Author: सतीश बर्वे

Avatar photo

वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

मी बंगलोरला जायला विमानात बसलो आणि दोन आठवड्यांपूर्वी आईशी झालेला संवाद आठवला… त्या दिवशी मी नुकताच ऑफिसमधून घरी आलो होतो. चहा पीत असताना आईने एक लग्नपत्रिका हातात दिली आणि म्हणाली, “तुझ्या सुषमामावशीच्या नातवाचं लग्न आहे बंगलोरला. माझी खूप इच्छा आहे, जायची कारण जवळपास पन्नास वर्षांनी सुषमाला भेटायचा योग आहे.” सुषमामावशीबद्दल आईकडून खूप काही ऐकून होतो मी. पुण्यातील सदाशिव पेठेतील त्यांचं बालपण… दोघीही जीवश्चकंठश्च मैत्रिणी… सुषमाच्या आजोबांच्या वाड्यात माझ्या आजोबांचे बिऱ्हाड होतं. पण ती परिस्थिती त्या दोघींच्या मैत्रीच्या आड आली नाही कधीच! पुढे लग्न होऊन आई मुंबईत आली आणि सुषमामावशी बंगलोरला सासरी गेली. सुरुवातीला संपर्क होत होता वरचेवर, पण नंतर संसारात…

Read More

गेल्या महिन्यात फेसबुकवर नीलिमा आणि तिच्या नवऱ्याचे म्हणजे सुभाषचे केरळ सहलीचे फोटो बघितले होते. माझ्या छानपैकी लिहिलेल्या कमेंटवर तिने एक दिवस सकाळी तिच्या घरी चहा नाश्त्याला यायचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार काल सकाळी ठीक आठ वाजता मी तिच्या घरी पोहोचलो. सुभाषने म्हणजे नीलिमाच्या नवऱ्याने दार उघडून माझे स्वागत केले. नीलिमा आणि सुभाष माझे कॉलेजचे मित्र होते. स्वयंपाकघरातून नाश्त्याचा घमघमाट बाहेरच्या खोलीपर्यंत पोहोचला होता. “बस रे आरामात सतीश!” नीलिमाचा आतून आवाज आला. “हो, हो, सावकाश होऊ दे तुझं… तोपर्यंत मी आणि सुभाष मस्तपैकी गप्पा मारत बसतोय.” आम्ही तिघेही खरंतर आता ज्येष्ठ नागरिक होतो; पण तरीही आमच्या तब्येती छानपैकी सांभाळून होतो. गेल्या…

Read More

आज कित्येक वर्षांनी दिनेशने आणि माँनी एकमेकांना समोरासमोर बघितले होते. ही भेट घडवून आणण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. व्हीलचेअरवर बसलेल्या माँ खूप बारीक झाल्या असल्या तरी चेहऱ्यावरचं तेज अजून कमी झालेलं नव्हतं. बाहेर बऱ्यापैकी थंडी असल्याने माँनी अंगाभोवती शाल गुंडाळली होती. क्षीण झालेले डोळे दिनेशकडे टक लावून बघत होते… पुढे काय होणार त्याची वाट बघत! मी लांबूनच दिनेशला न्याहाळत होतो. माँचं खचलेलं आणि खंगलेलं रूप बघून, आजवर माँना न भेटण्याच्या त्याचा निश्चयाचा डोंगर अखेर मातृप्रेमाच्या सुरुंगाने फुटायला सुरुवात झाली होती. माझ्या हाताला फक्त वाट बघणं होतं. कधी… कधी……कधी…? …आणि पुढच्याच क्षणी ‘माँSSS’ असा हंबरडा फोडून दिनेशने माँने घातलेल्या गाऊनला गच्च…

Read More

भाग – 4 आज अखेर तो क्षण आला, ज्याची मी अधीरतेने वाट बघत होतो. रोहनने अखेर दादाचे पत्र वाचायला म्हणून ती पिशवी उघडली. वाचायला सुरुवात करायच्या आधी रोहन आबा, माईला म्हणाला, “बाबाच्या शेवटच्या काही दिवसांत जेवढं जमेल तेवढे तो बोलत गेला आणि मी टाईप करत गेलो. मधे मधे दमल्यावर तो थांबायचा…. उद्या करूया पूर्ण, म्हणून तो डोळे मिटून बसायचा… पण तो दमलेला नसायचा! आबा त्याला सुद्धा सगळं सांगताना खूप रडू यायचं. मग मीच त्याच्या कपाळावर हळूहळू थोपटायचो. थोडा वेळ शांततेत गेला की, तो सावरायचा आणि परत सांगायला सुरवात करायचा. जेव्हा जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सांगायला सुरुवात करायचा, तेव्हा तो काल…

Read More

भाग – 3 आबांना आज रोहनची काय ओळख करून द्यायची, हाच विचार उठल्या उठल्या माझ्या मनात आला. तोंड धुऊन मी सहजच रोहनच्या खोलीत डोकावले तर, तो खोलीत नव्हता म्हणून मग मी स्वयंपाकघरात डोकावले. मला तिथे बघून माई म्हणाली, “रोहन कधीचाच उठला आहे. वाडीत जाऊन येतो म्हणाला मला. बघ तिथेच भेटेल तुला. पण जायच्या आधी चहा तेवढा घेऊन जा.” चहा मी घाईघाईत प्यायलो आणि वाडीत जायला निघालो. आंब्याच्या शेडकडे जात असताना वाटेतच एक कामगार मला भेटला. तो मला म्हणाल, “दादानुं तो पाव्हणा कोण आलाय? सगळी चौकशी करत होता आंब्याच्या कलमाची.” “कुठे आहे तो?” मी विचारले. “तिथे विहिरीजवळ बसला होता मघाशी… आबांबरोबर…

