पंचरस आमटी
साहित्य
- तुरीची डाळ – एक वाटी
- कच्ची केळी – चार
- लहान वांगे – एक
- बटाटा – एक
- लहान मुळा – एक
- काजू – एक वाटी
- ओल्या खोबऱ्याचे काप – एक वाटी
- कांदा – एक
- धणे – दोन चमचे
- जिरे – एक चमचा
- चिंच – लहान लिंबाएवढी
- गूळ – चवीनुसार
- मीठ – चवीनुसार
- ओले खोवलेले खोबरे – एक वाटी
- फोडणीचे साहित्य
- सुक्या मिरच्या – एक-दोन
- हिरवी मिरची – पाच-सहा (तुकडे करून)
- गोडा मसाला – एक चमचा
कृती
- तुरीची डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी.
- केळी, बटाटा, वांगे आणि मुळा यांच्या फोडी करून हेही सर्व शिजवून घ्यावे.
- नंतर फोडणी करून, त्यात चिरलेला कांदा टाकून, लालसर परतावा.
- त्यावरच काजू आणि खोबऱ्याचे काप घालावे.
- नंतर त्यावर शिजविलेली डाळ आणि शिजविलेल्या भाज्या टाकून, हवे असेल, तेवढे पाणी घालावे.
- ओले खोवलेले खोबरे, जिरे, सुक्या मिरच्या, चिंच हे सर्व वाटून आमटीत घालावे.
- चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालावा.
- ओल्या मिरच्यांचे तुकडे आणि गोडा मसाला घालून एक चांगली उकळी आणावी.
हेही वाचा – Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…
दही बुत्ती
साहित्य
- तांदूळ – चार वाट्या
- गोड दही – चार वाट्या
- दूध – दोन वाट्या
- मीठ – दोन चमचे
- कुटाच्या मिरच्या – 2-3
- तूप – दोन चमचे
- जिरे – अर्धा चमचा
- कढीलिंब
कृती
- भात चांगला मोकळा शिजवून घ्यावा.
- थंड झाल्यावर गोड दही, मीठ आणि आवडत असल्यास अगदी थोडी साखर घालावी.
- तुपात जिरे आणि कुटाच्या मिरच्या तसेच कढीलिंब घालून, खमंग फोडणी करून, ती त्या भातावर घालावी.
- वर दूध घालून भात चांगला कालवावा. थोडा वेळ ठेवून मग वाढण्यास घ्यावा.
हेही वाचा – Recipe : ओल्या हरभऱ्याची पोळी अन् मुळ्याची पोळी
टीप्स
हा भात प्रवासात नेण्यासही चांगला. प्रवासाला जाताना शिजवून, थंड करून घेतलेल्या भातात दोन वाट्या दूध आणि थोडेसे दही घालून ठेवून द्यावा. म्हणजे आंबट होणार नाही.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


