Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    September 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    September 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अवतीभवतीचा अनमोल आनंद
    अध्यात्म

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    अस्मिता दीक्षितBy अस्मिता दीक्षितSeptember 22, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता दीक्षित, लेखिका अस्मिता दीक्षित, अध्यात्म अस्मिता दीक्षित, आनंदाने जगणे, जगण्यातील आनंद, जगण्याची पद्धत, आनंदाचे महत्त्व, आनंदी राहणे, इतरांना आनंद देणे, आनंदाचे जीवनगाणे, जीवन जगण्याची कला
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    || श्री स्वामी समर्थ ||

    जीवन आनंदाने ज्याला जगता येते तो खरा माणूस. आपल्या जगण्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असे जगले पाहिजे. आनंदाच्या क्षणापाठोपाठ दु:ख, वेदना सगळे येणार! कारण, त्याशिवाय आनंदाची खरी व्याख्याच समजत नाही. संपूर्ण आयुष्यच काय तर एक संपूर्ण दिवस सुद्धा सगळा आपल्या मनासारखा जात नाही. पण म्हणून आपण जगणे सोडून द्यायचे का? नाही. पण आपण एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगात अडकून राहतो, कुणी एखाद्या शब्दाने दुखावले, तर तेच तेच धरून व्यथित होतो आणि तेच जीवनभर आठवून आठवून उगाळत बसतो आणि समाधानाच्या असंख्य क्षणांना पोरके होतो.

    या क्षणभंगुर आयुष्याचे जिथे माझे काहीही नाही आणि इथेच मला सगळे ठेवूनही जायचे आहे, ते जेव्हा खऱ्या अर्थाने समजेल आणि ते आपल्या कृतीतून वागण्या-बोलण्यातून इतरांनाही जाणवेल, तेव्हा आपल्या जीवनाचा सोहळा झाला म्हणून समजा. मातीतून आलो पण अनेक चुकीचे शब्द आणि चुकीच्या वागण्यातून सर्व मिळवलेले, आपणच मातीमोल करतो. हो, हो आपण स्वतःच! म्हणूनच प्रत्येक शब्द, कृती ही विचारपूर्वक केली पाहिजे.

    घरातील भौतिक सुखे म्हणजे परमार्थ नाही. कारण, ते तुम्ही घेतलेले नामसुद्धा तुम्हाला कधीही मिळवून देत नाही. समाधान मात्र इतके मिळेल की ओंजळ अपुरी पडेल. माणसाने समाधान कशात आहे, त्याचा सातत्याने शोध घेतला पाहिजे. गेलेला क्षण पुन्हा येत नाही; कारण पुढे जात राहणे हा प्रत्यक्ष सृष्टीचाच नियम आहे… मग आपण कोण तो बदलणारे, नाही का?

    एखाद्या लहान मुलाने आपल्याला दिलेले निरागस स्मितहास्य म्हणजे अहो, किती पराकोटीचा आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा क्षण असतो तो! पण आपण मात्र हा असा वागला… तो असे बोलला… याने हे केले… त्याने ते केले नाही… यातच जन्मभर अडकून राहतो. काय जपायचे आणि काय सोडायचे, तेच समजत नाही. हीच आपल्या जीवनाची शोकांतिका आहे. सोडून द्यायला शिका!

    हेही वाचा – श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम साधना

    लहानसहान गोष्टीतील आनंद शोधता आला पाहिजे आणि तो जगताही आला पाहिजे. आज जे सोडून द्यायचे आहे, तेच हृदयाशी कवटाळून बसलो आहोत आणि मग त्या अपिरीमित वेदना आपल्याला दीर्घकालीन आजार देत आहे. मागील पिढ्यांत होते का, मधुमेहसारखे आजार? पण आज तरुण मुलांना सुद्धा हृदयविकार होताना ऐकतो, पाहतो.

    छोट्या छोट्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. पण आम्ही खूप शिकलेले आहोत, आम्हाला कोण शिकवणार? अहो, प्रत्यक्ष ब्रम्हदेव खाली आला तर त्यालाही स्ट्रेस देऊन परत पाठवू, इतका स्ट्रेस आम्ही घेऊन जगतोय. आम्ही फक्त सगळे गोळा करणार, द्यायची सवय कधी लागणार आपल्याला? सर्व ज्ञान आम्हाला आहे, दुसऱ्याला काय कळतंय, अशा अविर्भावात जगणे, हीच पराभवाची पहिली पायरी आहे. इतरांसाठी जगून पाहिले आहे का कधी?

