Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    September 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बाल्यादि तिन्हीं वयसीं, काया एकचि जैसी

    September 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 सप्टेंबर 2026

    September 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना
    अध्यात्म

    श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    अस्मिता दीक्षितBy अस्मिता दीक्षितSeptember 8, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता दीक्षित, लेखिका अस्मिता दीक्षित, अध्यात्म अस्मिता दीक्षित, नामस्मरण, नामस्मरणाचे महत्त्व, मी पणाचा अहंकार, गुरूचे नामस्मरण, कुलदैवतेचे नामस्मरण, इष्ट देवतेचे नामस्मरण, परमेश्वराची सेवा, प्रपंचात नामस्मरण
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    || श्री स्वामी समर्थ ||

    साधनेस, ध्यान धारणेस सुरुवात करायची आहे. नामस्मरण करायचे आहे… कधीपासून करू? कुठले आसन घेऊ? रोज एकाच जागेवर बसून जप करू का? खुर्चीवर बसू की जमिनीवर? कुठली माळ घेऊ? प्रत्येक जपाला वेगवेगळी माळ घेऊ का? जप सकाळी करू की संध्याकाळी? आंघोळ करून जप करायचा का? हे स्त्रियांनी करायचे की पुरुषांनी? प्रश्नांची मालिका संपतच नाही. बरं, इतके प्रश्न विचारून शेवटी जपास सुरुवात झाली का?

    असो. मुळातच परमेश्वराचे नामस्मरण करावे, हा विचार मनात येणे हीच गुरुकृपा आहे, असे समजायला हरकत नाही. संकट गळ्याशी आल्याशिवाय परमेश्वराची आठवण येत नाही. आईला मुलाची आठवण मंगळवारी सकाळी, शुक्रवारी दुपारी येते का? नाही. मुलाची नाळ आईशी जोडली गेली आहे, म्हणून आई कुठेही असो, सदैव आपल्या लेकरांचा विचार करते… हो की नाही? अगदी तसेच माऊलीचा विचार भक्तांच्या हृदयात सतत असतो, मग जप करायला काळ, वेळ, दिवस, आसन, खुर्ची हे सगळे आवश्यक आहे का? नाही! हे सगळे दुय्यम आहे.

    ‘श्वासागणिक नामस्मरण’ हीच निष्काम साधना आहे. जगात काय चालले आहे, याचा विसर पडला पाहिजे. स्वयंपाक करताना, कपडे वाळत घालताना, भाजी निवडताना, बस-ट्रेनने प्रवास करताना, नित्य कर्म करताना क्षणोक्षणी त्याचेच स्मरण, त्याचेच नाव मुखी असेल तर सुख आणि दु:ख सारखेच वाटेल. आपण त्याच्या अस्तित्वात विलीन होऊ आणि व्यर्थ गोष्टी मनाला त्रास देणार नाहीत. अर्थात, ही अवस्था यायला वेळ लागेल, कारण त्याला अडथळे म्हणजे टीव्हीवरील मालिका, सोशल मीडिया अशी अनेक प्रलोभने आहेत. पण तरीही मनाचा निर्धार केला की, मी निदान पाच मिनिटे तरी रोज काहीतरी साधना करणार! तर, मग त्याची गोडी लागते.

    देवालाही भक्त हवेच की! मग त्यालाही आपल्या लाडक्या भक्तांना प्रचिती द्यावी लागतेच. एकदा प्रचिती आली की, मग श्रद्धा दृढ होत जाते आणि मग महाराज किंवा ती देवता आपल्या तनामनावर राज्य करू लागते. आपले फॅमिली डॉक्टर जसे एकच असतात, अगदी तसेच आपले सद्गुरू, आपली कुलस्वामिनी सुद्धा! कपड्याप्रमाणे रोज त्यात बदल अपेक्षित नाही, तो चाळा व्यर्थ आहे. एकच गुरू करा, पण त्यांचे पाय घट्ट धरून ठेवा, सेवा करत रहा. त्यांनी आपल्याला काय द्यायचे आणि ते कधी द्यायचे, ते त्यांना ठरवू देत. आपण घेण्याच्या पात्र झालो की, ते देणारच; पण त्यासाठी अट्टाहास नको आणि ते मिळवण्यासाठी नामस्मरण तर अजिबात नको.

