दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 ऑगस्ट 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 14 श्रावण शके 1948; तिथि : सप्तमी 20:42; नक्षत्र : अश्विनी 21:17;
- योग : शूल 17:28; करण : विष्टि 09:26;
- सूर्य : कर्क; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 19:13;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
कालाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष
टीम अवांतर
मराठीतील स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा जन्म 5 ऑगस्ट 1933 रोजी मिरज येथे झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. 1951 साली त्यांची पहिली कथा ‘स्त्री’ मासिकात प्रकाशित झाली, तेव्हापासून त्यांचे लेखन सकसपणे सुरू झाले. नामवंत समीक्षक आणि इंग्रजीचे प्राध्यापक विचारवंत लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्याशी 1956 साली विजयाबाईंचा विवाह झाला. अतिशय कसदार साहित्याची निर्मिती आणि तौलनिक समीक्षा उभयतांनी केली आहे.
पुढे मुंबईत आल्यावर विजयाबाईंनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि एस.एन.डी.टी. महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून काम केले. तसेच एम.फिल. आणि पीएच.डी.च्या अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन केले. निवृत्तीनंतर विद्यापीठाने त्यांची ‘प्रोफेसर एमिरेटस’ म्हणून नेमणूक केली.
हेही वाचा – सेल्फी अन् विकतचं दुखणं!
त्यांचे 18 कथासंग्रह, 5 ललित लेखसंग्रह आणि 7 समीक्षाग्रंथ तसेच अनेक संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विजयाबाईंच्या कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त तर करतातच, शिवाय तरल, काव्यात्म शैलीने अशा कथा वैशिष्ट्यपूर्णही ठरल्या आहेत. त्यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार तर कवितारती या समीक्षा लेखसंग्रहास रा. श्री. जोग समीक्षा पारितोषिक आणि राज्य पुरस्कार मिळाला आहे.
कविता हा त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा, आस्थेचा, प्रेमाचा आणि चिंतनाचा विषय. म्हणूनच त्यांचं समीक्षालेखन प्राधान्यानं कवितेविषयीचंच आहे. मर्ढेकरांच्या कवितेवर अगदी महाविद्यालयीन काळापासून त्यांनी चिंतनाला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी मर्ढेकरांवरच पीएच. डी. केली. मर्ढेकरांच्या एका एका कवितेवर आणि त्यातल्या एका एका शब्दावरून विजयाबाईंनी रमेश तेंडुलकर, शांता शेळके, मं. वि. राजाध्यक्ष यांच्याशी अतिशय सखोल चर्चा केल्या. पुढे ते चिंतन ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ (1991) या दोन खंडातून प्रकाशित झालं. या समीक्षाग्रंथास 1993 साली साहित्य अकादमीचा आणि कै. केशवराव कोठावळे पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय, विंदा करंदीकरांच्या समग्र साहित्याचं परिशीलन ‘बहुपेडी विंदा’ या दोन खंडी ग्रंथातून त्यांनी केलं आहे.
त्यांना गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सचिव पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अध्यापक गौरव पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा साहित्यरत्न पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र सेवा संघाचा सु. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. इंदूर येथे 2001मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. इतर विविध संस्थांचे अध्यक्षपदही त्यांना मिळाले.
शाळा आणि महाविद्यालयांसाठी पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ज्ञानपीठ पारितोषिक परीक्षक समिती, चित्रपट परीक्षण मंडळ, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाप्रमाणेच अन्य अनेक संस्थांच्या त्या सदस्य होत्या. महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्काराच्या सल्लागार मंडळाच्या त्या सदस्य होत्या.
आजचे राशिभविष्य
मेष – आज तुमचे लक्ष्य आणि एकाग्रता उत्तम असेल. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमचा शांत स्वभाव योग्य दिशा दाखवेल. कामातील लहान यश तुमचा आत्मविश्वास वाढवतील. आर्थिक बाबतीत सकारात्मक चिन्हे दिसतील. आतापर्यंत रखडलेली कामे पुढे सरकू शकतात. आरोग्य सामान्य राहील. विश्रांतीसाठी वेळ काढणे महत्त्वाचे असेल. संयम आणि सुज्ञ निर्णयामुळे भविष्यात मोठे यश मिळू शकते.
