Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    June 4, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका

    June 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 4, 2026Updated:June 4, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 04 जून 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 14 ज्येष्ठ शके 1948; तिथि : चतुर्थी 23:30; नक्षत्र : उत्तराषाढा 27:41;
    • योग : शुक्ल 09:02; करण : बव 10:27;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : धनु 07:41; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:12;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    अभिनेते अशोक सराफ

    टीम अवांतर

    उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणाऱ्या आणि विनोदाच्या जबरदस्त टायमिंगने खदखदून हसविणारे अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला. त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव अशोक ठेवण्यात आले. मराठी चित्रपट सृष्टीत मामा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अशोक सराफ यांचे अभिनयातील गुरू त्यांचे सख्खे मामा गोपीनाथ सावकार होते.

    शालेय जीवनात असताना सराफ यांना अभिनयात रस निर्माण झाला आणि त्यांनी सांस्कृतिक उपक्रम तसेच रंगमंचावरील कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. मनोरंजन उद्योगात पूर्णवेळ प्रवेश करण्यापूर्वी, त्यांनी बँकेत काम केले. सराफ यांनी पहिल्यांदा वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ पुस्तकावर आधारित नाटकात काम केलं. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमधून अभिनय केला. त्यातून यश मिळायला लागल्यावर त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांना सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्या. अखेरीस त्यांनी अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडली.

    हेही वाचा – मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    1969 मध्ये ‘जानकी’ या मराठी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात, ते मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले आणि हळूहळू त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. 1975 साल हे सराफ यांच्या कारकीर्दीला वळण देणारे ठरले. त्यावर्षी प्रदर्शित झालेल्या दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली. शिवाय, त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर दादा कोंडके आणि अशोक सराफ ही जोडी लोकप्रिय झाली. 1977 साली राम राम गंगाराममधील महादू खाटीक या भूमिकेसाठी फिल्मफेअरमध्ये विशेष उल्लेख करण्यात आला.

    1978 साली दामाद या चित्रपटाद्वारे त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. यादरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. दादा कोंडके, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्यांसोबत अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. याशिवाय ‘हम पांच’ या दीर्घ हिंदी मालिकेमुळे अशोक सराफ हे नाव देशाच्या घराघरात जाऊन पोहोचले. तर दुसरीकडे, हमीदाबाईची कोठी, मनोमिलन, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय, व्हॅक्यूम क्लीनर, लगीनघाई, अनिधिकृत, हे राम कार्डिओग्राम, प्रेमा तुझा रंग कसा यासारखी त्यांची मराठी नाटकेही सुरू होती.

    300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या सराफ यांना अकरा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2006मध्ये व्ही. शांताराम पुरस्कार, 2016मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअर मराठी जीवनगौरव पुरस्काराने सराफ यांना सन्मानित करण्यात आले. 2022मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2023मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    2025 मध्ये अशोक सराफ यांना भारत सरकारकडून पद्मश्री  पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदा ते कान्स चित्रपट महोत्सवास उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देणाऱ्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून त्यांनी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील इतर प्रतिनिधींसोबत या महोत्सवात हजेरी लावली.


    आजचे राशीभविष्य

    मेष –  नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपविली जाईल. घाई किंवा निष्काळजीपणामुळे कामातील गुंतागूंत अधिक वाढेल, म्हणून प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. रखडलेले व्यावसायिक व्यवहार पुढे सरकू शकतात. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत दिसेल. नातेसंबंध जपण्यामागची शक्ती जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या.

    वृषभ – स्वतःच्या आर्थिक बाबी आणि निर्णयांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक पैलू काळजीपूर्वक समजून घ्या, कारण एक छोटीशी चूक देखील मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. मालमत्ता किंवा कर्जासंदर्भात सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेणे टाळा. अनुभवांवरून शिका.

    मिथुन – उत्पन्नात वाढ होण्याची स्पष्ट चिन्हे असली तरी, व्यवसायात थोडी धावपळ असू शकते. छोट्या-छोट्या समस्यांमध्ये गुंतून घेण्याऐवजी, हसून पुढे जा. दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. जोडीदार प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत असेल. वैयक्तिक गोष्टी सर्वांसमोर मांडणे टाळा.

