Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: सतीश बर्वे
वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.
आज खूप दिवसांनी आजोबा मैदानावर दिसले. माझं रोजचं चालणं संपवून मी ते बसलेल्या बाकापाशी जाऊन उभा राहिलो. आजोबांचा नेहमीचा सळसळता उत्साह गायब होता. कसल्यातरी विचारात होते ते. शेवटी मीच संवाद सुरू केला… “आजोबा कुठे होता इतके दिवस? किती वाट बघितली मी तुमची.” आजोबांचे डोळे काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करत होते. शेवटी उसासा टाकत ते अस्पष्ट आवाजात बोलले, “ती गेली गेल्या महिन्यात!” आजोबांचे बोलणे ऐकून माझ्या पोटात धस्स झाले… “आजोबा, पण काय झाले अचानक? मी गेल्याच महिन्याच्या सुरुवातीला तर भेटून गेलो होतो आजींना…” “तू येऊन गेल्यानंतर दहा दिवसांनी खेळ आटोपला. तुला भेटायचे होते म्हणून मी आज पहिल्यांदाच बाहेर पडलो आहे.” मी…
कोकणातील लाल मातीत आयुष्य काढलेला आणि गावाच्या वेशीबाहेरचं जग न बघितलेल्या मला आज मुंबईत आल्यावर खरंच गुदमरल्यासारखं झालं. पायाला आणि आयुष्याला चाकं लावलेली सतत धावपळ करणारी माणसं बघून माझा जीव घाबराघुबरा झाला क्षणभर… आमच्या कोकणातले व्यवहार कसे रमतगमत चालायचे. घड्याळाचा फायदा फक्त वेळ बघण्यासाठी व्हायचा, त्याला आयुष्य जुंपण्यासाठी नाही! कोकणातून मुंबईपर्यंतच्या आमच्या मोटारीच्या प्रवासात मला सगळं आठवलं सिनेमाच्या गोष्टीसारखं… सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेतून शिशिर आला होता कोकणात. तेव्हाच त्याने घोषणा केली होती, मला त्याच्यासोबत अमेरिकेला जाण्याची. मी खूप विरोध केला, पण तो हटला नाही. त्यावेळी त्याने माझ्या पासपोर्ट आणि व्हिसाचे काम मार्गी लावले होते. अमेरिकेत काहीबाही मोठा साहेब होता तो. त्याच्या…
आण्णांचे दिवस कालच संपले. यथासांग विधीवत सगळं कार्य झाले. मला अटकळ होती तोच विषय माईने आज सकाळी सकाळी चहा पिताना काढला… “एवढे दिवस पै-पाहुणे होते म्हणून घर भरलेले होते. काल त्यांची पांगापांग झाली. एक-दोन दिवसात तुम्ही सगळे निघाल आपापल्या रस्त्याने. परत सगळे कधी जमाल ते मला माहीत नाही. आज दुपारची जेवणं झाली की, उन्हं कलती व्हायच्या आधी घराचा सोक्षमोक्ष लावून टाका. यांच्या पाठीमागे मला हे सगळं हिशोबाचे एकटीला पेलवणार नाही. जमीन, कलमं, कष्टकरी वर्ग सगळ्यांना सांभाळायला मला जमणार नाही. ते असताना व्यावहारिक हिशोबापेक्षा माणुसकीचे हिशोब ठेवले गेले आणि संपत्ती जोडण्याऐवजी माणसं जोडली त्यांनी पंचक्रोशीत…” माईला पुढे बोलवेना. डोळ्यांत दाटलेले अश्रू…
माँ आज तुझी रोजच्या पेक्षा जास्त आठवण आली गं. कारण अगदीच क्षुल्लक होते. मी दोन आठवड्याच्या टूरवरून काल रात्री साडेबाराच्या सुमारास घरी आलो. मैथिलीच्या आणि मुलांच्या बेडरूममध्ये सामसूम होती. फ्लाइट कमालीची लेट झाली होती, त्यामुळे मी अवेळी घरी पोहोचलो होतो. फ्रेश झाल्यावर माझी पावलं नकळत स्वयंपाकघरात वळली. डबे शोधले पण आवडीचं आणि पोटभरीचं असं काहीच नाही मिळालं. त्याक्षणी तुझी अनुपस्थिती मला प्रकर्षाने जाणवली. आठवले इंजिनीअरिंग कॉलेजचे दिवस… ॲडमिशन मिळाली होती, मला दुसऱ्या शहरात. ते ऐकून तुझे डोळे पाणावले होते… पण तेव्हा बाबांनी तुला धीर देत समजावले होते. घरातील सुरक्षित वातावरणातून मी पहिल्यांदाच बाहेर पडत होतो. माझ्या सामानासोबत तू मोठा डबा…
आजकाल सगळं झटपट हवं असलेली पिढी स्वतःबद्दल आणि कुटुंबातील व्यक्तींच्या नातेसंबंधांबद्दल इतका खोलवर जाऊन विचार करत असतील, याचं मला आश्चर्य वाटलं… जेव्हा मी माझ्या नातवाने आमच्यातील संवादादरम्यान व्हॉट्सॲपवर पाठवलेला खालील लांबलचक मेसेज वाचला… तेव्हा लक्षात आलं. लहानपणापासूनच तो मला ‘बाबा’ म्हणतो आणि त्याच्या वडिलांना ‘पप्पा’ म्हणतो. एखादी गोष्ट गळी उतरवायची असली की, इमोशनल ब्लॅकमेल कसं करायचं, ते हल्लीच्या पिढीकडून शिकावं. 0000 “बाबा, मुंबईत होणाऱ्या माझ्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला तुम्ही यायलाच पाहिजे म्हणजे पाहिजे. मी तुमच्याकडून न येण्याचं कुठलंही कारण ऐकून घेणार नाही.” “अरे, असं झालं तर माझं सगळं नाटक पाठ होईल…” माझा लटका विरोध. “ते काही नाही. तुम्ही काही बोलूच…
