Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : स्वादिष्ट खवा जिलेबी अर्थात मावा जिलेबी अन् ब्रोकोली- मटार पुलाव!
    फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट खवा जिलेबी अर्थात मावा जिलेबी अन् ब्रोकोली- मटार पुलाव!

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 4, 2026Updated:August 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, नीलिमा विजय खडतकर, नीलिमा खडतकर, स्वादिष्ट खवा जिलबी, स्वादिष्ट मावा जिलबी, ब्रोकोली मटार पुलाव, टेस्टी ब्रोकोली मटार पुलाव
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नीलिमा खडतकर

    ही आहे विदर्भ स्पेशल खवा जिलेबी किंवा मावा जिलेबी. विदर्भामध्ये, विशेष करून अमरावतीला बुऱ्हाणपूर मावा जिलेबी खूप प्रसिद्ध आहे. नेहमीच्या जिलेबीपेक्षा वेगळी.. थोडी काळपट असलेली ही जिलेबी अतिशय रसरशीत आणि चविष्ट असते. तर, या मावा जिलेबीची रेसिपी आपण बघूया…

    साहित्य

    • खवा – 1 कप
    • साखर – दीड कप
    • दूध – अर्धा कप
    • मैदा – अर्धा कप
    • तेल किंवा तूप – तळणासाठी
    • बेकिंग सोडा – चिमूटभर
    • वेलचीपूड – 1 टीस्पून
    • थोडे पिस्ता – बदामाचे काप – सजावटीसाठी

    कृती

    1. प्रथम मैद्यात थोडे थोडे पाणी (पाव कप) घालून घट्टसर पेस्ट करून फेटून घ्या. गुठळ्या होणार नाही, याची काळजी घ्या.
    2. नंतर खवा, दूध आणि मैद्याची पेस्ट एकत्र करून मिक्सरमध्ये घट्टसर पेस्ट करुन घ्या.
    3. तयार मिश्रणात चिमूटभर बेकिंग सोडा घालून छान फेटून घ्या आणि थोडावेळ मिश्रण बाजूला ठेवा.
    4. आता पाक करून घ्या. साखर बुडेल एवढं पाणी घालून साखरेचा एकतारी पाक करून घ्या. पाकात वेलचीपूड घाला.
    5. एका पसरट कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात जिलब्या घाला (दुधाच्या पिशवीचा कोपरा कट करून त्यात जिलबीचे मिश्रण घालून जिलबी बनवू शकतो किंवा बाजारात जिलेबी बनवण्यासाठी प्लास्टिकची बटली मिळते.)
    6. जिलेब्या मध्यम आचेवर लालसर तळून घ्याव्या. तयार जिलेब्या गरम पाकात टाकून, थोड्यावेळ पाकात बूडवून, नंतर काढून घ्या. वरून पिस्ता- बदामाचे काप घालून सजवा.

    हेही वाचा – Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    ब्रोकोली- मटार पुलाव

    साहित्य

    • बासमती तांदूळ – 1 कप
    • ब्रोकोली – पाव किलो
    • पालक – अर्धी जुडी
    • मटार – पाव किलो
    • तमालपत्र – 1
    • जिरे – 1 टीस्पून
    • वेलची – 1 मोठी
    • हिरवी वेलची – 2
    • मिरी दाणे – 6-7
    • लवंगा – 2-3
    • दालचिनी – 1  छोटा तुकडा
    • चिरलेली कोथिंबिर – पाव कप
    • तेल किंवा साजूक तूप – 1-2 टेबलस्पून
    • काजू – 5-6
    • हिरव्या मिरच्या – 2
    • मीठ – चवीनुसार
    • हिंग – 1 लहान चमचा
    • व्हेज पुलाव मसाला – 1 टेबलस्पून

    हेही वाचा –  Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    कृती

    1. प्रथम पालक स्वच्छ धुऊन, ब्लान्च करून त्याची प्यूरी करून घ्या.
    2. ब्रोकोली मोठी मोठी (फुले) कापून तेलावर परतून घ्या.
    3. बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन 20 मिनिटे भिजत ठेवा. खडे मसाले प्लेटमध्ये काढून ठेवा. काजू तळून बाजूला ठेवा.
    4. तेल किंवा साजूक तूप गरम करून त्यात खडे मसाले आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून परता आणि हिंग घाला.
    5. त्यानंतर मटार, परतलेली ब्रोकोली, थोडी कोथिंबीर घाला.
    6. मग त्यात भिजवलेला बासमती तांदूळ, पालक प्यूरी, पुलाव मसाला, मीठ, गरम पाणी मिक्स करून परता.
    7. पाणी थोड आटत आल्यावर झाकण ठेवून पुलाव शिजवा.
    8. पुलाव तयार झाल्यावर वरून कोथींबीर, तळलेले काजू घाला.
    9. गरम पुलाव टोमॅटो-कांदा कोशिंबीरसोबत सर्व्ह करा.

      तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

      avaantar.recipe@gmail.com

      या ईमेलवर किंवा

      9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

      तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : लज्जतदार चटणी मिसळ!

    August 11, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    By Team AvaantarAugust 12, 2026

    नीलिमा खडतकर खवा-काजू तिरंगी मोदकाचे साहित्य मिल्क पावडर – 1/3 कप दूध – अर्धा कप…

    Recipe : लज्जतदार चटणी मिसळ!

    August 11, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026

    Recipe : उपवासाचे खमंग मिनी थालिपीठ!

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    जेन झी

    August 15, 2026

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 397
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 536
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 853
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.