Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अनोखी भाऊबीज
    ललित

    अनोखी भाऊबीज

    ॲड. कृष्णा पाटीलBy ॲड. कृष्णा पाटीलSeptember 24, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, ॲड कृष्णा पाटील, लेखक कृष्णा पाटील, भाऊ बहीण, भावाचे प्रेम, नवऱ्याची दहशत, प्रॉपर्टीचा वाद, जमिनीचा वाद, भावाविरुद्ध खटला, नवऱ्याचा ईगो, नवऱ्याचे दारू व्यसन, वैशाली विशाल ढेरे, भावाच्या मनाचा मोठेपणा, समंजस भाऊ, अनोखी भाऊबीज,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    उत्तरार्ध

    विशाल आणि वैशाली ढेरे घाटे वकिलांकडे आले होते.  “मला माझ्या भावावर वाटणीचा दावा ठोकायचा आहे,” असं वैशाली ढेरेने सांगितलं. जुने सातबारे… फेरफार नोंदी… खरेदीखतांच्या प्रती… कराच्या पावत्या.. बँकेची काही कागदपत्रं… आणि त्याखाली काही पोस्टाची पत्रं… हे सर्व टेबलावर ठेवलं. घाटे वकिलांनी कागदांचा गठ्ठा हातात घेतला. सर्व कागदपत्रे पाहून झाल्यावर वकिलांनी तो गठ्ठा बाजूला ठेवला. तेवढ्यात त्यांच्या हाताला एक जुनं पोस्टाचं पत्र लागलं. कागद पिवळा पडला होता. कोपऱ्यावरच्या दुमडी झिजल्या होत्या. त्यांनी ते जीर्ण पत्र उघडलं. दोन ओळी वाचल्या. मग ते पुन्हा तिच्याकडे पाहू लागले…

    “तुम्हा बहीणभावाचं एकमेकांवर प्रेम तर भरपूर दिसतंय.”

    तिच्या चेहऱ्यावर काहीतरी हललं. बाईच्या पापण्या लवलवलल्या. डोळे ओले झाले.

    “हे पत्र बघा…” वकिलांनी पत्रातील ओळी पुन्हा वाचल्या…

    “आई-बाबा नाहीत म्हणून तू स्वतःला एकटी समजू नकोस. मी आहे ना. तुला थॅलेसेमिया नावाचा आजार आहे. दर सहा महिन्याला रक्त चढवावे लागते. आपल्या दोघांचा रक्तगट एकच आहे. त्यामुळे मी आतापर्यंत तुला रक्त देत आलो. यापुढेही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला रक्त देत जाईन. काही काळजी करू नकोस…”

    विशालने बोलण्यास सुरुवात केली, “माझं आणि माझ्या मेव्हण्याचं भांडण झालंय. काल त्याला सहज फोन केला होता. म्हटलं, बहिणीच्या हिश्श्याची एवढी जमीन खातोस… कधीतरी बहिणीला साडी घेऊन ये. सणासुदीला तरी बघत जा काहीतरी. त्यावर तो मला म्हणतो, दाजी आता तरी दारू सोडा. मुलं मोठी होतायत. घराकडे जरा बघा. मला कधीतरी दारू प्यायची सवय आहे. साहेब, मला शिकवायला लागला तो!”

    “मग?”

    “मग काय? आता त्याला सोडायचं नाही. इंगा दाखवायचा म्हणजे दाखवायचा. बहिणीचा हिस्सा द्यायला लावायचा.”

    0000

    घरी जाताना कारमध्ये एकाही शब्दाने बोलणं झालं नाही. पावसाने अजून उघडीप दिली नव्हती. वायपर तीनवर चालू होता. विंडस्क्रीनवर पाण्याच्या रेघा येत होत्या. विशाल गाडी चालवत होता. गाडीतला रेडिओ बंद होता. मोबाइलही बंद होता. दोघांच्या मधे एक फाइल… तीच फाइल. जमिनीच्या हिश्श्याची. तिने ती मांडीवर ठेवली. हळूच उघडली. वर सातबारा… त्याखाली फेरफार. त्याखाली एक जुना फोटो… आई-आण्णा, मधोमध भाऊ आणि बाजूला ती.

