Author: अस्मिता दीक्षित

Avatar photo

जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

|| श्री स्वामी समर्थ || आपल्या पत्रिकेतील ग्रह कुठल्या भावात आहेत आणि ते कसे फळ देणार आहेत, हे थोडे समजून घेतले तर निम्मे काम तिथेच होईल. इथे आपण इतर कुठलेही ग्रहांचे युतीयोग, दृष्टी वगैरे न बघता फक्त ग्रहांचे घराच्या दृष्टीने असलेले कारकत्व बघत आहोत. मनाचा कारक चंद्र, शुभ असेल तर मन कायम उत्साहित उल्हासित असेल. असे करू… तसे करू… म्हणत अनेक गोष्टीत आपण रस घेणार. आईशी उत्तम संवाद आणि सौख्य. आई आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असेल. मन शुद्ध तर, सद्गुरुप्राप्ती सुद्धा निश्चित. मनात काळेबेरे असेल तर, परमेश्वराचे अधिष्ठान होणारच नाही. चंद्रासारखी सात्विकता, कोमल भावना आणि प्रेमळ व्यक्ती सर्वांनाच प्रिय असते.…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || आपल्याला जे दिसते, ते नको असते आणि जे दिसत नाही, त्याचे कुतूहल अधिक असते. म्हणूनच राहू-केतू आपल्यावर हावी असतात. एकतर त्यांच्या नसून असण्याचा पगडा आपल्यावर असतो. राहू-केतूबद्दल अगदी दोन ओळी कुठे दिसल्या तरी, तिथे आपण आकर्षित होतो. स्वतःच्या पत्रिकेतील राहू-केतू यांचा विचार नको तितकाही करतो. कुठे काही वाचले की, तेच मनात धरून आता माझ्याही बाबत असे होणार, असे गृहीत धरतो. असो. राहू म्हणजे शरीराचे शीर आणि केतू हा मानेपासून खालचा भाग आहे. म्हणजे, केतूकडे कुठलीही ज्ञानेंद्रिये – जसे नाक, कान, डोळे, जीभ काहीच नाही. पण त्याच्याकडे स्पर्श आहे आणि सर्वात मुख्य मन. त्याला बिचाऱ्याला या…

Read More

|| श्री स्वामी समर्थ || ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना तर्क लावला तर, गणिते लवकर सुटतात. पत्रिकेत 6 8 12 या भावांना त्रिक भाव म्हटले आहे आणि त्यातून आपल्याला मनस्ताप, कटकटी, आजार, कर्ज, दवाखाना, तुरुंग अशा अनेक गोष्टींची शृंखला पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात तसे नाही. जे दिसते, तसे नेमके आहे का? हे पाहताना खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू होतो. जर हे भाव इतके वाईट फलादेश देणारे असते, तर ऋषीमुनींनी ते मुळात पत्रिकेत ठेवलेच नसते. असो. चित्रात सगळे रंग पाहिजेत, तसे आयुष्यात सगळी माणसेही हवीत. अगदी त्याचप्रमाणे पत्रिकेत प्रत्येक ग्रह, नक्षत्र, भाव, राशी आणि दशा या प्रत्येकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. एक दुसऱ्यापेक्षा वेगळा…

Read More