Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
पल्लवी खरोसे आंबेकर तो हॉस्पिटलमध्ये ओटी बाहेर अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता… आतून त्याच्या बायकोच्या वेदनादायी किंचाळण्याचा आवाज येत होता… आणि तिच्या त्या आवाजाने याचं काळीज दुप्पट वेगाने धावत होत… खूप प्रेम होतं त्याचं… पण तो सध्या हतबल होता… त्याला वाटलं तरी तो तिला मदत करू शकत नव्हता! काहीवेळाने तिचा आवाज थांबला आणि एक नाजूकसा रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला… तो आवाज एकून अधीर झालेला तो ओटीकडे नजर लावून होता… तेवढ्यात एक नर्स लगबगीने बाहेर आली… “काँग्रॅच्युलेशन्स सर तुम्हाला मुलगी झाली…” तिने त्याचं अभिनंदन केलं आणि परत ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेली… मुलगी झाली हे ऐकून तो खाली बेंचवर बसला… त्याच्या डोळ्यांतून…
नीलिमा कदम जांगडा साठच्या दशकात जन्माला आलेल्या पिढीला गाण्यांची वही माहिती असेल… काहींनी ती जपूनही ठेवली असेल! साधारण आठवीत गेल्यावर हे वेड सुरू झालं. बहुतेक मुली डायरी किंवा वहीत आवडती गाणी लिहून घ्यायच्या. मी डायरीत गाणी लिहायचे… आठवी ते अकरावीपर्यंत माझ्या तीन डायऱ्या भरल्या! आता एका क्लिकवर हवं ते गाणं अगदी कोणालाही उपलब्ध असलेल्या पिढीला ‘हे काय बुवा?’ असं आश्चर्य वाटेल. पण त्यावेळेस वर्गातील मित्र-मैत्रिणींना, ‘ए तुझ्याकडे हे गाणं आहे का?’ वगैरे विचारत आपला संग्रह वाढवला जायचा. आपल्याकडची गाणी त्यांना द्यायची, अशी मस्त देवाण-घेवाण चालायची. माझं हस्ताक्षर खूप चांगलं होतं. गाणी उतरवून काढताना तर ते ‘मुलायम मस्का’च व्हायचं. कारण गाणं…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्रीभगवानुवाच – सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम । देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः ॥52॥ यया पार्थाचिया बोलासवें । हें काय गा म्हणितलें देवें । तुवां प्रेम ठेवुनि यावें । विश्वरूपीं कीं ॥673॥ मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि ॥674॥ अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना । ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥675॥ तरि विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें । तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥676॥ आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी । परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥677॥ तें विश्वरूप…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 14 ज्येष्ठ शके 1948; तिथि : चतुर्थी 23:30; नक्षत्र : उत्तराषाढा 27:41; योग : शुक्ल 09:02; करण : बव 10:27; सूर्य : वृषभ; चंद्र : धनु 07:41; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:12; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अभिनेते अशोक सराफ टीम अवांतर उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणाऱ्या आणि विनोदाच्या जबरदस्त टायमिंगने खदखदून हसविणारे अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला. त्यावेळी हिंदी…
नीता चंद्रकांत कुलकर्णी हल्ली ती झोपूनच असायची. फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं. तसं वयही झालं होतं म्हणा… नवरा गेल्यापासून डोळे मिटून गतजीवनातल्या घडामोडी आठवत राहायची. आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्युपत्राची आठवण आली. तो दिवस आठवला… चार दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागदं फाडायच असं सुरू होत. तिने विचारलं, “काय करताय?” “महत्त्वाचं काम करतोय… मृत्युपत्र लिहितोय! विचार करून ते लिहायचं असतं…” “काय मृत्युपत्र? आत्ता…? कशासाठी?” “आत्ता नाही तर कधी करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे मुलांना काळजी नको.” “म्हणजे वाटणी का?” यावर तो जरा रागवलाच… “नुसती वाटणी नसते ती…! बरं ते जाऊ दे… उगीच काहीतरी विचारत बसू नको… तुला काय त्यातल…