वृषभ – कल्पनाशक्ती आणि भावनिक समज यामुळे नव्या संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. कला, लेखन किंवा इतर सर्जनशील कार्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये संतुलित दृष्टिकोन ठेवा. समोरच्याच्या भावना समजून घेण्यासाठी आणि स्वत:ची मनःशांती मिळविण्यासाठी थोडा वेळ घ्या. नातेसंबंध सौहार्दपूर्ण राहतील. एकूण दिवस सकारात्मक आणि समाधानकारक असेल.
मिथुन – सकारात्मक ऊर्जा आणि स्पष्ट विचार यांनी आज परिपूर्ण असाल. आपली कामे संघटितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एका वेळी एकच काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबींबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईने घेतलेले निर्णय हानिकारक ठरू शकतात. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल असेल. आरोग्य चांगले राहील आणि मानसिक संतुलनही टिकून राहील.
कर्क – कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक बाबींबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखा. तुमचे आरोग्य सामान्य राहील. कौटुंबिक पाठिंब्यामुळे तुम्हाला मनःशांती आणि आत्मविश्वास मिळेल. प्रियजनांशी संवाद साधताना साधे आणि स्पष्ट शब्द वापरा.
सिंह – आर्थिक परिस्थितीत आजपासून हळूहळू सुधारणा होईल. छोटी बचत भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे करिअर आणि शिक्षणात यश मिळेल. संयम ठेवा आणि आपल्या यशाचा आनंद घ्या. आज कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. लहान लहान पावले तुम्हाला मोठी ध्येये गाठण्यास मदत करतील.
कन्या – कामाबद्दलची तुमची निष्ठा आणि शिस्त तुम्हाला यश मिळवून देईल. दीर्घकाळापासूनच्या किरकोळ समस्या सुटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यनिष्ठेचे कौतुक होईल. कुटुंबासोबत मोकळा संवाद होईल ज्यामुळे गैरसमज दूर होतील. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि संतुलित आहार घ्या. दिवस सकारात्मक परिणाम देईल.
तुळ – सर्जनशील कल्पना आणि सकारात्मक उर्जेने आज परिपूर्ण असाल. इतरांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला आदर मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंब आणि मित्रांसोबतचा वेळ आनंददायी असेल. लहान-सहान आनंद तुमचा दिवस खास बनवतील. आर्थिक बाबी सामान्य राहतील. आरोग्य चांगले राहील आणि मानसिक शांती नांदेल.
वृश्चिक – घाई करण्याऐवजी विचारपूर्वक पावले उचलणे आज फायदेशीर ठरेल. एका महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्याच्या कामात अकारण हस्तक्षेप करू नका. गरज असेल तेव्हा इतरांना मदत करण्यात आणि मदत स्वीकारण्यास संकोच करू नका. आर्थिक बाबी स्थिर राहतील. आज तुमचे आरोग्य सामान्य राहील.
हेही वाचा – अफवा आणि सत्य
धनु – नवीन कल्पना आणि योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मेहनतीचे फळ तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. लहान यशांमुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत सुधारणेची चिन्हे दिसत आहेत. आरोग्य चांगले राहील. सकारात्मक दृष्टिकोन आणि मदत करण्याच्या स्वभावामुळे तुम्ही प्रसिद्ध व्हाल.
मकर – मित्र आणि कुटुंबीयांकडून मिळणारा सल्ला आज उपयुक्त ठरेल. विचारपूर्वक आखलेल्या योजना यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या कार्यक्षमतेने पार पाडाल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आरोग्य सामान्य राहील. संयम आणि शिस्त तुम्हाला ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल.
कुंभ – तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आज नवीन उंचीवर घेऊन जाईल. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येये साध्य करण्यास मदत होईल.
मीन – नियोजनासह कामे पुढे नेण्याचा आजचा दिवस आहे. लहान तयारीमुळे भविष्यातील चिंता कमी होतील. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. आत्मविश्वास आणि स्पष्ट विचार यामुळे निर्णय घेण्यास मदत होईल. आरोग्य चांगले राहील. एकूणच आजचा दिवस सकारात्मक आणि फायदेशीर असेल.


