Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: सतीश बर्वे
वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.
आज ड्रॉइंगरूमच्या स्लाइडिंग विंडोजवरच्या संगमरवरी कठड्यावर बसून, वाफाळलेला चहा पित, रिमझिम बरसणारा पहिला पाऊस बघताना, ते आजी-आजोबा मला नेहमी आठवतात… काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका तातडीच्या कामासाठी मला अचानकपणे कोसळणाऱ्या पहिल्या पावसात गाडी काढून बाहेर पडावे लागले होते. आकाशात दाटून आलेले ढगांचे तांडव सुरू होते अन् त्यामुळे रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. पुढे एका चौकात काही कारणाने वाहतूक कोंडी झाली होती. अर्धा तास उलटून देखील परिस्थिती ‘जैसे थे’ होती. मी कंटाळून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी म्हणून मी गाडीतून उतरत असतानाच ते दोघे मला एकाच छत्रीत माझ्या गाडीजवळ येताना दिसले. गाडी लॉक करून मी निघणार…
एकही दिवस जात नाही असा, जेव्हा मला माझ्या आबाची आठवण येत नाही. काही माणसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी स्वतःचं आयुष्य कायम असुरक्षित करतात. माझा आबा देखील असाच होता. न कळणाऱ्या वयात आई-बाबाविना पोरका झालो. तेव्हापासून आबा माझं सर्वस्व होता. गोडाऊनमध्ये दिवसभर जड पोती उचलायचं काम करायचा. थकून भागून घरी यायचा. मी रोज त्याच्या हातापायांना तेल लावून, मसाज करून द्यायचो माझ्या हाताने. मला पोटाशी घट्ट कवटाळून आबा म्हणायचा, “तू चार बुकं शिकून साहेब हो मोठा! मालकाशी बोलून मी प्रयत्न करतो तुला शहरात शिकायला पाठवायला…” आबासारखा देव माणूस होता, आबाचा मालक… ज्याने मला पुण्याला शिकायला ठेवले आणि कष्टाची एकेक पायरी…
कोकणातल्या आमच्या घरातून निघायचा दिवस जसजसा जवळ येत होता, तसतसा मी अस्वस्थ होत चाललो होतो. मनाची घालमेल वाढली होती. दरवर्षी हे असंच होतं. पण यावर्षी ते जास्त गंभीर झाले होते. माई जरा जास्तच थकलेली वाटली यावर्षीच्या मे महिन्यात… माई म्हणजे बाबांची दूरची बहीण. अकाली वैधव्य आल्याने बाबांनी तिला कायमची आमच्या घरी आणली होती. तिचा कामाचा उरक दांडगा होता. पहाटे उठून गोठा साफ करायचा, गाई म्हशींना वैरण आणि पाणी द्यायचं, पुढचं आणि मागचं अंगण सारवायचं. आंघोळ उरकून आईला स्वयंपाकघरात लागेल ती मदत करायची, दुपारी कपडे भांडी उरकून जरा आडवं होऊन वामकुक्षी घेईपर्यंत बाबा कोर्टातून यायचे. माईमुळे आईला खूप मदत झाली आजवर.…
गणपतीच्या आधी आठवडाभर तिला फोन करून सांगायला मी फार उत्सुक असायचो इतकी वर्षे – “पहिल्या आरतीपर्यंत पोहोचतोय गं मी आई…” फोन ठेवल्यावर मी थेट घरीच पोहोचायचो मनाने! नाना आणि आईचं मी शेंडेफळ. अभ्यासात जात्याच हुशार लहानपणापासून. नानांनी माझी हुशारी ओळखून शालांत परीक्षेनंतर मला पुढील शिक्षणासाठी बरीच खटपट करून मुंबईला त्यांच्या मित्राकडे पाठवले होते. नानांचा निर्णय ऐकून माझ्या काळजीने आईचे पाणावलेले डोळे आजही आठवतात. जसजसा मुंबईला जायचा दिवस जवळ येत होता, तसतसे आम्ही दोघेही एकमेकांना नजर द्यायला टाळायचो. नानांचा विरोध पत्करून काय काय खाण्याचे पदार्थ तिने करून दिले होते, माझ्यासोबत न्यायला! सुरुवातीला मुंबईमध्ये रुळायला वेळ लागला मला. पण अंतिम ध्येय आणि…
काल खूप दिवसांनी संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेलो होतो. बाकावर बसून शांतपणे मावळतीच्या सूर्याचं लोभसवाणे दृश्य डोळ्यांत साठवून ठेवत असताना अचानक समोर एक फुगेवाला येऊन उभा राहिला. एका हातात गॅस भरलेले अंदाजे 20-25 फुगे आणि दुसऱ्या कडेवर एक छोटा मुलगा. त्याने हात पुढे करत मला फुगे घेण्याची विनंती केली. त्याच्या चेहऱ्यावरील व्याकुळता आणि नजरेतलं आर्जव का कोण जाणे, माझ्या मनाला क्षणभर बोचलं. काही उपयोग नसताना देखील मी दोन फुगे द्यायला सांगितले आणि त्या क्षणी त्या लहानग्याच्या ओठांवर निरागस हसू फुलले. फुगे हातात घेऊन मी पैसे किती ते विचारले. “चालीस रुपया.” मी खुशीने 50ची नोट त्याच्या हातात ठेवून उरलेले 10 रुपये देऊ…
