Author: सतीश बर्वे

Avatar photo

वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

“दिदी मुझे माफ कर दो. आजतक मैंने आप के साथ जो बरताव किया, उसके लिए मै बहुत शर्मिन्दा हूं.” कनिका आज सकाळी सकाळी घरी येऊन मला घट्ट बिलगून म्हणाली. तिच्या या अचानक वागण्याचा मला धक्का बसला. पण तरीही, ती काही गोष्टी उशिरा का होईना समजून गेली, याचं मला समाधान देखील वाटले. काही गोष्टी समजायला तसा योग जुळून यावा लागतो, असं म्हणतात… ते कनिकाच्या बाबतीत खरं ठरलं होतं. तिला जरा थोपटून शांत केलं आणि जवळच्या खुर्चीवर बसवून मी म्हणाले “कनिका मी फार मोठं काही केलं नाहीये. मी फक्त माझा शेजारधर्म पाळला.” “दिदी मैं भी अभी कोशिश करूंगी आपकी तरह बरताव करने…

Read More

‘‘फ्रेंडशिप डे’पर्यंत तरी माझा श्वास चालू रहाण्यासाठी प्लीज प्रार्थना करा देवाजवळ सगळ्यांनी!’ रविवारी सकाळी वैजूचा असा अचानक मेसेज आला आणि आमच्या कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ‘फ्रेंडशिप डे’ला अजून दोन महिन्यांचा कालावधी होता. म्हणजे, परिस्थिती आणखी गंभीर झाली होती बहुतेक… लगोलग आम्हा मित्रांची फोनाफोनी झाली. रवी, जयंत, कौशल आणि परेशला मी तयार केले आणि पुण्याला जाऊन आम्ही वैजूला भेटलो. “सकाळी मेसेज आणि पांडव हजर लगोलग. क्या बात है!” आम्हाला घरी आलेले बघून वैजू आश्चर्यचकित होऊन म्हणाली. तिचा कॅन्सर खरंतर शेवटच्या स्टेजचा, पण त्याचा कसलाच मागमूस तिच्या चेहऱ्यावर नव्हता. मुंबईहून निघताना विकासला म्हणजे वैजूच्या नवऱ्याला मी फोन करून आमच्या…

Read More

गेल्या आठवड्यात रोजच्या सारखं सकाळी वॉकसाठी बाहेर पडलो. वळणावरच्या एका सोसायटीच्या आवारातील बंद मेन गेटच्या गजांमधून एक आजी-आजोबा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हात हलवून काहीतरी बोलत होते. हे रोजचंच दृश्य होते माझ्यासाठी. आज मात्र न राहवून मी सोसायटीच्या सिक्युरिटीवाल्याकडे त्या आजी-आजोबांची चौकशी केली. त्याच्या बोलण्यातून थोडी माहिती समजली, पण त्याचे काही शब्द मात्र धक्कादायक होते. “क्या बोलू साब बुढ्ढा, बुढ्ढी कबसे वेटिंग लिस्ट पर हैं, पर उनका टिकट भगवान कन्फर्म नहीं करता…” आजोबांचे वय 95 आणि आजीचे 90. वृद्धत्वाव्यतिरिक्त कसलाही आजार नाही. चार-चार खोल्यांच्या दोन फ्लॅटमध्ये आजोबांची दोन मुलं, सुना नातवंडे असा मोठा परिवार रहातो. घरात दोन-तीन नोकर मंडळी. सगळे आपापल्या…

Read More

मी एकंदरीतच भयभीत झालो होतो, त्या अचानक झालेल्या मारामारीत. त्याचे असे झाले होते की, आम्ही जेवायला गेलेल्या बारमध्ये निव्वळ पाय लागल्यामुळे झालेल्या वादावादीची सुरुवात बारबाहेर झालेल्या हमरीतुमरीवर येऊन ठेपली होती. शिव्या द्यायला सुरुवात झाली आणि बाह्या सरसावून एक-दोघेजण आमच्या मित्रांच्या अंगावर धावून आले. माझ्यावर उगारलेल्या हाताला मात्र कोणीतरी वरच्यावर थांबवले आणि त्या मुलाला बाजूला ढकलून दिले. मला वाचवणाऱ्या माणसाकडे मी पाहिले, पण मला काही तो ओळखीचा वाटला नाही. अंगाने तो चांगलाच दणकट होता. व्यायामशाळेत जाऊन पिळदार शरीरयष्टी कमावलेला… “दादा, तुम्ही ठीक आहात ना?” त्या माणसाने मला विचारले, “हो मी ठीक आहे. पण मी तुम्हाला ओळखलेलं नाही,” मी उत्तरलो. “दादा, मी…

Read More

परवा रात्री नीताच्या, म्हणजे राघवच्या मोठ्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला होता. आवराआवरी करायला एक वाजून गेला होता. राघवने मला गेल्याच आठवड्यात निक्षून सांगितले होते की, हळदीचा कार्यक्रम संपल्यावर त्याला माझ्या आणि त्याचा आणखी एक जवळचा मित्र, चैतन्यसोबत रात्रभर गप्पा मारायच्या आहेत. त्याप्रमाणे राघवच्या बंगल्याच्या गच्चीवर आम्ही निवांतपणे बसलो होतो… “काका, आजवर एकही दिवस असा नसेल गेला की, मी आणि दिदी भांडलो नसू. खूप भांडायचो आम्ही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते विसरून देखील जायचो! आम्ही कॉलेजला गेल्यावर आमची भांडणं कमी झाली. पण आता दोन दिवसांनी दिदी नसेल भांडायला… खूप कठीण जाणार आहे मला हे सगळं पचवायला,” असं म्हणून राघव…

