Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    May 13, 2026

    Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु

    May 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 मे 2026

    May 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके
    ललित

    टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेMay 13, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, रुमालाचा पिळ, राहुल बोका, वजन कमी करण्यासाठी धमकी, वजन कमी झाल्याचे सेलिब्रेशन, बेधडक स्वभावाचा राहुल, अभ्यासात हुशार राहुल, टेरर राहुल, टेरर बोका, ओल्या रुमालाचे फटके, आहारावर नियंत्रण
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रविवारी दुपारी साडेचार-पाचला चहा पिऊन मी निवांत पेपर वाचत बसलो होतो, तेवढ्यात बेल वाजली. दार उघडून बघतो तर दारात राहुल उभा. अचानक आलेल्या त्याला बघून मला थोडे आश्चर्य वाटले. “डूड सॉरी, पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे… सोनिया प्लीज कम,” असं त्याने म्हटल्यावर एक सुंदर मुलगी आत आली. राहुलने मला डोळा मारून खूण केली आणि चक्क लाजला तो. मी समजायचे ते समजून गेलो.

    मी राहुलला जवळ घेतले आनंदाने आणि त्याचे अभिनंदन केले. “सॉरी डूड, पण मी घाईत आहे. आज पहिल्यांदाच आम्ही बाहेर जाणार आहोत म्हणून मुद्दाम तुझ्याकडे आलो आधी. चल यार आता आम्हाला आशीर्वाद दे,” असं म्हणून दोघे चक्क माझ्या पाया पडले. मी पोटभर आशीर्वाद दिला त्यांना आणि म्हणालो आता तोंड तरी गोड करून जा. “डूड आता घाईत आहे यार. लवकरच भेटू परत” असे म्हणून तो सोनियासह निघून गेला.

    ते दोघे गेले आणि नकळत मी राहुलचा विचार करायला लागलो. साधारण पाच-सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट. पार्ल्यातील एका कॉलेजच्या जवळ एक मुला-मुलींचा ग्रुप दे धमाल करत होता. रस्त्यावरच्या रहदारीचा त्यांना विसर पडला होता. अचानक एक मुलगा त्या घोळक्यातून रस्त्याच्या मधोमध आला. तो पाठमोरा होता आणि मागून एक कॅब जोरात येत होती. मी थोडा धावत जाऊन त्या मुलाला बाजूला ओढलं आणि त्या कॅबने जोरात ब्रेक दाबले. सगळे क्षणात घडले होते. सुदैवाने तो वाचला होता. एव्हाना त्याचे मित्र-मैत्रिणी भानावर आले. या मुलाच्या हाताला बर्‍यापैकी खरचटले होते. मी त्याला आणि त्याच्या एका मित्राला रिक्षातून माझ्या घरी आणले.

    तीच माझी आणि राहुलची पहिली ओळख. त्याच्या हातापायाला जुजबी मलमपट्टी केली तेव्हा थोडा नॉर्मल झाला. बोलता बोलता मला समजले की, तोही पार्लेकरच आहे. त्याने मला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आले. मी त्याला थोपटुन म्हणालो की, “भंकस बिंदास कर, पण आजूबाजूचे भान ठेवून.” त्यानंतर आम्ही चांगला अर्धा तास गप्पा मारल्या आणि तो जायला निघाला. “अधून मधून येत जा रे,” असं मी राहुलला म्हटले तर तो बोलून गेला की, “मी रोज येऊन तुझी खुशाली विचारणार आहे. बाय द वे मी तुला डूड म्हणून हाक मारली तर चालेल ना?” मी “हो” म्हटले.

    घाऱ्या डोळ्यांच्या राहुलला ‘बोका’ या नावाने त्याचे कॉलेजचे मित्र मैत्रिणी हाक मारायचे आणि मग बोलल्याप्रमाणे तो रोज यायला लागला. “डूड मला तुझ्या घरी आले की, खूप एनर्जेटिक वाटते. तू यार खूप सॉलिड आहेस. तुझे विचार फूल टू आमच्या जनरेशनचे आहेत, मानलं तुला. आमच्या जनरेशनकडे बघण्याचा तुझा ॲप्रोच खूप पॉझिटिव्ह आहे. रियली अमेझिंग! सॉलिड मोटिवेट करतोस तू. नाहीतर माझे बाबा…”

    हेही वाचा – आयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…

    मी त्याची समजूत काढून म्हणालो की, “राहुल, अरे माझी आणि त्यांची भूमिका वेगळी आहे. तुझी काळजी वाटते त्यांना त्यामुळे तसे बोलत असतील… किंबहुना सर्वच घरात असं चालत असणार. मुलांनी चांगले शिकून आयुष्यात सेटल व्हावं, असं कोणत्या आईबाबांना वाटणार नाही?  त्यांना पण समजून घेत जा रे कधीतरी… त्यांना तुझा मित्र कसा बनवता येईल, त्याचा विचार कर आणि मग बघ कसा बदलेल तुझा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा!”

    पण माझे बोलणे त्याला काही पटलेले दिसले नाही, म्हणून मी तो विषय सोडून दिला.