    कर्क – अनावश्यक वादविवाद आणि भांडणांपासून दूर राहा. सरकारी कामात फायदा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्त्वाच्या कागदपत्रांवर लक्ष द्या. अशी माहिती मिळू शकते, जी भविष्यात तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. विरोधकांच्या प्रभावाखाली येण्याऐवजी, आत्मविश्वास टिकवून ठेवा. काम वेगाने होईल. समजूतदारपणामुळे अनेक अडचणी सोप्या होतील.

    सिंह – आर्थिक बाबींमुळे दिलासा आणि आनंद दोन्ही मिळेल. व्यवसायात फायदेशीर संधी उपलब्ध होतील. गुंतवणूक केलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. संततीच्या शिक्षणाबद्दल किंवा भविष्याबद्दल काही चिंता कायम राहू शकते. पैशांच्या बाबतीत अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे टाळा.

    कन्या – इतरांना मदत करणे आणि चांगली कामे करणे याकडे तुमचा कल असेल. भूतकाळातील चुकांमधून शिकून पुढे जाणे फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारात सतर्क राहा. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी दिवस सकारात्मक असेल; मानसिक ताण कमी होईल. ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील.

    तुळ – तुमच्यातील नेतृत्व कौशल्ये लोकांना प्रभावित करतील. जोडीदारासोबतचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. कामांमधील विलंबामुळे काही प्रमाणात निराशा येऊ शकते, परंतु परिस्थिती लवकरच तुमच्या बाजूने वळेल. नवीन सौदे किंवा करारांमधून भविष्यात मोठा नफा मिळू शकतो. तथापि, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

    वृश्चिक – संयम आणि समजूतदारपणा ही सर्वात मोठी शस्त्रे ठरतील. खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा बजेट बिघडू शकते. चांगली बातमी किंवा कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. एखादा मित्र किंवा सहकारी आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतो.

    हेही वाचा – त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    धनु – जोडीदारासोबत चांगला समन्वय राहील. तुमच्यात भविष्याबद्दल महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामांचे काळजीपूर्वक नियोजन केले, तर दिवस अत्यंत यशस्वी ठरेल. एखादा सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो, मात्र तुमच्या स्वभावानुसार परिस्थिती व्यवस्थित हाताळाल.

    मकर – इतरांच्या कामात जास्त ढवळाढवळ करणे टाळा. तुम्ही आज उत्साही असाल आणि तुमची कामे लवकर पूर्ण कराल. नवीन मालमत्ता, वाहन किंवा जमीन खरेदी करण्यासाठी दिवस शुभ आहे. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत होईल. क्षुल्लक बाबींवरून वाद घालणे टाळा.

    कुंभ – भावंडांच्या भेटीगाठीत जुन्या  आठवणींना उजाळा मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत अनोळखी व्यक्तींचा सल्ला घेणे टाळा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खास असेल. भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला दोष देण्याऐवजी, त्यातून शिका आणि पुढे वाटचाल करा.

    मीन – काही काळापासून कुटुंबात तणाव असेल, तर संभाषणातून परिस्थिती सुधारू शकते. नवीन लोकांना भेटल्याने भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे मात्र महत्त्वाचे ठरेल. वडिलधाऱ्यांच्या बोलण्याचे तुम्हाला वाईट वाटले, मात्र ते मनावर न घेता शांतपणे त्यामागची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ध्यान केल्याने मनःशांती मिळेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 जून 2026

    June 3, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 जून 2026

    June 2, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 जून 2026

    By Team AvaantarJune 3, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 जून 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 13…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 जून 2026

    June 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जून 2026

    June 1, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    June 4, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका

    June 4, 2026

    स्मृतीगंध… गाण्यांची वही

    June 4, 2026

    Dnyaneshwari : अगा आंधळिया अर्जुना, हाता आलिया मेरूही होय साना

    June 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 जून 2026

    June 4, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 318
    • अवांतर 189
    • आरोग्य 116
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 442
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 218
    • मैत्रीण 20
    • ललित 677
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    June 4, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका

    June 4, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.