    हेही वाचा – नातं भाऊ बहिणीचं…

    तिने फोटो बाहेर काढला. फोटोच्या मागे भावाच्या अक्षरात लिहिलं होतं, “आपण चौघं.”

    तिच्या डोळ्यांत पाणी आलं. नवऱ्याने आरशातून पाहिलं. डोळे मोठे केले. झटका देऊन गियर बदलला…

    “काय झालं?”

    “काही नाही.”

    तिने फोटो पुन्हा आत ठेवला. फाइल बंद केली. पण तिच्या हाताखाली ते जुनं पत्र आलं. तिने ते बाहेर काढलं.

    “ताई, काहीही झालं तरी तू एकटी नाहीस. मी आहे…”

    गाडी पुढे जात होती. तिला अचानक वाटलं, आई गेली तेव्हा तो होता… बाबा गेले तेव्हा तो होता… लग्न झालं तेव्हा तो होता… मुलं झाली तेव्हा तो होता… घरात अडचण आली तेव्हा तो होता… आता मात्र… तो तिच्यासमोर नव्हता. त्याच्याविरोधात उभं राहण्यासाठी तिला आणलं जात होतं.

    तिने डोळे मिटले. कपाळावर हात ठेवला. कुंकू बोटाला लागलं. तिने हात खाली घेतला. एका बोटाला कुंकू होतं. दुसऱ्या हातात भावाचं पत्र. ती बराच वेळ त्या दोन्हीकडे पाहत राहिली.

    0000

    दुसऱ्या दिवशी सकाळी ती एकटीच वकिलांच्या कार्यालयात आली. सकाळी नऊचा सुमार होता. कालच्या पावसाने झाडे टवटवीत दिसत होती. कार्यालयात अजून कोणीही आलं नव्हतं. घाटे वकीलांनी आश्चर्याने पाहिलं…

    “तुमचे पती विशाल नाही आले?”

    तिने मान हलवली… “नाही.”

    “काय झालं?”

    तिने फाईल टेबलावर ठेवली. काही क्षण ती तशीच उभी राहिली. मग म्हणाली,

    “साहेब… काल तुम्ही विचारलं होतं ना…” ती थोडी थांबली. मोठा श्वास घेतला…

    “मला खरंच केस करायची आहे का म्हणून?”

    वकील तिच्याकडे पाहात राहिले. तिने फाईल उघडली. सातबारा बाहेर काढला. तो त्यांच्या समोर ठेवला. मग फेरफार. मग पावत्या. शेवटी ते जुनं पत्र. ती पत्रावर हात ठेवून म्हणाली, “माझा हिस्सा मला हवा आहे.”

    घाटे वकीलांनी तिच्याकडे पाहिलं.

    ती पुढे म्हणाली, “पण भावाकडून नाही.”

    क्षणभर वकील काहीच बोलले नाहीत.

    “मग?”

    तिने डोळे मिटले.

    “मला माझ्या संसारातला माझा हिस्सा हवा आहे. माझा अधिकार हवा आहे.”

    तिचा आवाज आता थरथरत नव्हता. ती शांत, पण खंबीर दिसत होती.

    “माझ्या नवऱ्याला दारू सोडायला लावा.”

    वकील शांत झाले.

    ती म्हणाली, “भावाने माझा हिस्सा कधी खाल्ला नाही साहेब. माझ्या वाट्याला येणाऱ्या हिश्श्याच्या दसपटीने त्याने माझ्यावर खर्च केला आहे. केवळ माझ्यावरच नाही, माझ्या संपूर्ण कुटुंबावर त्याने खर्च केला आहे.‌”

    तिने पत्र उचललं. त्या अक्षराकडे पहात म्हणाली, “त्याने आयुष्यभर माझा प्रपंचही सांभाळला.”

