Author: अस्मिता दीक्षित

Avatar photo

जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

|| श्री स्वामी समर्थ || गुणमिलन करताना नवमांश महत्त्वाचा. नवमांश म्हणजे प्रत्येक राशीचा नववा भाग. नवमांश कुंडली प्रामुख्याने विवाहासाठी बघितली जाते, पण इतर वर्ग कुंडल्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. नवमांश कुंडलीशिवाय आपण विवाहाचा विचार करू शकत नाही. लग्न कुंडलीतील लग्नेश, सप्तमेश, चतुर्थेश, धनेश आणि अर्थात कारक ग्रह शुक्र यांचे बळ नवमांश कुंडलीत बघावे लागते; कारण नवमांश कुंडलीत प्रत्येक ग्रहाचे पत्रिकेतील अधिष्ठान, बळ संपूर्णपणे स्पष्ट होते. नवमांश कुंडलीतील लग्न हे विवाहासाठी असलेली इच्छा दर्शवते. अनेक लोकांना विवाह करण्याचीच इच्छा नसते किंवा अनेकवेळा पालकांच्या इच्छेखातर विवाह होतो, पण त्याची परिणती सुखात होत नाही, कारण तो मनापासून केलेला नसतो. त्यामुळे नवमांश कुंडलीत लग्न…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || आपल्या सद्गुरूंवर आपली नितांत श्रद्धा तर हवीच, पण त्याहीपेक्षा अधिक हवा तो विश्वास! गुरू आपले कधीतरी वाईट करतील का? विचारा प्रश्न स्वतःच्याच मनाला. आई आपली गुरू आहे, ती जेवणात विष कालवून देईल का? अजिबात नाही! अगदी तसेच जे जे होत आहे, ते त्यांच्या इच्छेने याची खूणगाठ एकदा मनात पक्की झाली की, आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपले आपल्यालाच मिळत जाते. आत्मचिंतन हाही एक अध्यात्माचा भाग आहे. स्वतःच्या आत मनात डोकावले तरी सुद्धा अनेक प्रश्नांची उकल सुटते . केतूला दिसत नाही, पण त्याच्याकडे मन आहे आणि स्पर्शज्ञान सुद्धा आहे. दृष्टी नसल्यामुळे बाह्यजगातील कुठल्याच गोष्टीचा आस्वाद घेता येत…

