मेष
- हा आठवडा मनाप्रमाणे कामे होण्याचा आहे. नोकरदारांनी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. हाताखालच्या लोकांकडून युक्तीने कामे करून घ्यावीत. व्यावसायिक वर्गाला कमी श्रमात जास्त यश आणि पैसा मिळेल. ओळखीतून नवीन कामे मिळू शकतात. व्यवसायात भरपूर उलाढाल होईल. महिलांना नवीन ओळखीतून फायदा होईल. तथापि, आरोग्य सांभाळावे. विद्यार्थ्यांना सुट्टीची मजा अनुभवता येईल.
वृषभ
- या आठवड्यात ग्रहमान सुधारत आहे. आठवड्याला उत्साहात सुरुवात होईल. नोकरदारांना अनपेक्षित कामे करावी लागतील. बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होईल. नोकरदारांना तसेच व्यावसायिकांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यावसायिक वर्गाची आर्थिक स्थिती उत्तम राहिल. कामाचे नियोजन करा, त्यामुळे कमी कष्टात कामे पूर्ण करू शकाल. महिलांना प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल. धार्मिक गोष्टीत सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, आनंदी रहाल.
मिथुन
- या आठवड्यात महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. नोकरदारांना वरिष्ठ महत्त्वाची जबाबदारी सोपवतील आणि ती जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. हितसंबंध मजबूत करू शकाल. व्यावसायिक वर्गाने व्यवसायात थोडा बदल करून फरक पाहावा, फायदा होईल. उत्पादनांच्या जाहिरातीवर भर द्या. काही जुनी येणी असतील तर, ती वसूल होतील. महिलांची आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. त्या नवीन गुंतवणूक करू शकतील. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळू शकते. मित्रांना दिलेले पैसे परत मिळतील.
कर्क
- या आठवड्यात गुरू तुमच्या राशीत येत आहे आणि उच्चीचा होत आहे. नोकरदारांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. कार्यालयात कामाचा ताण जाणवेल. कोणाशीही बोलताना सांभाळून बोला. व्यावसायिक वर्गाने पैसा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवा. महिलांना धार्मिक स्थळांना भेट देता येईल. त्यानिमित्त कुटुंबाबरोबर प्रवास होईल. विद्यार्थ्यांना मनाविरुद्ध कामे करावी लागू शकतात. मात्र, स्वतःला अनावश्यक त्रास करून घेऊ नका.
सिंह
- या आठवड्यात परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरदारांनी पुढे होऊन अतिरिक्त कामे ओढवून घेऊ नयेत. स्वतःची क्षमता ओळखून काम करा. व्यावसायिक वर्गाने वेळेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यतत्पर राहा. महिलांनी लोकांची योग्य पारख करून हुशारीने त्यांचा उपयोग करून घ्यावा. विद्यार्थी मित्रांच्या मदतीसाठी सरसावतील. पण, त्याचवेळी मित्रांची योग्य पारख करा.
हेही वाचा – विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
कन्या
- या आठवड्यात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नोकरदारांना कामानिमित्त विविध सवलती आणि भत्ते मिळू शकतात. शिवाय, प्रवासही होईल. व्यावसायिक वर्गाला यश मिळेल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. नव्याने गुंतवणूक करू शकाल. महिलांना कौटुंबिक समाधान मिळेल. तसेच, प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. विद्यार्थ्यांना मित्र-मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाण्याचा आनंद मिळेल.
तुळ
- या आठवड्यात ग्रहांची अनुकूलता असल्यामुळे यश मिळेल. नोकरदारांनी नवीन जबाबदारी स्वीकारावी. हितचिंतकांची मदत मिळेल. त्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यावसायिक वर्गाला पूर्वी केलेल्या कामाचे यश आणि आर्थिक फळ आता मिळेल. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. महिलांना माहेरची माणसे भेटतील. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
- या आठवड्यात ग्रहमानाची उत्तम साथ मिळेल. नोकरदारांना स्वतःची कामे पूर्ण करून सहकाऱ्यांना मदत करता येईल. काही कामांच्या बाबतीत गुप्तता ठेवा. व्यावसायिक वर्गाला अनपेक्षित लाभ होईल. काही रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. महिलांना केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. त्यांचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे.
धनु
- या आठवड्यात कामासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. नोकरदारांनी बेफिकीर राहून चालणार नाही, कार्यक्षमता वाढवून कामे करावी लागतील. मेहनत आणि चिकाटीने अशक्य गोष्टीही व्यावसायिक वर्ग साध्य करू शकेल. त्यांचा कामाचा उरक चांगला राहील. महिलांना कमी कष्टात जास्त यश मिळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांनी अतिसाहस टाळावे, विशेषत: वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.
मकर
- या आठवड्यात सकारात्मक विचार ठेवा. नोकरदारांची मनाप्रमाणे कामे होतील. मुख्यत: दिलेला शब्द पाळा. त्याचप्रमाणे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यावसायिक वर्गाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. कामात लवचिकता ठेवावी लागेल. महिलांनी विचार आणि कृती यांच्यात एकवाक्यता ठेवावी. विद्यार्थ्यांनी पैशाचा हव्यास करू नये. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे.
कुंभ
- नोकरदारांच्या वाट्याला किचकट कामे येतील. पण हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. त्याद्वारे वरिष्ठ आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांचा विश्वास संपादन कराल. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नातेवाईक घरी आल्याने महिलांचा वेळ कामात जास्त जाईल. विद्यार्थ्यांना हातात घेतलेले प्रोजेक्ट पूर्ण करता येतील.
हेही वाचा – सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!
मीन
- प्रकृतीच्या तक्रारी राहू शकतात. नोकरदारांच्या कामाचे चीज होईल. कामानिमित्त प्रवासही होईल आणि प्रवासात नवीन ओळखी होतील, त्याचा फायदा होईल. व्यावसायिक वर्गाचा कामाचा वेग उत्तम राहील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. महिलांनी आर्थिक गुंतवणुकीबाबत चोखंदळ राहावे. त्यांना कामातून आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम जॉब मिळू शकतो. मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा योग आहे.


