|| श्री स्वामी समर्थ ||
आज मुलाकडून त्याला पसंत पडलेल्या एका मुलीची पत्रिका गुणमिलनासाठी आली होती. मुलगी दिसायला चांगली, सर्वार्थाने दोघांनाही एकमेकांशी पटेल, असे वाटले म्हणून गुणमिलन करण्यासाठी दोन्ही पत्रिका दिल्या. दोघांचीही सिंह राशी. मुलाचे नक्षत्र केतूचे आणि मुलीचे पूर्वा. त्यामुळे 30 गुण जुळत होते. मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक सुखाच्या दशा निश्चित होत्या, पण मुलीची षष्ठ स्थानाची दशा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती आणि ती पुढे अनेक वर्षं असणार आहे. षष्ठेश ग्रहाच्या नक्षत्रात आणि उपनक्षत्रात एकही ग्रह नाही; त्यामुळे षष्ठ स्थानाचा मालक ग्रह, षष्ठ स्थानाचे प्रबळ काम करणार आणि ग्रह षष्ठ स्थानाचा बलवान कार्येश सुद्धा होणार. अशा ग्रहाच्या दशेत विवाह होणे असंभव आणि झाला तरी टिकणे कठीण!
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क
हे लिहिण्याचे कारण असे की, नुसते 30 -34 गुण जुळले म्हणजे झाले का? तर नाही. आज आपण घटस्फोटाची वाढती प्रकरणे बघतो, ती चुकीचे गुणमिलन झाल्यामुळे किंवा फक्त गुणमिलन केले, ग्रहमिलन केले नसावे हेच असू शकते, नाही का? विवाह ही आयुष्य बदलून टाकणारी घटना आहे आणि नवीन नाते अनेक अपेक्षाही घेऊन येत असते. दोघांच्याही पत्रिका नीट अभ्यासून पुढील 25-30 वर्षांच्या महादशा कशा आहेत, त्याचा अभ्यास आवश्यक आहे. विवाह ही एका दिवसाची घटना असली तरी, त्याचे पडसाद – मग ते चांगले किंवा वाईट – आयुष्यभर उमटत राहणार आहेत. त्यामुळे पत्रिकामिलन करताना विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे. जो चेहरा आपल्याला रोज बघायचा आहे, तो आपल्या पसंतीचा हवाच, हे मान्य आहे; पण इतर गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत, असे वाटते.
हेही वाचा – जातकांचे ज्योतिष ज्ञान
षष्ठ स्थान सप्तम भावाचे फळ देणार नाही, हे निश्चित. मग ते डावलून कसे चालेल? त्याकडे सर्वप्रथम लक्ष केंद्रित केले पाहिजे.
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