    साधे पाणी मिळायची मारामार, अन्न खूप दूर राहिले, असे जीवन ज्यांच्या वाट्याला आले आहे, त्यांनी काय करायचे? कधीतरी विचार करा आणि केलात तर समजेल देवाने किती भरभरून दिले आहे! पण त्याची काडीचीही किंमत नाही आपल्याला आणि म्हणूनच वेळ आली की, त्याला त्याची किंमत आपल्याला करून द्यावी लागते.

    कधी पटकन एखाद्या फळविक्रेत्याला जवळ असलेला उसाचा रस देऊन बघा, कुणाला चहा तर कुणाला काही खायला देऊन बघा. उन्हाळ्याने त्रासलेले आहेत, तरीही सगळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हातून आपले काम करत आहेत. त्यांना या तुमच्या एका लहानशा मदतीमुळे किती सुख मिळेल, त्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही.

    आनंद हा देण्यात आहे, घेण्यात नाही हे जेव्हा समजेल, तेव्हा जीवन समजेल. एक दिवस प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्याला देणे बंद केले तर काय होईल? कितीही नारळ वाढवा त्याच्यासमोर काहीही देणार नाही तो, मग आम्ही हताश होऊ …पटतंय ना? त्यामुळे खरा माणूस तोच जो आपल्या कुवती-ऐपतीप्रमाणे देण्यातील आनंद मिळवतो आणि जीवनाचा सोहळा करतो. अशा लोकांना परमेश्वर न मागता सुद्धा अनेक गोष्टी बहाल करत असतो.

    आयुष्य ही त्याचीच देणगी आहे आणि अखेरच्या क्षणापर्यंत आयुष्य सन्मार्गाने जगणे आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल, असे काहीतरी करून जाणे, हेच आयुष्याचे इप्सित असले पाहिजे. पण हेवेदावे, मत्सर, कुणाला पाण्यात पहा, कुणाची निंदा करा, यातच आपण अडकून पडलेले असतो.

    हेही वाचा – अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    एखादी अगदी साधी सोपी गोष्ट सुद्धा आपल्याला असाध्य होते, तेव्हा परमेश्वराचे अस्तित्व किती मोलाचे आहे ते जाणवू लागते. आपल्याला काय मिळाले नाही, त्याचेच गाणे आपण गात असतो; पण जे मिळाले आहे त्याची किंमत आपल्याला कधीच नसते. तेही मिळाले नसते तर काय केले असते, हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही .

    कटू आठवणी येत-जात असतात पण तेच आयुष्य नाही. अखंड आयुष्यात सुखाचे वारे वाहत असतातच, त्याचा आनंद घ्या, तेव्हाच दु:खाची झळ पोहोचणार नाही. दु:ख सहन करायची क्षमता शेवटी सुखाचेच क्षण देत असतात, नाही का?

    जीवन जगण्यासाठी आहे तेही आनंदाने! कुणाचे वाईट चिंतून आपल्याला तरी काय मिळणार आहे? कुरबुरी, तक्रारी, निंदा, मत्सर, हेवेदावे, अतिलोभ यात गुंतून पडणे हे केवळ दुर्भाग्य म्हटले पाहिजे. ज्याला जीवन जगण्याची कला उमगली, तो तर आनंदाने जगेल आणि इतरांनाही आनंद देईल… आज नक्कीच विचार करा…

    मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लावणे त्याहून कठीण!


    पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

    antarnad18.blogspot.com

    Avatar photo
    अस्मिता दीक्षित

    जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    September 22, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची

    September 21, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा

    September 20, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    By Team AvaantarSeptember 22, 2026

    अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा । भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥34॥ शब्दतत्त्वसारज्ञा । पैं…

    सार्थ ज्ञानेश्वरी : दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची

    September 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा

    September 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं

    September 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    September 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    September 22, 2026

    विभक्त

    September 21, 2026

    Recipe : चिंचेचा झणझणीत ठेचा आणि कारळ्याची चटपटीत चटणी

    September 21, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – व्यसनांची प्रवृत्ती, वारसागत गुण

    September 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 444
    • अवांतर 214
    • आरोग्य 149
    • पंचांग आणि भविष्य 593
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 934
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    September 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 सप्टेंबर 2026

    September 22, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.