    राहुल पूर्वी शाळेत आणि आता कॉलेजमध्ये ‘टेरर’ म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या टगेगिरीच्या खूप गोष्टी मला तो सांगायचा. पण जेवढी धम्माल तो करायचा तेवढाच तो अभ्यासात देखील हुशार होता. वाणिज्य शाखेतील पदवी मिळाल्यानंतर त्याला चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे होते आणि त्यादृष्टीने त्याचा जोरदार अभ्यास सुरू होता.

    “डूड, यु हॅव पुट ऑन लॉट ऑफ वेट. यार डू समथिंग. जिमला जात जा…” मी त्याला म्हटले, “अरे माझे गुडघे दुखतात हल्ली म्हणून मी खाण्यापिण्यावर कंट्रोल करीन.” मी असं म्हणायचा अवकाश की, त्याने खिशातून रुमाल काढला तो थोडा ओला केला आणि त्याला पीळ देऊन गादीवर सटकन फटका मारला आणि मला हसत हसत म्हणाला, “डूड, तू सीरियसली वेट कमी कर नाहीतर, ओल्या रुमालाने फटके देणार तुला.”

    त्याच्या डेअरिंगच मला कौतुक वाटलं आणि मी हसायला लागलो… त्याला म्हणालो, “तू खरंच मारणार मला?” त्यावर तो म्हणाला, “नाही यार, पण थोडी हूल देतो आहे तुला…”

    मी त्याला विचारले की, “हे रुमालाचे कुठून शिकलास?” तर तो म्हणाला की, “मला बाबांनी सांगितले होते एकदा… त्यांच्या वेळी शाळेत असताना मित्र एकमेकांना असे ओल्या रुमालाने फटके मारायचे.”

    हेही वाचा – मानसिक आधार देणारा सलाइनचा स्टँड!

    मला माझे शाळेचे दिवस आठवले आणि डोक्यात प्रकाश पडला की, खरंच आमच्या वेळी सुद्धा हाच प्रकार होता.

    “डूड तू बारीक हो. मग आपण डिस्को वगैरेला जाऊया. एन्जॉय कर यार तुझं लाइफ. किती दिवस अजून सगळ्यांचे सगळे करत बसणार? त्यांच्या काळजीने किती दिवस स्वतःचे नुकसान करून घेणार? आता तुला मस्तपैकी शॉपिंगला घेऊन जाणार आहे मी. तुझा लूक बदलून टाकणार आहे मी. यंग आणि डॅशिंग दिसला पाहिजे तू आता”. त्याच्या या विचारावर मी म्हटले, “बघ रे बाबा, तसा झालो आणि तुझ्या कॉलेजच्या आसपास फिरलो तर, तुझ्या पोटावर पाय येईल!”

    त्यावर तो म्हणाला, “माझे तर काम झाले आहे. आता नो टेन्शन फॉर मी नाऊ.”

    आमच्या वयात खरं तर सत्तेचाळीस वर्षांचे अंतर आहे. पण ज्या पद्धतीने आमच्यात संवाद होतात ते ऐकून माझेच मला हसायला येते आणि क्षणभर का होईना पण मी खरोखरच तरुण झाल्याचा आनंद मला होतो.

    राहुलच्या ओल्या रुमालाच्या फटक्यांच्या भीतीने का होईना, पण मी माझ्या रोज खाण्यापिण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागलो. दोन महिन्यांत माझे वजन चक्क एक किलोने कमी झाले, हे कळल्यावर राहुल आनंदाने म्हणाला की, “आता फुल ऑन सेलिब्रेशन तो बनता है. तू जस्ट बघत रहा कसे हटके सेलिब्रेशन मी करतो ते. तू भी क्या याद करेगा, ऐसा काटुंगा तुझे की बस रे बस!” राहुलची भाषा आणि त्याचबरोबर हाताची ॲक्शन बघून माझे मात्र हसून हसून पोट दुखायला लागले.

    माझे वजन कमी झाल्याचे निमित्त आणि आमची जगावेगळी बहरलेली मैत्री अशा दोन्ही कारणांसाठी आम्ही दोघे हटके स्टाईलमध्ये सेलिब्रेशन काय करणार आहोत याची उत्सुकता मला आता लागून राहिली आहे.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    Bookshelf : गारंबीचा बापू… बंडखोर बापू प्रत्येकाच्या मनात!

    May 13, 2026 ललित

    नाते… रक्ताचे अन् प्रेमाचे!

    May 12, 2026 ललित

    तो राजहंस एक…

    May 12, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : गारंबीचा बापू… बंडखोर बापू प्रत्येकाच्या मनात!

    By Team AvaantarMay 13, 2026

    श्री. ना. पेंडसे लिखित ‘गारंबीचा बापू’ 1950च्या आसपासची प्रादेशिक कादंबरी. कोकणातल्या निसर्गाचे वर्णन यात सतत…

    नाते… रक्ताचे अन् प्रेमाचे!

    May 12, 2026

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    उपम्याला उपमा नाही…

    May 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    May 13, 2026

    Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु

    May 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 मे 2026

    May 13, 2026

    Bookshelf : गारंबीचा बापू… बंडखोर बापू प्रत्येकाच्या मनात!

    May 13, 2026

    नाते… रक्ताचे अन् प्रेमाचे!

    May 12, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 296
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 417
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 206
    • मैत्रीण 19
    • ललित 621
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    May 13, 2026

    Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु

    May 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 मे 2026

    May 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.