Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा
    ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेMay 7, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, दोन भावंडांचे शिक्षण, आधार देणारा सरकता जिना, भावाचा आधार, अमेरिकेत स्थायिक शिशिर, अमेरिकेत स्थायिक वसंत, शिशिर वंसतचे बंधूप्रेम, शिशिरचे बंधूप्रेम, माझा विमानप्रवास,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कोकणातील लाल मातीत आयुष्य काढलेला आणि गावाच्या वेशीबाहेरचं जग न बघितलेल्या मला आज मुंबईत आल्यावर खरंच गुदमरल्यासारखं झालं. पायाला आणि आयुष्याला चाकं लावलेली सतत धावपळ करणारी माणसं बघून माझा जीव घाबराघुबरा झाला क्षणभर… आमच्या कोकणातले व्यवहार कसे रमतगमत चालायचे. घड्याळाचा फायदा फक्त वेळ बघण्यासाठी व्हायचा, त्याला आयुष्य जुंपण्यासाठी नाही! कोकणातून मुंबईपर्यंतच्या आमच्या मोटारीच्या प्रवासात मला सगळं आठवलं सिनेमाच्या गोष्टीसारखं…

    सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेतून शिशिर आला होता कोकणात. तेव्हाच त्याने घोषणा केली होती, मला त्याच्यासोबत अमेरिकेला जाण्याची. मी खूप विरोध केला, पण तो हटला नाही. त्यावेळी त्याने माझ्या पासपोर्ट आणि व्हिसाचे काम मार्गी लावले होते. अमेरिकेत काहीबाही मोठा साहेब होता तो. त्याच्या हाताखाली शेकड्यांनी माणसं कामाला होती. साहेबाच्या भाषेची आणि माझी जेमतेमच ओळख होती. पण त्याच्या तोंडून त्याच्या रुबाबाच्या गोष्टी ऐकायला खूप बरं वाटायचं…

    मी मुलांत मोठा,  माझ्या पाठचा शिशिर आणि वसंत आमचं शेंडेफळ. मला अभ्यासात गती नव्हती म्हणून जेमतेम चार यत्ता झाल्यावर नानांनी मला घरच्या किराणा मालाच्या दुकानात हाताखाली मदतीला ठेवला. शिशिर आणि वसंत मात्र शिकून मोठे झाले. नानांना त्यांना परदेशी नोकरी करण्यासाठी जाण्याची परवानगी देण्यासाठी मी कसेबसे तयार केले. माई मात्र नाराज झाली होती, दोन्ही मुलं सातासमुद्रापार जाणार म्हणून… पण नानांच्या मनाची तयारी मी करून घेतली होती. आधी शिशिर तिकडे पोहोचला, काही वर्षांनी व्यवस्थित जम बसवल्यावर त्याने वसंताला देखील तिकडे बोलवून घेतले.

    नानांच्या पश्चात किराणा दुकान मी सांभाळू लागलो. पुढे माझी मुलं शिकता शिकता दुकान सांभाळायला लागली आणि तीच संधी घेऊन शिशिरने माझ्या मुलांना हाताशी धरून मला अमेरिकेत त्याच्या घरी न्यायचं ठरवलं.

    हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!

    “दादा मुंबई विमानतळ आला बरं का!”

    शिशिरच्या बोलण्याने मी भानावर आलो. केवढी महाकाय वास्तू होती ती लांबलचक…

    “हात सोडू नकोस रे माझा. नाहीतर या गर्दीत हरवून जाईन मी,” माझा कातर स्वर.

    सामानासोबत आम्ही काचेच्या दरवाज्यापाशी पोहचलो आणि दरवाजा आपोआप उघडला. शिशिरने आमच्या बॅगा तिथे असलेल्या सरकत्या पट्ट्यावर ठेवल्या आणि बाकीच्या गोष्टी पूर्ण केल्या.

    “दादा, आता या सरकत्या जिन्यावरून जायचे आहे आपल्याला…” शिशिरचं बोलणं ऐकून खरंतर पोटात गोळा आला होता माझ्या. मी तिथे पाय ठेवायला घाबरत होतो. मला सारखं पडण्याची भीती वाटत होती.

    “दादा, थोडावेळ बाजूला उभं राहून तू बघ सगळे कसे पाय ठेवतात ते. अरे, आपण फक्त पाय ठेवून उभं रहायचं असतं. जिना आपोआप आपल्याला वर घेऊन जातो.”

    हेही वाचा – मनीऑर्डर… आण्णांच्या आत्म्यास समाधान देणारी!

    हो नाही, हो नाही करता मी ग्रामदेवतेचं स्मरण करून एकदाचा डावा पाय त्या जिन्यावर ठेवला आणि घाबरीघुबरी नजर दोन्ही बाजूला फिरवत शेवटच्या पायरीवर पोहोचलो… तिथे गेल्यावर मात्र हायसं वाटलं. गुबगुबीत गादी असलेल्या बाकावर मी बसलो. शिशिर माझ्या बाजूला बसून एकटक माझ्याकडे बघत होता.

    “काय रे, माझी फजिती बघून गंमत वाटली ना तुला?”

    “नाही दादा. या जिन्याकडे पाहून चटकन् मनात विचार आला की, तू सुद्धा आमच्या म्हणजे माझ्या आणि वसंताच्या आयुष्यातला सरकता जिना आहेस. गेली कित्येक वर्षे तुझ्या अपरंपार कष्टाच्या आणि त्यागाच्या पायऱ्यांवर उभं करत तू आम्हाला संस्काररूपी शिकवण देत, आमचा तोल न जाण्याची खबरदारी तर घेतलीसच, शिवाय आम्ही बघितलेल्या स्वप्नांच्या जगाच्या पायरीवर व्यवस्थितपणे उभं करून नंतर तिथल्या जमिनीवर घट्टपणे पाय रोवून उभे राहू, याची सदैव काळजी तू घेतलीस. नानांना तू तयार करून परवानगी मिळवलीस. आम्हाला जर त्या सरकत्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर तू उभं केलं नसतंस तर आज आम्ही काय झालो असतो, हा विचार सुद्धा करवत नाही मला!”

    “म्हणूनच मी आणि वसंताने दोन-तीन वर्षांपासूनच ठरवलं होतं की, काही करून तुला अमेरिकेत आमच्या घरी घेऊन यायचे आणि तुझ्या सरकत्या जिन्यावरून आम्ही सुखसमृद्धीच्या जगात कसे पोहचलो, ते तुला प्रत्यक्ष दाखवायचं. आमच्या अमेरिकन मित्र-मैत्रिणींना तुला मुद्दाम भेटायचे आहे. आमच्या आजच्या सुखवस्तूरूपी गंगेच्या उगमस्थानाला भेटायला, ते सर्व उत्सुक आहेत. तुझा मोठा सत्कार होणार आहे अमेरिकेत!!”

    शिशिरचे बोलणं ऐकून छाती अभिमानाने फुलून आली. शिशिरचा हात धरून सावकाश पावलं टाकत मी विमानात प्रवेश करायला सज्ज झालो.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    सहेला रे…

    May 6, 2026 ललित

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026 ललित

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    May 6, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सहेला रे…

    By रेवती निलेश पांडेMay 6, 2026

    तुझं असं आवेगाने येणं नेहमीचचं आहे. वाट बघण्यासाठी जे धैर्य लागतं ते नाही तुझ्यात, माहिती…

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    May 6, 2026

    फिरकी… 1100 रुपयांचं बक्षीस!

    May 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…

    May 7, 2026

    Dnyaneshwari : हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें

    May 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 411
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 608
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026
    Most Popular

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.