगरातून उगम पावते, तेव्हा ती वेगाने धावते, धडपडते, खडकांशी संघर्ष करते, कारण तिला समुद्राला मिळायचे असते. पण, एकदा का ती नदी अथांग समुद्रात जाऊन विलीन झाली की, मग तिचा तो वेग आणि तिचा तो संघर्ष पूर्णपणे थांबतो. तिला आता कुठेही पोहोचण्याची घाई नसते, कारण ती स्वतःच समुद्र झालेली असते. आत्मज्ञानी स्त्री -पुरुषांची अवस्था या समुद्राला मिळालेल्या नदीसारखी असते. त्याने आत्म्याचे सर्वोच्च शिखर गाठलेले असते, त्यामुळे त्याला जगात मिळवण्यासारखे किंवा करण्यासारखे कोणतेही लौकिक कर्तव्य शिल्लक राहत नाही.

    निर्गुणो निरवद्यश्च

    शुद्ध आत्मा हि कीर्तितः।

    मनोवाचामगोचरो

    निर्विशेषो हि कीर्तितः॥

    – गीताव्रत

    आत्म्याचे वर्णन करताना आपली भाषा आणि आपली बुद्धी अतिशय थिटी पडते. आत्मा हा निर्गुण आहे, म्हणजे त्याच्यावर प्रकृतीच्या कोणत्याही गुणाचा प्रभाव नाही. तो अवर्णनीय आहे, त्याचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही. तो निरवयव आहे, म्हणजे त्याला हात पाय डोळे असे कोणतेही अवयव नाहीत. तो निर्विशेष आणि अत्यंत शुद्ध आहे. आपले मन आणि आपली वाणी त्या आत्मतत्वापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत.

    हेही वाचा – अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    जन्मापासून अंध असलेल्या इसमाला आपण लाल रंग कसा असतो, हे समजावून सांगायचा प्रयत्न केला तर, आपण काय सांगणार? आपण त्यासाठी कितीही शब्द वापरले, कितीही उदाहरणे दिली, तरी त्याला लाल रंगाची अनुभूती कधीच येणार नाही. कारण, तो रंग केवळ पाहण्याची गोष्ट आहे, बोलण्याची नाही. साखरेची गोडी शब्दांत कशी मांडणार? ती गोडी फक्त जिभेवर ठेवल्यावरच अनुभवता येते. त्यावर हजार पानांचा ग्रंथ लिहिला तरी, चव चाखल्याशिवाय गोडी कळणार नाही. आपले मन आणि आपली वाणी हे केवळ बाह्य जगातील आकारांचे आणि वस्तूंचे वर्णन करण्यासाठी बनलेले आहेत. आत्मा हा कोणत्याही आकाराचा नाही, तो तर साक्षात अनुभव आहे. शब्दांच्या सहाय्याने आपण आत्म्याकडे बोट दाखवू शकतो, पण शब्द म्हणजे आत्मा नव्हे.

    बोट दाखवून चंद्र दाखवता येतो, पण ते बोट म्हणजे चंद्र नसतो… चंद्र पाहण्यासाठी बोटाच्या पलीकडे पाहावे लागते. आत्माही तसाच! आत्म्याला जाणण्यासाठी वाणी आणि मनाच्या पलीकडे जाऊन अत्यंत निःशब्द अवस्थेत प्रवेश करावा लागेल! तिथेच आत्म्याचा खरा साक्षात्कार होतो.

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी

    September 23, 2026 अध्यात्म

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    By Team AvaantarSeptember 24, 2026

    अध्याय तेरावा सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्रें सिंधु भरे । तैसा मातुला रसु आदरें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी

    September 23, 2026

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    September 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 447
    • अवांतर 214
    • आरोग्य 149
    • पंचांग आणि भविष्य 596
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 941
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.