Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    विदर्भातील ‘हाडपक्या’ (मस्कऱ्या) गणपतीचा 239 वर्षांचा इतिहास!

    October 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नवमांश आणि विवाह
    पंचांग आणि भविष्य

    नवमांश आणि विवाह

    अस्मिता दीक्षितBy अस्मिता दीक्षितOctober 2, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, अस्मिता दीक्षित, लेखिका अस्मिता दीक्षित, ज्योतिष अस्मिता दीक्षित, ज्योतिषशास्त्र, पत्रिकेतील ग्रह, पत्रिका गुणमिलन, ग्रहमिलन, जन्मपत्रिकेचा अभ्यास, विवाह सोहळा, वैवाहिक जीवन, नवमांश आणि विवाह
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    || श्री स्वामी समर्थ ||

    गुणमिलन करताना नवमांश महत्त्वाचा. नवमांश म्हणजे प्रत्येक राशीचा नववा भाग. नवमांश कुंडली प्रामुख्याने विवाहासाठी बघितली जाते, पण इतर वर्ग कुंडल्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. नवमांश कुंडलीशिवाय आपण विवाहाचा विचार करू शकत नाही. लग्न कुंडलीतील लग्नेश, सप्तमेश, चतुर्थेश, धनेश आणि अर्थात कारक ग्रह शुक्र यांचे बळ नवमांश कुंडलीत बघावे लागते; कारण नवमांश कुंडलीत प्रत्येक ग्रहाचे पत्रिकेतील अधिष्ठान, बळ संपूर्णपणे स्पष्ट होते.

    नवमांश कुंडलीतील लग्न हे विवाहासाठी असलेली इच्छा दर्शवते. अनेक लोकांना विवाह करण्याचीच इच्छा नसते किंवा अनेकवेळा पालकांच्या इच्छेखातर विवाह होतो, पण त्याची परिणती सुखात होत नाही, कारण तो मनापासून केलेला नसतो. त्यामुळे नवमांश कुंडलीत लग्न बघावे. लग्न म्हणजेच इच्छा.

    नवमांशच्या लग्नावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर, विवाहाची इच्छा आहे आणि पापग्रहांची दृष्टी असेल तर, इच्छाच नसते. शुभ आणि पाप दोघांचीही दृष्टी आली तर – लग्न झाले तर ठीक… नाही झाले तरी ठीक असे काहीसे असते.

    नवमांशचा लग्नेश पापग्रह असला आणि तो लग्नाला बघत असेल तरी विवाह होतो, कारण तो स्वतःच्याच घराला बघत आहे. इथे जर लग्नेशसुद्धा पीडित किंवा पापग्रहांच्या दृष्टीत असेल तर विवाह होणे कठीण होते.

    मुलाच्या नवमांश कुंडलीतील लग्नेश, मुलीच्या नवमांशमध्ये कसा कार्य करत आहे ते बघा… केंद्रात असेल तर उत्तम! एखाद्या पापग्रहाच्याही कुयोगात असेल तरी चालू शकेल, पण दोन पापग्रहांच्या कुयोगात नको. तसेच, त्रिक भावात नसावा. याचा अर्थ मुलाचा मानही मुलगी ठेवणार नाही. तर, मुलीच्या नवमांश कुंडलीचा लग्नेश मुलाच्या पत्रिकेत कसा कार्य करत आहे ते बघा… अशीच स्थिती असेल तर मुलगा मुलीला नीट वागवणार नाही.

    हेही वाचा – ‘क्लिक’ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय?

    नवमांश कुंडलीतील चतुर्थेश मुलीच्या नवमांश कुंडलीत कसा कार्य करतो, त्याचप्रमाणे मुलीचा मुलाच्या कुंडलीत कसा कार्य करतो ते पाहूया – चतुर्थेश चांगला कार्य करत असेल, तर चांगला विवाह असेल आणि सुखाची प्राप्ती होईल. ज्याचा चतुर्थ भाव पीडित असेल त्याला सुखात न्यूनता येणार. नवमांशात चतुर्थ भाव चांगला असेल आणि त्यावर गुरूची दृष्टी असेल तर संसार चांगला होईल.

