Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’
    आरोग्य

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    Team AvaantarBy Team AvaantarJune 3, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, मद्यपानाचा अंमल, तरुणाई दारुच्या विळख्यात, प्रथमच मद्यपानाचा परिणाम, प्रथम मद्यपानाचे परिणाम, दारू आणि नवी पिढी, जेनझीला दारूची नशा, मद्यपानाचा इफेक्ट, तरुणाई आणि मद्यपान
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ओपीडीत ब्रोकोली हेअरकट केलेला, ओवरसाइज्ड शर्ट आणि बॅगी जिन्स घालून आलेला एक जेन-झी प्रचंड डोकंदुखी, जीभ कोरडी पडणं, मळमळ या तक्रारी घेऊन आला होता. त्याचा एकूणच ‘अवतार’ बघता, त्याच्या या अंडरवेट देहात आजवर कधीही न गेलेल्या रसायनानं पहिल्यांदाच प्रवेश केल्याचं मला शून्य मिनिटात समजलं! इथॅनॅाल हेच ते रसायन!!

    प्रारंभी होत काही नाही, पण शरीरातल्या सगळ्या विभागांना ही वार्ता मात्र लागलीच कळते… हे रसायन मेंदू विभागात पोहोचताच GABA (Gamma-Aminobutyric Acid) समिती खूश होते आणि सगळी कामं स्लो मोशनमध्ये करण्याचा ठराव पास करते! परिणामी निर्णयक्षमता रजेवर जाते, आत्मविश्वास चक्क अनावश्यक प्रमाणात वाढतो, ”मी खूप भारी आहे,” असा भ्रम वाढतो… हृदय विभागात वाहिन्या प्रसरण पावतात आणि वाटतं “व्वा, थोडी गर्मी आलीय वाटतं…” पण खरं म्हणजे शरीराचं तापमान उलट खाली आलेलं असतं.

    निद्रा विभागात झोप आल्याचा संदेश मिळतो, पण तो खोटा असतो; REM sleep गायब झालेली असते म्हणजे झोप झाल्यासारखी वाटते, पण मेंदू म्हणतो, “ही झोप नाही, ही नाटकं आहेत.”

    दुसऱ्या दिवशी सकाळी आपत्कालीन बैठक आयोजित होते; डोळे उघडताच डोकेदुखी सुरू होते कारण मेंदूतील आधी फुगलेल्या रक्तवाहिन्या आता आकुंचन पावलेल्या असतात डोक्यात ढोल-ताशे-बँड-बाजा सारं काही सुरू होतं…!

    हेही वाचा – Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!

    यकृत विभागात आधीच ओव्हरटाइम शिफ्टमध्ये काम सुरू झालेलं असतं… तिथं इथॅनॅाल-ॲसिटाल्डीहाईड-ॲसिटेट ही प्रक्रिया झालेली असते, त्यामुळं जळजळ, मळमळ, थकवा जाणवत असतो… आरडाओरड होते, “मी फॅक्टरी आहे रे, जादूगार नाहीऽऽ”

    मूत्रपिंड विभागात या मद्य नामक द्रावणानं ADH अर्थात Anti-Diuretic Hormoneचं बटन दाबलेलं असतं, त्यामुळं लघवी जास्त होते. शरीरातलं पाणी कमी होतं आणि तोंड कोरडं पडतं…

    पचनविभागात गॅस्ट्रिक ॲसिड वाढलेलं असतं, त्यामुळं पोट म्हणतं, ”तुने मुझे ॲसिड दिया, मैं तुम्हे जलन दूंगा..”

    एव्हाना वर तिकडं सेंटरमध्ये न्यूरोट्रान्समीटर युनियनचा संप घोषित होतो! रात्री GABA वाढवली, Glutamate दाबली आणि आज उलट Glutamate rebound होतं आणि चिडचिड, बेचैनी, घाबरटपणा वाढतो आणि “काहीतरी चुकतंय” अशी भावना येते तिलाच ‘हॅंगओव्हर’ असे म्हणतात.

    पठ्ठ्यानं घाबरून का होईना मला विचारलं, “डॉक् मला काही सीरियस आजार तर नाही ना?”

    “नाही रे बाबा! तुला जस्ट FTHS झालंय…” – मी

    “म्हणजे?” – तो

    मी : First-Time Hangover Syndrome

    हेही वाचा – डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    लक्षणजन्य उपचार, भरपूर पाणी, ORS, हलका आहार, थोडा आराम आणि “दारू नाही… आज नाही आणि कधीच नाही!”

    पहिल्यांदा मद्यपानानंतर होणारा हा त्रास म्हणजे शरीराचा अभ्यासवर्ग आहे, परीक्षा नाही… तो सांगतो मर्यादा काय? शरीर किती सहन करू शकतं? काय परिणाम होतात?

    एखादा दारू पिऊन टल्ली झाला की “त्याला चढली” असं म्हणतात… तो तरंगत असतो, पण ती मात्र शब्दश: चढते आणि सामाजिक-शारिरीक-मानसिक-नैतिक-कौटुंबिक-आर्थिक अशा कुठल्याही एका किंवा सर्वच पातळीवर पाडू शकते!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026 आरोग्य

    बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…

    May 27, 2026 आरोग्य

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    By रविंद्र परांजपेMay 30, 2026

    मागील तीन लेखांत आपण लेखन, वाचन आणि संवाद यातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून…

    बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…

    May 27, 2026

    संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 23, 2026

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026

    Dnyaneshwari : जी विश्वरूपाचां सागरीं, होतों तरंग मवित वांवेवरी

    June 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 जून 2026

    June 3, 2026

    Bookshelf : तुंबाडचे खोत… काळ कोणताही असो माणूस तोच!

    June 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 317
    • अवांतर 189
    • आरोग्य 116
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 441
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 218
    • मैत्रीण 20
    • ललित 673
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.