Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » केतू… आपला आतला आवाज
    अध्यात्म

    केतू… आपला आतला आवाज

    अस्मिता दीक्षितBy अस्मिता दीक्षितSeptember 29, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता दीक्षित, लेखिका अस्मिता दीक्षित, अध्यात्म अस्मिता दीक्षित, केतू ग्रह, आपला आतला आवाज, असामान्य ताकदीचा केतू, आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक प्रगती, केतू आत्मिक प्रेरणा, आंतरिक शक्ती, गूढता, अध्यात्मिक ज्ञान, अध्यात्मिक ज्ञानाचे दालन
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    || श्री स्वामी समर्थ ||

    आपल्या सद्गुरूंवर आपली नितांत श्रद्धा तर हवीच, पण त्याहीपेक्षा अधिक हवा तो विश्वास! गुरू आपले कधीतरी वाईट करतील का? विचारा प्रश्न स्वतःच्याच मनाला. आई आपली गुरू आहे, ती जेवणात विष कालवून देईल का? अजिबात नाही! अगदी तसेच जे जे होत आहे, ते त्यांच्या इच्छेने याची खूणगाठ एकदा मनात पक्की झाली की, आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपले आपल्यालाच मिळत जाते. आत्मचिंतन हाही एक अध्यात्माचा भाग आहे. स्वतःच्या आत मनात डोकावले तरी सुद्धा अनेक प्रश्नांची उकल सुटते .

    केतूला दिसत नाही, पण त्याच्याकडे मन आहे आणि स्पर्शज्ञान सुद्धा आहे. दृष्टी नसल्यामुळे बाह्यजगातील कुठल्याच गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही, म्हणूनच मग स्वतःच्या आतमधील सुंदर जग आणि स्वतःच्या असीम व्यक्तिमत्वाची ओळख करून घेण्याचा केतू प्रयत्न करतो. ज्यांचा केतू चांगला असतो, त्यांना गुरूसारखीच फळे मिळतात .

    स्वतःच्या आत पाहायला शिकवणारा हा केतू असामान्य ताकदीचा आहे. माणूस सगळ्यात दुर्लक्षित करतो ते आपला श्वास आणि आपल्या आतील आवाज! आपला आवाज सतत आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतो, पण भौतिक सुखात मश्गुल झालेल्या आपल्यापर्यंत तो आवाज पोहोचतच नाही. कुठल्याही, अगदी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर कोण देऊ शकतो, तर ते आपले मन! पण त्याला न विचारता जगभर आपण विचारत बसतो. दहा लोक, हजार गोष्टी सांगतात आणि आपण अजूनच बुचकळ्यात पडतो. पण आपल्या आतला आवाज आपल्याला नेहमीच वास्तव दाखवतो, आपल्या मनाने दिलेला कौल माणसाने नेहमीच ऐकावा… कारण तो सौ टक्का खराच असतो.

    हेही वाचा – श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    केतू म्हणजे आत्मिक प्रेरणा, आंतरिक शक्ती, गूढता, अध्यात्मिक ज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञानाचे दालन. शुभ केतू ध्यानधारणा, योग याकडे आपले लक्ष केंद्रित करायला मदत करतो. ध्यानात आपल्या सद्गुरूंची गाठभेट करून देणारा हा केतूच तर आहे.

    ज्यांचे मन सदैव अशांत किंवा बेचैन असते किंवा एखाद्या अनामिक भीतीने ग्रासलेले असते त्यांनी योग, साधना केली तर, मन स्थिर होण्यास मदत होते. पत्रिकेत केतू बिघडलेला असेल तर भ्रमात राहणे, मन अशांत, उदासी, भीती, निर्णयक्षमता नसणे, एकलकोंडेपणा, मानसिक तणाव आणि त्यातून निर्माण होणारे मनाचे आजार या गोष्टीना व्यक्तीला सामोरे जावे लागते. केतू अध्यात्मिक प्रगतीचे मार्ग खुले करून देतो, पण त्या मार्गावर चालणे सोपे नसते. दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. केतूचा परिणाम अनेकदा पायातील नसा आणि नर्व्हस सिस्टीमवर होताना दिसतो. केतू म्हणजे मंदिरावरील कळस! त्यामुळे शुभ असेल तर कीर्ती, यशाच्या शिखरापर्यंत करिअर जाऊ शकते. अन्यथा, मानसिक ताणताणाव आणि आजार मागे लागतात.

    हेही वाचा – शुक्राचे अध्यात्म

    केतूचा मुख्य गुण म्हणजे विरक्ती… धन भावात केतू असेल तर अशा व्यक्ती विरक्त किंवा एकट्या एकट्या राहतात, कुटुंबाबद्दल फारशा आसक्त नसतात… केतू आपल्याला अंतर्मुख होऊन स्वतःच्याच आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून पाहायला शिकवतो. शेवटी हे आपले आयुष्य आहे आणि आपल्या प्रश्नांची उकल आपली आपल्यालाच करावी लागते.

    आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्यामध्येच आहेत, बाहेर शोधायची गरजच नाही. अंतर्मुख होऊन बघितले तर, आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळेल आणि आपली स्वतःचीही नव्याने ओळख होईल…. प्रयत्न करा आणि अभिप्राय सुद्धा कळवा.


    पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

    antarnad18.blogspot.com

    Avatar photo
    अस्मिता दीक्षित

    जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता

    September 29, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुण ते कैसे किती, बांधती कवणे रीती

    September 28, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें

    September 27, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता

    By Team AvaantarSeptember 29, 2026

    अध्याय चौदावा श्रीभगवानुवाच । परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् । यज् ज्ञात्वा मुनयः सर्वे परां…

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुण ते कैसे किती, बांधती कवणे रीती

    September 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें

    September 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं

    September 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026

    तो भेटलाच नसता तर…

    September 29, 2026

    केतू… आपला आतला आवाज

    September 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता

    September 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 453
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 605
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 958
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.