    बाहेर धो धो पाऊस सुरू झाला. खिडकीच्या तावदानावरून खळाखळा पाणी वाहू लागलं. वसाचे सपकारे दरवाजातून आत येऊ लागले. मग कोणीतरी उठून दरवाजा बंद केला. घाटे वकीलांनी फाइल बंद केली.

    “मग वाटणीची केस करूया.”

    ती चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागली.

    घाटे वकील म्हणाले, “पण जमीन वाटण्यासाठी नाही.”

    “मग?”

    “तुमच्या आयुष्याची वाटणी दुसऱ्या कुणाच्या हातात जाऊ नये म्हणून.”

    ती काही बोलली नाही. बाहेर मुसळधार पाऊस सुरूच होता. पावसाच्या पलीकडे दूर कुठेतरी तिचा भाऊ होता. आता तो शेताच्या खोपीत बसला असेल. पाऊस उघडला की, पुन्हा शेतात जाईल. जनावरासाठी उसाची पाचट काढेल. उद्या रक्षाबंधनासाठी ताईकडे जावं लागेल. मोकळ्या हाताने कसं जायचं? म्हणून तो काळजीत असेल. तिच्या डोळ्यांत पाणी आलं.

    “साहेब…”

    तिचा आवाज थरथरत होता.

    “मी… मी काय करू?”

    वकील शांत होते. ते निर्विकारपणे तिच्याकडे पाहू लागले.

    ती पुढे म्हणाली, “मी नवऱ्याची बायको आहे.”

    क्षणभर थांबली… “पण मी भावाची बहीणही आहे.”

    तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळले. गालावरचे पाणी डाव्या हाताने पुसले…

    “मी कुणाची बाजू घेऊ?”

    कोणीच काही बोललं नाही. घाटे वकील शांत होते.

    ती पुन्हा म्हणाली, “पतीची?”

    मग टेबलावर पडलेल्या भावाच्या पत्राकडे पाहिले… “की भावाची?”

    घाटे वकील ऐकून घेत होते. काय बोलावे हे त्यांनाही सुचत नव्हते.

    ती पुढे सांगू लागली, “गेले तीन महिने घरात तमाशा चालू आहे साहेब. रोज संध्याकाळी दारू पिऊन येतात. भावावर केस घाल नाहीतर माझ्या घरातून चालती हो. मला उद्याच्या उद्या सोडचिट्टी पाहिजे. नको नको ते बोलतात. माझ्या भावाला हे पहिल्यापासूनच नको तसले बोलत होते. तरीही भाऊ सहन करीत होता. अति झाल्यावरच त्याने नम्रपणे दोन शब्दांत त्यांना व्यवस्थित राहण्यास सांगितले. त्यात काय चुकलं त्याचं?”

    तिच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा तरळला… मग भावाचा… भाऊबीजेच्या दिवशी त्याच्या कपाळावर लावलेलं कुंकू… आणि अचानक तिच्या हाताला स्वतःच्या कपाळावरचं कुंकू जाणवलं. तिने पदराला हात लावला. एकीकडे कुंकू, पती, संसार, मुलं…

    दुसरीकडे भावाचं नातं. आईच्या पोटातून आलेला सख्खा भाऊ. आई-आण्णा गेल्यानंतर आई-बापासारखा उभा राहिलेला माणूस!

    ऑफिसमध्ये पुन्हा शांतता पसरली. घाटे वकिलांनी हळूच ती पत्रं उचलली. सगळ्यात वरचं पत्र पुन्हा उघडलं. त्यात शेवटची ओळ होती,

    ‘ताई, काहीही झालं तरी तू माझीच आहेस.’

    वकीलांनी पत्र तिच्यासमोर ठेवलं.

    “केस दाखल करण्यापूर्वी,” ते शांतपणे म्हणाले, “तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल.”

