Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रमेश वेटर अन् न दिलेली टीप
    ललित

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेMay 23, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, न दिलेली टिप, रमेश वेटरचा हलगर्जीपणा, रमेश वेटरमुळे पार्टीचा बेरंग, रमेश वेटरमुळे केक वाया, रमेश वेटरचे पत्र, रमेश वेटरचे नाइट कॉलेजमध्ये शिक्षण, रमेश वेटरची बँकेत नोकरी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज खूप महिन्यांनी माझ्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा योग आला. हमरस्त्यापासून लांब असलेल्या या रेस्टॉरंटची मी नेहमी निवड करायचो ती तेथील शांत वातावरण बघून. वरचेवर तिथे जाण्यामुळे माझी तिथल्या वेटर्स आणि मालकांसोबत छानपैकी ओळख झाली होती.

    जेवण झाल्यावर बिल घेऊन आज वेटरऐवजी मालक आल्याचे बघून मला आश्चर्य वाटले.

    “अरे सर, तुम्ही का घेऊन आलात बिल?” मी त्यांना विचारले.

    माझ्याकडे मंद स्मित करत, “त्याला कारणच तसं आहे,” असं म्हणत मालकांनी एक बंद लिफाफा माझ्या समोर धरला.

    “हे काय आहे?” मी न राहवून विचारले.

    त्यावर मालकांनी खुलासा केला, “रमेश वेटर इथली नोकरी सोडून गेला. पण जाताना तुमच्यासाठी हा लिफाफा देऊन गेला आहे. म्हणाला की, जेव्हा तुम्ही याल तेव्हा आठवणीने तुम्हाला द्यायला.”

    “ठीक आहे. मी घरी गेल्यावर वाचीन,” असं म्हणून बिल देऊन तो लिफाफा घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर पडलो. पार्किंगमधली माझी गाडी सुरू करून मी हमरस्त्याला आलो. गाडी चालवताना मला माझी रमेशशी झालेली पहिली आणि वादळी भेट आठवली.

    जवळच्या नात्यातील एक घरगुती समारंभ साजरा करायला मी पाच वर्षांपूर्वी इथे आलो होतो. त्यासाठी मी एक भलामोठा केक ऑर्डर केला होता. रेस्टॉरंटच्या फ्रीजमध्ये तो केक काही काळ ठेवला होता. पण एक वेटर तिथून तो आमच्या टेबलावर आणत असताना, घाईगडबडीत असलेला रमेश त्या वेटरवर आदळला, अचानक लागलेल्या धक्याने केक खाली पडून त्याचे तुकडे झाले. माझ्या नजरेसमोरच हे झाल्याने मी रमेशला खूप ओरडलो… पण मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगोलग मध्यस्थी करून तसाच दुसरा केक मागवला… आमचा कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला. क्षणभर सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता, पण सगळे जण समंजस असल्याने झाला प्रकार जास्त ताणला न जाता आमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला.

    हेही वाचा – मुलाचं परदेशी शिक्षण अन् मातृत्वाची परीक्षा!

    त्यानंतर मात्र जेव्हा जेव्हा त्या रेस्टॉरंटमध्ये मला रमेशने सर्व्ह केले, तेव्हा तेव्हा मी तो प्रसंग आठवून त्याला टीप नाही द्यायचो. तो आशेवर असायचा. पण मी माझा निर्णय बदलला नाही.

    …आणि आज अचानक हा लिफाफा माझ्या हाती आला होता.