ओपीडीत ब्रोकोली हेअरकट केलेला, ओवरसाइज्ड शर्ट आणि बॅगी जिन्स घालून आलेला एक जेन-झी प्रचंड डोकंदुखी, जीभ कोरडी पडणं, मळमळ या तक्रारी घेऊन आला होता. त्याचा एकूणच ‘अवतार’ बघता, त्याच्या या अंडरवेट देहात आजवर कधीही न गेलेल्या रसायनानं पहिल्यांदाच प्रवेश केल्याचं मला शून्य मिनिटात समजलं! इथॅनॅाल हेच ते रसायन!! प्रारंभी होत काही नाही, पण शरीरातल्या सगळ्या विभागांना ही वार्ता मात्र लागलीच कळते… हे रसायन मेंदू विभागात पोहोचताच GABA (Gamma-Aminobutyric Acid) समिती खूश होते आणि सगळी कामं स्लो मोशनमध्ये करण्याचा ठराव पास करते! परिणामी निर्णयक्षमता रजेवर जाते, आत्मविश्वास चक्क अनावश्यक प्रमाणात वाढतो, ”मी खूप भारी आहे,” असा भ्रम वाढतो… हृदय विभागात वाहिन्या…
पंचरस आमटी साहित्य तुरीची डाळ – एक वाटी कच्ची केळी – चार लहान वांगे – एक बटाटा – एक लहान मुळा – एक काजू – एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप – एक वाटी कांदा – एक धणे – दोन चमचे जिरे – एक चमचा चिंच – लहान लिंबाएवढी गूळ – चवीनुसार मीठ – चवीनुसार ओले खोवलेले खोबरे – एक वाटी फोडणीचे साहित्य सुक्या मिरच्या – एक-दोन हिरवी मिरची – पाच-सहा (तुकडे करून) गोडा मसाला – एक चमचा कृती तुरीची डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. केळी, बटाटा, वांगे आणि मुळा यांच्या फोडी करून हेही सर्व शिजवून घ्यावे. नंतर फोडणी करून, त्यात चिरलेला…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा पाहे तंव तें कुरुक्षेत्र । तैसेंचि दोहीं भागीं झालें गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवारी ॥661॥ तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु आहे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥662॥ अर्जुन उवाच – दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन । इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥51॥ एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीर्यविलासें । मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥663॥ बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान । अहंकारेंसी मन । देशधडी जाहलें ॥664॥ इंद्रियें प्रवृत्ती भुलली । वाचा प्राणा चुकली । ऐसी आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥665॥ तियें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 जून 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 13 ज्येष्ठ शके 1948; तिथि : तृतीया 21:20; नक्षत्र : पूर्वाषाढा 24:59; योग : शुभ 08:11; करण : वणिज 08:11; सूर्य : वृषभ; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:12; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:52) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष बालसाहित्यकार आनंदीबाई शिर्के टीम अवांतर बालसाहित्यकार तसेच कथाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदीबाई शिर्के यांचा जन्म 3 जून 1892 रोजी मुंबईतील चिंचपोकळी येथे झाला. त्या पूर्वाश्रमीच्या…
सुरेखा मोंडकर ‘लहान मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा; आकार द्यावा तसा देता येतो,’ एका प्रतिभावान लेखकाने आपल्या सुप्रसिद्ध नाटकातील व्यक्तिरेखेच्या तोंडी दिलेलं हे वाक्य एखाद्या शिलालेखाप्रमाणे सर्वमान्य झालं. बरंचसं तथ्य आहे यात. पण प्रत्येक मातीच्या गोळ्याचा गणपती नाही घडवता येत. गणपती तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची, काही खास गुणधर्म असणारीच माती लागते. पण म्हणून काही त्या व्यतिरिक्त असणारी माती बिनकामाची असते; वाया जाते, असं नाही. रांजण, पणती, वीट असे कितीतरी आकर्षक मनोवेधक प्रकार घडवता येतील… बगिचा फुलवता येईल. फक्त त्या घडविणाऱ्या हातांमध्ये कला हवी, बुद्धीमध्ये कल्पकता आणि हृदयात हवं प्रेम, अपार विश्वास त्या ओल्या मातीच्या गोळ्याबद्दल! गणपतीच झाला पाहिजे, हा…