Read More

ज्याने जन्माला घातले, त्याला काळजी असते की, याला कसं संभाळायचं! पण आपल्यालाही कष्ट करायला लागतातच. पण काहींना आपल्या कुंडलीतील ग्रहमानाचा दोष वाटतो. वास्तवात कोणताही ग्रह अथवा त्यांची युती या दोष तयार करतच नाहीत, ते त्या व्यक्तीला प्रपंच करण्यासाठी जे कौशल्य लागते ते देण्यासाठी एकत्र आलेले असतात. पत्रिकेत चंद्र-शनी युती असो अथवा चंद्र-राहू… काहीही झाले की, त्यावर खापर फोडणे म्हणजे पळवाट झाली. हे ग्रह बरे-वाईट फळ देत असले तरी, त्यावर विसंबून न राहता कर्म करत राहणे आवश्यक आहे. स्वामींनीही सांगितले आहे – “शेत पिकवून खा. तुम्ही कष्ट करा. धडधाकट आहात, कुठलेही काम करा आणि स्वाभिमानाने पोट भर.” There is no free…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || जीवन आनंदाने ज्याला जगता येते तो खरा माणूस. आपल्या जगण्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असे जगले पाहिजे. आनंदाच्या क्षणापाठोपाठ दु:ख, वेदना सगळे येणार! कारण, त्याशिवाय आनंदाची खरी व्याख्याच समजत नाही. संपूर्ण आयुष्यच काय तर एक संपूर्ण दिवस सुद्धा सगळा आपल्या मनासारखा जात नाही. पण म्हणून आपण जगणे सोडून द्यायचे का? नाही. पण आपण एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगात अडकून राहतो, कुणी एखाद्या शब्दाने दुखावले, तर तेच तेच धरून व्यथित होतो आणि तेच जीवनभर आठवून आठवून उगाळत बसतो आणि समाधानाच्या असंख्य क्षणांना पोरके होतो. या क्षणभंगुर आयुष्याचे जिथे माझे काहीही नाही आणि इथेच मला सगळे ठेवूनही जायचे…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || आज लग्न हा यक्षप्रश्न झालेला आहे. आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता कधी पडतील, याची अक्षरशः चातकासारखी वाट पालक बघताना दिसत आहेत. सुस्वरूप आहे, निर्व्यसनी आहे… सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मग घोडे अडतंय तरी कुठे? यामुळे पालकसुद्धा त्रस्त झालेले आहेत. “काय ठरले का मुलाचे / मुलीचे लग्न?” हा प्रश्न मनापासून असो अथवा खवचटपणे विचारला गेलेला असो, तो विचारणे आता बंद झाले पाहिजे. काय आहे, तुमच्या भावना कितीही चांगल्या असतील, पण हे ऐकणारा आता या प्रश्नाने सुद्धा त्रासला आहे. विवाह ठरला की, तुम्हाला नक्की बोलावणार! मग कशाला विचारायचे? यावर नक्की विचार करा. अनेकदा मुलगा / मुलगी मला क्लिक…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || “स्वामींची सेवा करावी तरी कशी?” असा प्रश्न कित्येकांना नेहमीच पडतो आणि विचारलाही जातो. मी नामस्मरण करू की पोथी वाचू? मी स्मरण करू की मानसपूजा करू? की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ? असे नानाविध प्रश्नांची सरबत्ती केली जाते. मुळात स्वामींची सेवा करावी, हा विचार मनात यायला सुद्धा त्यांची कृपा लागते. आपले पूर्वसुकृत (पूर्वपुण्याई) सुद्धा बळकट असावे लागते, तरच संतचरण लाभतील. सेवा करायची आहे, हा एकदा का हा विचार मनात रुजला की, समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. एखाद्या देवतेची भक्ती करताना याच देवतेची भक्ती मी का करत आहे, याचे कारण निदान…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || आज मुलाकडून त्याला पसंत पडलेल्या एका मुलीची पत्रिका गुणमिलनासाठी आली होती. मुलगी दिसायला चांगली, सर्वार्थाने दोघांनाही एकमेकांशी पटेल, असे वाटले म्हणून गुणमिलन करण्यासाठी दोन्ही पत्रिका दिल्या. दोघांचीही सिंह राशी. मुलाचे नक्षत्र केतूचे आणि मुलीचे पूर्वा. त्यामुळे 30 गुण जुळत होते. मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक सुखाच्या दशा निश्चित होत्या, पण मुलीची षष्ठ स्थानाची दशा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती आणि ती पुढे अनेक वर्षं असणार आहे. षष्ठेश ग्रहाच्या नक्षत्रात आणि उपनक्षत्रात एकही ग्रह नाही; त्यामुळे षष्ठ स्थानाचा मालक ग्रह, षष्ठ स्थानाचे प्रबळ काम करणार आणि ग्रह षष्ठ स्थानाचा बलवान कार्येश सुद्धा होणार. अशा ग्रहाच्या दशेत विवाह होणे…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || साधनेस, ध्यान धारणेस सुरुवात करायची आहे. नामस्मरण करायचे आहे… कधीपासून करू? कुठले आसन घेऊ? रोज एकाच जागेवर बसून जप करू का? खुर्चीवर बसू की जमिनीवर? कुठली माळ घेऊ? प्रत्येक जपाला वेगवेगळी माळ घेऊ का? जप सकाळी करू की संध्याकाळी? आंघोळ करून जप करायचा का? हे स्त्रियांनी करायचे की पुरुषांनी? प्रश्नांची मालिका संपतच नाही. बरं, इतके प्रश्न विचारून शेवटी जपास सुरुवात झाली का? असो. मुळातच परमेश्वराचे नामस्मरण करावे, हा विचार मनात येणे हीच गुरुकृपा आहे, असे समजायला हरकत नाही. संकट गळ्याशी आल्याशिवाय परमेश्वराची आठवण येत नाही. आईला मुलाची आठवण मंगळवारी सकाळी, शुक्रवारी दुपारी येते का? नाही.…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || बरेच दिवस हा विषय लिहायचा होता. आजकाल जातक एका ज्योतिषाला पत्रिका दाखवत नाही. ज्योतिषवारी केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसावे बहुधा. आपल्याला हवे ते उत्तर ज्योतिषाकडून येईपर्यंत (निदान त्या आशेवर) ही वारी चालू असावी, असे वाटते. अहो, शेवटी ज्योतिषी हाही एक तुमच्यासारखाच माणूस आहे, फक्त त्याला हे ज्ञान अवगत आहे, जे तुम्हाला अवगत नाही. या शास्त्राचा आधार घेऊन आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्योतिष या माध्यमातून आपण करत असतो. अनेक जण आजकाल या शास्त्राच्या अध्ययनाकडे वळत आहेत. कोरोनानंतर त्याचे प्रमाण खूप वाढले आहे; कारण कोरोनामध्ये घरात करायचे काय म्हणून अनेक प्रकारचे विषय ‘झूम’च्या माध्यमातून हाताळले गेले…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || जिथे आनंद तिथे शुक्र. शुक्र हा भौतिक सुखाचा मेरुमणी आहे. माणसाला सुखासीन आयुष्य जगायला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा कारक शुक्र आहे. मग आलिशान वाहन असो की पर्यटन, उंची वस्त्रे असो की, मौल्यवान दागिने, मधुर वाणी असो की अत्तर किंवा सुमधुर संगीत… सर्वांवर हक्क शुक्रचाच! शुक्र हा कन्या राशीत नीच फळे देतो, तर मीन राशीत उच्च. मीन राशीच त्याने उच्च होण्यासाठी का निवडली असावी? हा प्रश्न अभ्यासकांना पडला पाहिजे; कारण जितके प्रश्न अधिक तितका अभ्यास सखोल. मीन ही कुंडलीतील व्यय भावात येणारी राशी. या राशीला मोक्षाची राशीसुद्धा म्हटले जाते. शेवटची रास असल्याने शरीररचनेनुसार इथे ‘पावले’ येतात. मीन…

Read More