    लग्न कुंडलीत शुक्र कुठल्या भावात आहे आणि त्याचे नवमांश बळ महत्त्वाचे कारण शुक्र विवाहाचा कारक ग्रह आहे. लग्न कुंडली आणि नवमांशमध्ये शुक्र सिंह राशीतच वर्गोत्तम असेल तर विवाह होणे कठीण आणि झालाच तर टिकणे कठीण.

    सप्तमेश, लग्नेश, चंद्र, पंचमेश यांचे नवमांश कुंडलीत बळ. पंचमेश कुठल्या ग्रहांच्या युतीत आहे आणि नवमांशमध्ये पण कुठल्या भावात आहे, हे पाहणेही गरजेचे आहे.. पंचमेश आणि सप्तमेश यांचा एकमेकांशी संबंध असेल तर, आपल्या आवडत्या व्यक्तीशी विवाह होतो. या दोघांचीही नवमांश कुंडलीतील राशी महत्त्वाची आहे. नवमांश पाहिल्याशिवाय फक्त जन्म लग्न कुंडली पाहून फलित कथन केले, तर ते नक्कीच अचूक येणार नाही.

    हेही वाचा – शनीचा कर्मयोग

    सोशल मीडियाचा प्रभाव आज जनमानसावर खूप आहे. अनेक ज्योतिष जाणकारांचे प्रसिद्ध होणारे लेख हे ज्ञानात नक्कीच भर घालतील; पण म्हणून त्याच्या आधारे आपण ज्योतिषी नाही होणार. अनेक ॲप आज उपलब्ध आहेत, पण शेवटी फलित कसे सांगायचे, तो एक गाढा व्यासंग आहे. इतके सांगायचे तात्पर्य असे की, प्रत्येकजण ‘माझा राहू पंचमात आहे’, ‘मला साडेसाती आहे’, ‘माझ्या पत्रिकेत पितृदोष आहे’, ‘मला चंद्राची दशा आहे’ इतकेच सांगता येते, पण नवमांश माहीत आहे का? द्रेष्काण माहीत आहे का? मग कशाला आपल्या अर्धवट ज्ञानाचे तारे तोडायचे?

    ज्योतिष सांगणे म्हणजे एका आत्म्याचा प्रवास सांगणे, जो समजणे कठीण आहे. इतके सगळे सोपे असते, तर अजून काय हवे होते? त्यामुळे हा लेख जे वाचतील त्यांनी नेहमी लक्षात ठेवावे, ज्यातील ज्ञान आपल्याला नाही, त्याबद्दल अवाक्षरसुद्धा काढू नये.

    अलीकडेच एक माणूस ‘माझा मंगळ भाग्यात आहे बघा’ हे मला सांगत होता. मी त्याला म्हटले तुमचा मंगळ जरी भाग्यात असला तरी, तो अष्टम भावाची फळे देत आहे. डॉक्टरकडे गेलात, तर त्याला तुमचा आजार सांगणार की, कुठले औषध घ्यायचे तेही सांगणार? अहो, तो त्यातील तज्ज्ञ आहे ना! त्याला ठरवू देत काय करायचे ते. नवमांश किती महत्त्वाचा हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच .


    पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

    antarnad18.blogspot.com

    Avatar photo
    अस्मिता दीक्षित

    जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 ऑक्टोबर 2026

    October 2, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑक्टोबर 2026

    October 1, 2026 पंचांग आणि भविष्य

    घरातील देवघरात पूजा करताना तोंड कोणत्या दिशेला असावे?

    September 30, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 ऑक्टोबर 2026

    By Team AvaantarOctober 2, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 10…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑक्टोबर 2026

    October 1, 2026

    घरातील देवघरात पूजा करताना तोंड कोणत्या दिशेला असावे?

    September 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    विदर्भातील ‘हाडपक्या’ (मस्कऱ्या) गणपतीचा 239 वर्षांचा इतिहास!

    October 2, 2026

    नवमांश आणि विवाह

    October 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा रंकु भ्रमला, म्हणे जा रे मी रावो आला

    October 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 ऑक्टोबर 2026

    October 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 457
    • अवांतर 215
    • आरोग्य 153
    • पंचांग आणि भविष्य 609
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 965
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    विदर्भातील ‘हाडपक्या’ (मस्कऱ्या) गणपतीचा 239 वर्षांचा इतिहास!

    October 2, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.