Read More

त्याला जाऊन आज आठवडा झाला. पण ती गोष्ट मन मानायला तयार नाही. वाटलं येईल कुठून तरी आणि पायाशी घुटमळत बसेल, जोवर मी डोके कुरवाळून त्याचे लाड करत नाही! माझा बेस्ट फ्रेंड होता तो. खऱ्या मित्रांपेक्षाही जवळचा. सगळे लाड आणि हट्ट पुरवून घ्यायचा. आमच्या घरातील एक हक्काचा बनला होता तो! काही वर्षांपूर्वी एक दिवस दुपारचा भाजी मार्केटमधून आमच्या माईच्या मागोमाग थेट बंगल्यात आला पाहुणा म्हणून. झाले विक्रमला म्हणजे माझ्या धाकट्या भावाला तो फार आवडला. त्याने बाबांजवळ हट्ट धरून त्याला बंगल्यात ठेऊन घेतला. बघता बघता घरातील सगळ्यांनाच त्याचा लळा लागला. त्याच्या काळ्यासावळ्या रंगावरून माईने त्याचे नाव ‘कन्हैया’ ठेवले! त्याचा काही हट्ट नसायचा.…

Read More

आज तो इथून जाणार याचा आनंद व्यक्त करायचा की उद्यापासून तो नसणार याचं दुःख व्यक्त करायचं? खरंच कठीण आहे उत्तर देणं! आम्हा सगळ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आमच्या इतर सहकाऱ्यांना… कोरोना महामारीच्या काळात आमच्या हॉस्पिटलमध्ये तो महिन्याभरापूर्वी दाखल झाला होता जनरल वॉर्डात. मला आठवतंय आमच्यातील पहिले संभाषण… “आईच्या गावात इतका देखणा डॉक्टर? डॉक्टर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आला आहात. चित्रपटसृष्टीत असायला पाहिजे होता तुम्ही…” त्याचं बोलणं ऐकून खरंच कित्येक दिवसांनी मी हसल्याची जाणीव मला झाली होती. मी हसूनच त्याला म्हणालो की, “मी तिथे असतो तर तुझी माझी भेट कशी झाली असती. देवाची काहीतरी योजना नक्कीच आहे यात.” त्याला तपासून मी पुढे निघालो,…

Read More

आज घड्याळ खूप हळू चाललंय, असं वाटत होतं मला. सहा वाजले होते… एव्हाना चिनार घरी परत यायला निघाला असेल. माझ्या डोक्यात तेच विचार सुरू होते. माझ्या मनाची घालमेल सुनबाईने अचूक ओळखून ती मला म्हणाली, “आबा चिनारचा फोन येऊन गेला. तो निघाला आहे ऑफिसमधून, येईल सातपर्यंत. इथे येरझाऱ्या मारण्यापेक्षा तुम्ही थोडावेळ आराम करा तुमच्या खोलीत.” सुनबाईचंही बरोबर होते. मी माझ्या खोलीत गेलो खरा, पण लक्ष मात्र दरवाजाकडे होते. त्याच नादात डुलकी लागल्याचं, मला कळलं देखील नाही. 0000 “राजे आता हळूहळू माझ्या मांडीवर थोडा वेळ झोपायची सवय मोडायला लागा. लग्न ठरलंय तुमचं आता. उद्या माझ्या नातसुनेने तक्रार केली तर मग अवघड होऊन…

Read More

भाग – 2 मी दादांच्या कपाळावर हात ठेवून थोपटत असताना दादांनी महत्प्रयासाने डोळे उघडले… तेव्हा मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो की, दादा तुम्ही मघाशी काहीतरी हळू आवाजात बोललात! दादांनी मोठा सुस्कारा सोडला आणि मला म्हणाले, “तेव्हा रागाच्या भरात मोठी चूक करून बसलो. अरुणच्या सच्च्या प्रेमाचे रंग मी नाही रे ओळखू शकलो. त्याला घराबाहेर काढण्याएवढा त्याचा गुन्हा निश्चितच गंभीर नव्हता. पण तेव्हा माझ्या डिवचलेल्या अहंकाराने माझ्यातील वडिलांच्या मायेवर विजय मिळवला आणि त्या दिवशी पराकोटीला पोहोचलेल्या आणि रागीट शब्दांच्या हमरातुमरीवर आलेल्या आमच्या नात्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा मी अरूणला मी घराबाहेर काढून पडला. मी क्रोधाने इतका लालबुंद झालो होतो की, अरुणची आई माझा…

Read More

भाग – 1 घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तशी माझ्या मनात धाकधूक वाढत चालली होती. ते सगळं अचूक ओळखून दिप्ती काकूने म्हणजे अजितदादांच्या बायकोने मला शेवटी विचारले, “सुहास तुझा चेहरा का असा पडलाय?” हे ऐकून समोरच्या बेडवर शांतपणे आडवे झालेल्या दादांनी पण मला विचारले, “सुहास सगळं ठीक आहे ना?” “हो दादा सगळं ठीक आहे,” मी जेमतेम म्हणालो खरं, तसं पण माझ्या मनात काय सुरू होते, ते मला कोणालाच सांगता येणार नव्हते. सहा महिन्यांपूर्वी अचानकपणे झालेली अरुणची भेट आठवली. त्या छोट्या गावात निराधार गरीब मुलांना शिकवण्यासाठी अरुणने मोठ्या हिमतीने सुरू केलेला तो शैक्षणिक प्रकल्प आठवला… मला दिसताक्षणी त्याने कडकडून मारलेली…

Read More