    ती त्यांच्याकडे पाहू लागली.

    “तुम्हाला पतीशी शांतपणे आणखी एकदा बोलून घ्यावं लागेल.”

    टेबलवरचा फोन खणखणला. घाटे साहेबांनी रिसिव्हर कानाला लावला. पलीकडून आवाज आला.

    “हॅलो साहेब. मी वैशाली ढेरे यांचा भाऊ नितीन बोलतोय.”

    “बोला. तुम्हाला कसा काय नंबर मिळाला?”

    “काल दाजी आणि आमची बहीण तुमच्या ऑफिसला आले होते. दाजींनी काल मला दारू पिऊन नेहमीप्रमाणे फोन केला होता. मला सर्व गोष्टी समजल्या. मग मी तुम्हाला फोन करायचं ठरवलं होतं.”

    “इथं तुमची बहीण वैशाली आली आहे.”

    “मला माहीत आहे साहेब. पण तिच्याकडे फोन देऊ नका. मी आज रजिस्टर ऑफिसला आलो आहे. माझ्या बहिणीचा हिस्सा तिच्या नावावर करून देणार आहे. सर्व कागदपत्रे तयार झाली आहेत. माझ्या बहिणीला सांगा, घराकडे जाण्याऐवजी तू इकडे ये. आज तिचा तिला हिस्सा देऊन टाकला की, रजिस्टर दस्त घेऊन उद्या मी तिच्या घरी जाणार आहे. रक्षाबंधनाची तिला यावेळची वेगळी भेट देणार आहे.”

    हेही वाचा – सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    त्याने फोन कट केला. घाटे वकिलांनी डोक्यावरून हात फिरवला. डोळ्यावरचा चष्मा काढून खाली ठेवला. टेबलावरचा नॅपकिन घेऊन त्यांनी चेहरा पुसला. पंख्याचे बटन फिरवून थोडा वेग वाढवला. टेबलवरचा चष्मा घालताना ओले डोळे पुसले. त्यांनी समोर बसलेल्या वैशालीकडे पाहिले. ती अजूनही विचारातच होती.

    एका बाजूला संसार… दुसऱ्या बाजूला रक्त… आणि मधे उभी होती ती. एकटी… निर्णयाच्या उंबरठ्यावर…

    “तुमच्या मनातल्या वादळाचा निर्णय शेवटी भावानेच घेतला आहे…”

    वैशाली घाटे साहेबांकडे आश्चर्याने पाहू लागली. तिला काही समजत नव्हतं.

    घाटे वकील म्हणाले, “भावाचा निरोप आहे. तुम्ही रजिस्टर ऑफिसला जा. उद्या रक्षाबंधनाला तुम्हाला अनोखी भेट मिळणार आहे. रक्षाबंधनची भेट स्वीकारताना मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही. नाहीतर भावाने दिलेली भेट निष्फळ होईल.”

    तिने पत्र पुन्हा फाइलमध्ये ठेवलं. फाइल उचलली. पिशवीत टाकली. एक क्षण थांबली. कपाळाला हात लावला. कुंकू तिथेच होतं. डबडबलेल्या डोळ्यांनी तिने घाटे साहेबांना नमस्कार केला. जड पावलांनी ती कार्यालयातून बाहेर पडली…!!!

    समाप्त
    ॲड. कृष्णा पाटील

    मोबाइल – 9372241368

    Related Posts

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026 ललित

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026 ललित

    पहिली आरती

    September 23, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सुधाकररावांचा सन्मान

    By दीपक तांबोळीSeptember 23, 2026

    उत्तरार्ध पांडुरंग माळी सरांच्या सांगण्यावरून चेतन शेलार प्रसिद्ध लेखक सुधाकरराव शिर्के यांच्याकडे आला होता. त्याने…

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 447
    • अवांतर 214
    • आरोग्य 150
    • पंचांग आणि भविष्य 596
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 942
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.