मला तो पहिल्यांदा भेटला मोरगावला. आलिशान मोटारीतून आला होता… बहुतेक आपल्या आजीला घेऊन. मला का कोण जाणे पण बघता क्षणी तो खूप वेगळा वाटला. साधारणपणे तिशीच्या आसपासचा असावा तो. आम्ही जवळपास एकत्रच मंदिरात प्रवेश केला होता. दर्शन छान झालं. मी ठरविल्याप्रमाणे तिथे बसून एक अथर्वशीर्ष पठण केले. ते पूर्ण झाल्यावर मी तिथून उठून उभा राहिलो, तितक्याच मागून कोण्या बाईंचा आवाज आला – “खूप छान म्हटलं तुम्ही. मी अगदी तल्लीन होऊन ऐकत होते.” मी वळून बघितले तर, एक आजी उभ्या होत्या माझ्या मागे. मी वाकून त्यांना नमस्कार केला. त्या मंद हसल्या आणि मला त्यांनी विचारले, “एकटेच आलात का?” मी “हो” म्हणालो.…
भाग – 3 सुधीरने मला फोन करून सांगितले की, ‘मोडक आजोबांना घेऊन त्यांची गाडी हॉस्पिटलच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडायच्या तयारीत आहे.’ मी त्याला ‘ठीक आहे’ म्हणालो आणि तडक आजोबांच्या खोलीत गेलो. आजोबांना खरंतर डोळा लागला होता. पण नाईलाजाने मला त्यांना उठवावं लागलं… “आजोबा आपल्याला परत बाहेर अंगणात जायला हवं. सुधीरचा नुकताच फोन आला होता. ते निघाले आहेत हॉस्पिटलमधून.” “तुझ्या आजीला तयारीत राहायला सांग. मला अपेक्षित असा चमत्कार घडलाच तर, तिला औक्षण करायला सांगितले आहे मी कालच रात्री.” सुधीरचा परत एकदा फोन आला हे सांगायला की, त्यांची गाडी कुठल्याही क्षणी आमच्या गल्लीत शिरेल. मी फोन बंद केला आणि रस्त्यावर डोळे लावून…
भाग – 2 अंगणातील झोपाळ्यावरच्या मऊशार गादीवर बसून आजोबा गहन विचारात मग्न होते. खरंतर, आम्हाला कोणालाच त्यांची एकाग्रता खंडित करायची इच्छा नव्हती. पण, मला मात्र हीच वेळ महत्त्वाची वाटत होती… त्यांच्या आणि मोडक आजोबांच्या मैत्रीविषयी आणखी जाणून घेण्यासाठी! म्हणूनच सावकाश पावलं टाकत मी झोपाळ्याजवळ येऊन उभा राहिलो. क्षण दोन क्षण गेल्यावर अचानक आजोबांनी डोळे उघडले आणि हाताने खूण करुन ‘काय हवं आहे?’ असं मला विचारले. “तुमच्या आणि मोडक आजोबांच्या मैत्रीच्या आठवणी ऐकायच्या आहेत मला…” पडत्या फळाची आज्ञा मानून मी बोलून गेलो. ते ऐकून आजोबा जरा सावरून बसत मला म्हणाले बस माझ्या बाजूला. आजोबांच्या आठवणींचा झोपाळा हळूहळू वेग घ्यायला लागला… “आजोबा…
भाग – 1 कोमातून आश्चर्यकारकरीत्या बाहेर आल्यावर मोडक आजोबांची प्रकृती झपाट्याने सुधारली आणि बघता बघता घरी परत जाण्याचा दिवस उजाडला. सुधीरने म्हणजे आजोबांच्या नातवाने मला फोन करून ही आनंदाची बातमी दिली. आमच्या सोहोनी कुटुंबांतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान काठोकाठ भरलेले दिसले. एक वेगळाच उत्साह सगळ्यांच्या अंगात संचारला होता. त्याचं कारणही तसंच होतं. दोन मराठी यशस्वी व्यावसायिक कुटुंब अशी मोडक आणि सोहनी कुटुंबाची ओळख होती संबंध शहरात. दोन्ही कुटुंबांचे पिढीजात व्यवसाय होते. माझे आजोबा आणि सुधीरचे आजोबा घनिष्ठ मित्र. त्यामुळे व्यवसायाची घडी सुरळीतपणे बसल्यावर दोघांनीही त्या काळी गावाबाहेर असलेल्या परिसरात बाजूबाजूची जमीन विकत घेऊन त्यावर ऐसपैस बंगले बांधून घेतले होते. आमचा बंगला…
आज महिना झाला आजी कोमात जाऊन. आजोबा नित्यनेमाने त्यांच्या बेडजवळ बसून असतात. कधी त्यांच्या निष्प्राण हातावर हात ठेवून, तर कधी निर्विकार कपाळावर हळूवारपणे थोपटत त्यांच्याशी गप्पा मारत बसतात. आमच्या स्टाफच्या टेबल-खुर्चीवर बसून मी रोज आजोबांना कौतुकाने बघायचो. एक दिवस मलाच रहावलं नाही आणि मी आजोबांना विचारलं, “आजोबा रागावणार नसलात तर एक विचारू? खूप दिवसांपासून मी बघतोय तुम्हाला, आजींशी काय एवढं बोलता तुम्ही? त्या तर सध्या काही कळण्याच्या पलीकडे आहेत… तुमच्या बोलण्याला कसलाच प्रतिसाद देत नाहीत त्या!” हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना? चेहऱ्यावर मंद हसू आणत त्यांनी मला विचारले, “लग्न झालंय ना तुझं?” मी म्हणालो, “हो झालंय. दोन मुलं आहेत…