Read More

भाग – 2 दादा घर सोडून गेला आणि घरातील वातावरण पार बदलून गेले होते. मी त्याचा कपड्याचा खण तपासून बघितला आणि माझ्या लक्षात आले की, तो थोडेफार कपडे घेऊन गेला होता. दादाचे घरात नसणे, हे पचवणे मला आणि कुसुमला खूप कठीण जाणार होते. दादा वंशाचा पहिला दिवा. सगळ्यांचा लाडका होता आमच्या आळीमध्ये. जरा मोठा झाल्यावर आळीतील कोणाकडेही काही सणसमारंभ असला की, मदतीला म्हणून दादाला हक्काने आणि मानाने बोलावले जायचे. दादा अभ्यासात हुशार होताच, पण खेळातही खूप रुची घ्यायचा. शिवाय, आमच्या घरातील अडगळीच्या खोलीत कितीतरी जुने तुटलेले लोखंडी सामान, शेतीची अवजारे वगैरे गोष्टी ठेवलेल्या होत्या. घरी असताना दादा त्या खोलीत जाऊन…

Read More

भाग – 1 रोहनची इथे कोकणातील घरी यायची तारीख जवळ येत चालली होती, तसतशी मला आबांची काळजी जास्त वाटत होती. नुकत्याच एका मोठ्या आजारातून ते बरे झाले होते आणि आमचं घर हळूहळू पूर्वपदावर येत होते. एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याच्या सीझनला खरंतर  इतकी धावपळ सुरू असते आमची… त्यात यंदा आबांची देखरेख आणि जातीने लक्ष देणं नव्हतं. मी खरं नकोच म्हणालो होतो आबांना, पण ते ऐकायला तयार नव्हते. कारणही तसेच होते… इतक्या वर्षांची परंपरा खांद्यावर मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने पेलून घेतली होती त्यांनी. त्यात गेले कित्येक वर्षे गडीमाणसांना कायमच माणुसकी म्हणजे काय ते आबांनी दाखवून दिले होते. त्यामुळे वाडीतले आंबे खाली…

Read More

“बरी होईल ना रे ती?” राहुलने भावूक होऊन, माझ्या कुशीत शिरून विचारले…` “अर्थात, नक्की बरी होणार आहे ती!” मी राहुलच्या पाठीवर हळुवारपणे थोपटत म्हणालो. नंतर मी त्याला सायलीच्या बाजूच्या बेडवर बसवले. “मी आलो आहे ना आता तुझ्या सोबतीला, मग तू आता स्वतःला सावर.” राहुलने मग सायलीची फाइल माझ्या हातात दिली. मी झर्रकन त्यावर नजर टाकली. त्यातले विशेष काही समजले नाही. पण बऱ्याच ठिकाणी ‘नॉर्मल’ हा शब्द दिसला, त्यावरून प्रकरण गंभीर नसावे, असा अंदाज बांधला. दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक राहुलचा फोन आला सायली आजारी असून नामांकित इस्पितळात दाखल असल्याची बातमी सांगणारा. मी फोनवरच त्याला धीर दिला आणि शक्य तितक्या लवकरच्या फ्लाइटने…

Read More

त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती. सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. ड्रायव्हर निष्णात मेकॅनिक देखील होता, त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरू होणं गरजेचं होतं. दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे टपरीवजा छोटंसं हॉटेल दिसलं मला… बुडत्याला काडीचा आधार, तसं उपासमार होणार नाही इतपत समाधान मला होतं. ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे दोन सहकारी टपरीच्या दिशेने चालायला लागलो. टपरीवर पोहोचल्यावर वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. दोन-चार टेबलं आणि बाकडी ठेवली होती. त्यावर बसून काही व्यक्ती डाळभात खात होती. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता. वाढलेला डाळभात खाऊन पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या…

Read More

“खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला. तुमच्यासारखे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात कंदील घेणारे फार कमी लोकं आहेत…” असं म्हणून संस्थेच्या अधिकाऱ्याने माझ्यासमोर हात जोडले. “त्याची काही आवश्यकता नाही, कारण मी माझं कर्तव्य करतो आहे…” एवढं बोलून मी त्या संस्थेच्या आवारातून निघालो. बाहेर येऊन गाडीचे दार उघडले. परत एकदा मागच्या सीटवर ठेवलेले कंदील बघितले आणि मी माझी गाडी समाधानाने सुरू केली. गेली कित्येक वर्षे मी हे सामाजिक बांधिलकीचे व्रत आपणहून करत आलो आहे. बंगल्याच्या आवारात गाडी पोहोचली. रामूकाका पोर्चमध्ये माझी वाट बघत उभेच होते. “रामूकाका गाडीतील कंदील काढून घ्या आणि एक-दोन दिवसात दिनकरकडून नेहमीप्रमाणे बंगल्यावर लावून घ्या…” हेही वाचा – सदूकाका अन् मानाचा…

Read More