    घरी जाऊन फ्रेश झाल्यावर मी आधी तो लिफाफा उघडला आणि आतल्या कागदावरचा मजकूर मी वाचू लागलो…

    “सर, सर्वप्रथम तुम्ही माझं पत्र वाचत आहात यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे. माझ्या धांदरटपणामुळे पाच वर्षांपूर्वी तुमच्या कार्यक्रमात विघ्न आले, याबद्दल आज परत एकदा मी तुमची माफी मागतो. हे घडले त्याच्या काही महिन्यांपूर्वी मी तिथे कामाला लागलो होतो. तेव्हा मी 12वी पास होतो. पण पुढील शिक्षणासाठी गावाकडे सोय नव्हती. म्हणून सरपंचांच्या ओळखीने मुंबईत एके ठिकाणी रहायची सोय झाली होती. जिथे रहायचो त्यांच्याच ओळखीने या हॉटेलात नोकरी मिळाली. दोन वेळच्या मोफत जेवणाची सोय झाली होती. संध्याकाळी तीन तासांची मोकळीक मालकांनी दिली होती, नाइट कॉलेज करण्यासाठी! ते संपलं की, मी परत यायचो… रात्री सर्व साफसफाई करून झोपण्यापुरता घरी जायचो.

    सर, त्या दिवशी माझ्या चुकीबद्दल आणि त्या घटनेनंतर तुम्ही मला जे काही बोललात, तेव्हा त्याक्षणी मला तुमचा खूप राग आला. पण मी शांतपणे ऐकून घेतले, कारण चूक माझीच होती. त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही आलात आणि मी तुमची ऑर्डर घेतली, तेव्हा तेव्हा तुम्ही मला टीप दिली नाही. पण याच मुद्दाम न दिलेल्या टिपेमुळे माझा स्वाभिमान डिवचला गेला. तिथेच मग एक गोष्ट मी मनाशी पक्की केली की, आता काहीही होऊ दे, पण या साहेबांना काहीतरी बनवून दाखवायचंच!

    हेही वाचा – मनीऑर्डर… आण्णांच्या आत्म्यास समाधान देणारी!

    नाइट कॉलेजमध्ये झटून अभ्यास केला आणि बीकॉमची पदवी पहिल्या श्रेणीत मिळवली. गावाकडे आई आणि बा जणूकाही मी मोठी लढाई जिंकल्यागत गावभर सांगत फिरले ही बातमी. नाईट कॉलेजच्या सरांनी सुचवल्याप्रमाणे मी बॅंकेच्या परीक्षा दिल्या आणि अखेर तीन महिन्यांपूर्वी स्टेट बँकेत कारकून म्हणून रूजू झालो. मी नंतर रेस्टॉरंटमधली नोकरी सोडून दिली. फक्त मालकांना विनंती केली होती की, हा लिफाफा तुम्हाला देण्यासाठी…

    सर तुम्ही न दिलेल्या त्या प्रत्येक टिपचा मी आयुष्यभर ऋणी आहे, कारण त्यामुळेच माझा स्वाभिमान डिवचला जाऊन रात्रंदिवस मेहनत करून मी आजचा दिवस बघू शकलो. तुम्ही त्या दिवशी रागाच्या भरात जे जे काही बोललात, त्याने मला जगण्याची ताकद आणि नवीन उमेद दिली. ते मोठ्या आवाजातले बोलणे माझ्या आयुष्यात दिशादर्शक ठरले.

    कधी बोलावंसं वाटलं तर, जरूर संपर्क करा. माझा मोबाइल नंबर आणि बॅंकेचा पत्ता खाली देत आहे…”

    माझ्या हातून रमेशचे पत्र गळून पडले आणि मी नि:शब्द झालो.

    लवकरात लवकर रमेशला भेटून त्याचं अभिनंदन करून त्याला भरभरून शुभेच्छा देण्याचे ठरवून मी डोळे मिटून घेतले आणि झोप येण्याची वाट बघू लागलो.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026 ललित

    रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू

    May 23, 2026 ललित

    ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली…

    May 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    By मधुर सुनील कुलकर्णीMay 23, 2026

    मी स्कूटर पार्क केली आणि बिल्डिंगच्या लिफ्टपाशी आले. लिफ्ट वर गेली होती आणि दहाचा आकडा…

    रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू

    May 23, 2026

    ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली…

    May 22, 2026

    मन माऊली सकळांची…

    May 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026

    रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू

    May 23, 2026

    Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    May 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 मे 2026

    May 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 306
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 428
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 646
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    May 23, 2026
    Most Popular

    अधीर ‘मंजुळा’चं वेड

    May 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.