    हेही वाचा – केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    दिवसातून आपली 100 वाक्ये असतात – “मी पारायण केले…”, “मी जप केला…”, “मी हे केले…” आणि “मी ते केले…” नखशिखांत अहंकार आहे आपल्याला. “मी गुरुचरित्र वाचतो” “मी हे करतो” आणि “ते करतो”… अहो, तुम्ही, आम्ही कोण हे सर्व करणारे? ते करून घेत आहेत आपल्याकडून! म्हणून महाराजांनी आज माझ्याकडून पारायण करून घेतले, हे वाक्य अधिक समर्पक होईल आणि ऐकायलाही आवडेल आपल्याला आणि आपल्या महाराजानाही. त्यांना सर्व श्रेय दिले की, आपल्याकडे ‘मी’ राहणार नाही; त्यामुळे अहंकाराला वाव सुद्धा राहणार नाही. डोळे उघडले की, महाराज आणि बंद केले तरी महाराज! ही मनाची अवस्था यायला, मग फार वेळ लागणार नाही. हळू हळू प्रापंचिक संकटे क्षुल्लक वाटायला लागतील. सगळे मनाचे आणि शरीराचे आजार दूर पळून जातील. सगळा प्रपंच द्या त्यांच्यावर सोडून आणि मग बघा आत्यंतिक आनंदाची अनुभूती येणारच!

    ज्या गोष्टी आपल्याला कारण नसताना मोठ्या वाटायच्या, त्याच आता किडा-मुंगी समान वाटू लागतील. त्यांना कारण नसताना दिलेले अनन्यसाधारण महत्त्व कमी होईल आणि जीव त्यांच्यातच गुंतून राहणार नाही. जे होते आहे, ते त्यांच्या इच्छेने, यावर एकदा आपली निस्सीम श्रद्धा जडली की, दु:ख-संकटांची होळी झालीच म्हणून समजा. हीच भावना मनात असते म्हणून लाखो वारकरी चंद्रभागेच्या काठाशी उभे राहून फक्त कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरतात, प्रत्यक्ष माऊलींच्या दर्शनाची मग गरजच उरत नाही.

    हेही वाचा – शुक्राचे अध्यात्म

    आपले एकेक पाऊल मृत्यूकडे जात आहेत, वेळ कमी-कमी होत आहे, तेव्हा आता तोच वेळ फुकट न घालवता, या आणि पुढील जन्माचे सुद्धा सार्थक करण्याची एकमेव संधी म्हणजे अखंड नामस्मरण…! मग ते घरात, बाहेर कुठेही असो. जिथे असू तिथे नामस्मरण करू, हे एकदा अंगवळणी पडले की, मनालाही त्याची सवय होईल आणि मुखी फक्त नाम असेल.

    म्हणून पुन्हा सांगावेसे वाटते, प्रश्न थांबवा आणि नामस्मरण सुरू करा. आपला भाव ते ओळखतात आणि म्हणूनच त्यांच्या सेवेची संधी त्यांनीच आपल्याला दिलेली आहे, त्याचे सार्थक करूया आणि जीवन खऱ्या अर्थाने जगूया.


    पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

    antarnad18.blogspot.com

    Avatar photo
    अस्मिता दीक्षित

    जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : बाल्यादि तिन्हीं वयसीं, काया एकचि जैसी

    September 8, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : बाल्यादि तिन्हीं वयसीं, काया एकचि जैसी

    By Team AvaantarSeptember 8, 2026

    अध्याय तेरावा अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् । भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च…

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : वांचूनि हस्त नेत्र पाये, हें भाष तेथ कें आहे

    September 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    September 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बाल्यादि तिन्हीं वयसीं, काया एकचि जैसी

    September 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 सप्टेंबर 2026

    September 8, 2026

    Recipe : दाणेदार बेसन-काजू बर्फी अन् शाही ब्रेड रोल

    September 7, 2026

    आदर्श शिक्षिका

    September 7, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    September 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 426
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 571
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 903
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    September 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बाल्यादि तिन्हीं वयसीं, काया एकचि जैसी

    September 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 सप्टेंबर 2026

    September 8, 2026
    Most Popular

    श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    September 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.