“हाय ब्रोडा कसा आहेस?”… ही हल्लीची पिढी फार मजेशीर आहे. मैत्रीला अगदी चटकन समान पातळीवर आणून मोकळे होतात. ब्रोडा, ब्रो, बॉस, बच्ची, ब्रदर अशी ‘ब’ची बिरुदावली जोडतात, माझ्याशी गप्पा मारताना आणि सुरुवातच एकदम झकास करतात! “कसा वाटतोय तुला?” – मी. “फूल टू कूल आहेस तू…” “हे फूल टू कूल म्हणजे नक्की काय रे?” माझा सहज प्रश्न. “तू ज्या पद्धतीने आयुष्य जगतोस नं तोच हॉट टॉपिक असतो, आमच्या ग्रुपमध्ये आजकाल! आणि यू नो मी तुझा जवळचा मित्र म्हणून माझा भाव वाढलाय आजकाल.” “आईच्या गावात हे बरंय तुझं. जगतोय मी आणि किंमत तुझी वाढते आहे,” – मी. “ऑफ कोर्स यार. बट स्टिल…
उत्तरार्ध श्रीनिवास आणि त्याची होणारी बायको आरती मला भेटले तेव्हा श्रीनिवासने मला कडाडून मिठी मारली. नकळत आमच्या दोघांच्याही डोळ्यांत पाणी आलं, कारण आरतीच्या आईवडिलांची समजूत काढण्यासाठी आम्ही काय काय दिव्यातून गेलो होतो ते आमचं आम्हालाच माहीत होते! आमची गळाभेट बघून आरतीला हसू आवरत नव्हते. ते दोघे जण स्थानापन्न झाले. माझा उतावळेपणा बघून श्रीनिवासने बोलायला सुरुवात केली… “सर, एक दिवस सकाळी ऑफिसच्या थोडे आधी रस्त्यावर गर्दी जमली होती. सहज कुतूहल म्हणून मी तिथे डोकावलो. एक जण रस्त्यावर बसले होते पाणी पीत. मी बाजूच्या माणसाला विचारले तर तो म्हणाला, “अचानक चक्कर येऊन कोसळले इथे.” सगळे नुसतेच बघत उभे होते. मला रहावेना म्हणून…
पूर्वार्ध सकाळी नेहमीप्रमाणे मी व्हॉट्सॲप मेसेज चेक करत बसलो होतो आणि श्रीनिवासचा मेसेज दिसला… त्याने लिहिले होते की, ‘Guruji, I have not missed the Bus. Will both meet you soon.’ सकाळी सकाळी हा मेसेज वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि पठ्ठ्याने अखेर बाजी मारली याचा आनंद देखील वाटला. आमच्या Business Square या टोलेजंग इमारतीतील सर्वच्या सर्व म्हणजे 20 मजल्यावर विविध कंपन्यांची कार्यालये होती, जी अहोरात्र चालू असायची. तिथे काम करणाऱ्यांसाठी तळमजल्यावर एक भलं मोठं कॉफी शॉप होतं. तिथेच साधारण वर्षभरापूर्वी माझी आणि श्रीनिवासची ओळख झाली होती. नंतर वरचेवर आम्ही भेटत गेलो आणि आमच्यातील वयाचे अंतर बाजूला ठेवून आम्ही छानपैकी मित्र…
खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि टवटवीत ठेवायला मदत करत असतो. जसं घराला देण्यात येणारा रंग किंवा कपड्यांच्या रंगाबाबत आपण बोलतो की, या रंगासोबत हा रंग खुलून दिसेल किंवा हा रंग या रंगाबरोबर चांगला दिसतो वगैरे… तसंच आपल्या माणसांचं पण असतं, असं मला वाटतं. काही माणसं त्यांच्या स्वभावामुळे, वागण्याबोलण्यामुळे आपलं लक्ष चटकन् वेधून घेतात. त्यांच्या सहवासात घालवलेला वेळ दीर्घकाळ आपल्या स्मरणात रहातो. त्यांच्यासोबत काही गोष्टी गंमत म्हणून करून बघायची हिंमत आपण करतो! तोही असाच आहे. एका वेगळ्या वळणावर मला भेटलेला… मनमोकळ्या स्वभावाचा, मिश्किल आणि आमच्यातील वयाचं भलं मोठं अंतर विसरून सतत…
भाग – 1 जोशी काकूंचं जाणं जितकं अचानक होतं, तितकंच धक्कादायक देखील होते आमच्या सगळ्यांसाठी. हिंडत्याफिरत्या काकू एक दिवस अशा जातील असं खरंच वाटलं नव्हतं. आपल्या रोजच्या बघण्यातला माणूस अचानकपणे कायमचा निघून जातो, हे अजूनही मानायला मन तयार होत नाही. आम्हा सगळ्या मित्रांना बसलेला धक्का अजूनही कायमचा संपलेला नाही. आमचा मित्र म्हणजे काकूंचा मोठा मुलगा सुबोधकडे तर बघवत नाहीये अजूनही… त्याच्या समोर जाऊन उभं राहायला हिंमत होत नाहीये माझी. आजवर जोशी काकूंनी आयुष्यात नि:स्वार्थीपणे फक्त देण्याचं काम केले. मग ते त्यांच्या तीन मुलांना वाढवताना दिलेले संस्कार आणि शिकवण असो नाहीतर, त्यांच्या लाडक्या शाळेतील विद्यार्थ्यांना केलेलं ज्ञानदान असो. त्यांच्या आयुष्याचा आणि…

