Author: Team Avaantar

अध्याय तेरावा पाखांडाचे कडे । नागवीं लुंचिती मुंडे । नियोजिली वितंडें । ताळासि येती ॥21॥ मृत्युबळाचेनि माजें । हें जाईल वीण काजें । तें देखोनियां व्याजें । निघाले योगी ॥22॥ मृत्यूनि आधाधिले । तिहीं निरंजन सेविलें । यमदमांचे केले । मेळावे पुरे ॥23॥ येणेंचि क्षेत्राभिमानें । राज्य त्यजिलें ईशानें । गुंति जाणोनि स्मशानें । वासु केला ॥24॥ ऐसिया पैजा महेशा । पांघुरणें दाही दिशा । लांचकरू म्हणोनि कोळसा । कामु केला ॥25॥ पैं सत्यलोकनाथा । वदनें आलीं बळार्था । तरी तो सर्वथा । जाणेचिना ॥26॥ ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् । ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥4॥ एक म्हणती हें स्थळ । जीवाचेंचि समूळ…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 जून 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 06 आषाढ शके 1948;  तिथि : त्रयोदशी 24:43; नक्षत्र : अनुराधा 22:10; योग : साध्य 12:31 ; करण : कौलव 11:31; सूर्य : मिथुन; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 शनिप्रदोष वटसावित्री व्रतारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अर्वाचीन मराठी कवी दत्त टीम अवांतर अर्वाचीन मराठी कवी दत्त यांचा जन्म 27 जून 1875 रोजी अहमदनगर येथे झाला.‌ त्यांचे संपूर्ण नाव होते दत्तात्रेय कोंडो…

Read More

नीलिमा विजय खडतकर आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडत असताना छान गरम गरम खाण्याची इच्छा होते. तेव्हा आपण कांदा भजी, समोसे यासारखे चटपटीत पदार्थ करतो. कच्च्या केळ्याचे समोसे देखील केले जातात. हे समोसे नेहमीच्या समोशांपेक्षा वेगळे आणि पौष्टिक देखील आहेत. कच्च्या केळ्याचे सारण आणि रव्याचे आवरण असलेले हे मिनी समोसे अतिशय खुसखुशीत होतात आणि बराच वेळ तसेच खुसखुशीत राहतात. सारणासाठी साहित्य कच्ची केळी – तीन मध्यम आकाराची बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धा कप आल्याचा तुकडा – एक इंच हिरव्या मिरच्या – चार-पाच जिरे – अर्धा टी-स्पून खसखस – अर्धा टी-स्पून हळद – अर्धा टी-स्पून बडीशेप – अर्धा टी-स्पून साखर…

Read More

अध्याय तेरावा तरि क्षेत्र येणें नावें । हें शरीर जेणें भावें । म्हणितलें तें आघवें । सांगों आतां ॥10॥ हें क्षेत्र कां म्हणिजे । कैसें कें हें उपजे । कवणकवणीं वाढविजे । विकारीं एथ ॥11॥ हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें । बरड कीं पिके । कोणाचें हें ॥12॥ इत्यादि सर्व । जे जे याचे भाव । ते बोलिजती सावेव । अवधान देई ॥13॥ पैं याचि स्थळाकारणें । श्रुति सदा बोबाणे । तर्कु येणेंचि ठिकाणें । तोंडाळु केला ॥14॥ चाळितां हेचि बोली । दर्शनें शेवटा आलीं । तेवींचि नाहीं बुझाविली । अझुनि द्वंद्वें ॥15॥ शास्त्रांचिये सोयरिके ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 जून 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 05 आषाढ शके 1948;  तिथि : द्वादशी 22:21; नक्षत्र : विशाखा 19:15; योग : सिद्ध 11:38 ; करण : बव 09:14; सूर्य : मिथुन; चंद्र : तुळ 12:32 ; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीनुसार) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय कादंबरीलेखनाचा पाया घालणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) टीम अवांतर भारतीय कादंबरीलेखनाचा पाया घालणारे, पहिले कादंबरीकार, कवी, संपादक, तत्वज्ञ आणि ‘वंदे मातरम्’…

Read More

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 3 पार्थ ठरल्याप्रमाणे अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने त्याचं सगळं लीगल डॉक्युमेंटेशन  कम्प्लिट केलं आणि लगेचच जॉइनिंगही केलं… त्याचं जॉइनिंग झालं, तसं त्याला एचआर डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आलं. तिथं गेल्यावर त्याला समजलं की, या कपंनीच्या नवीन बॉसच्या अंडर त्याला एका प्रोजेक्टवर काम करायचं आहे. त्याला लगेचच ट्रेनिंगला पाठवण्यात आलं. तो आधीच हुशार आणि स्मार्ट असल्यामुळे त्याला ते शिकायला वेळ लागला नाही. त्याची बॉस ऑफिसमध्ये एंटर झाली… टकटक हिलचा आवाज सगळ्या केबिनमध्ये घुमत होता… सगळे फटाफट उठून तिला ग्रीट करत होते… ती तशीच तिच्या केबिनमध्ये निघून गेली… मिस्टर राजपाल, म्हणजे तिच्या डॅडचे पीए तिला भेटायला आले… त्यांनी तिला…

Read More

हेमा पाटील भाग – 1 “व्हय गं, वरुटा कुटं हाय? आधी पाळण्यात वरूटा घालायचा आस्तो. आक्षी पैलटकरीन असल्यागतच वागतीयास जनू!” सासूच्या या दरडावत बोलण्याने बाळाला अंगावर पाजत असलेली उमा गोरीमोरी झाली. बाळाला ताईसाहेबांच्या मांडीवर देऊन ती स्वयंपाकघरात आली. तिथला वरवंटा घेऊन तिने कापडाने स्वच्छ पुसला आणि तो घेऊन ती बाहेर आली. त्या वरवंट्याला झबले, टोपडे घालून तिने तो वरवंटा सासूबाईंच्या हातात दिला. पारूबाईंनी तो वरवंटा हातात झेलत आपल्या लेकींना हाका मारल्या… “व्हय गं सारजे, लक्षुमी, यश्वदे या की हिकडं. बाळाला पाळण्यात घालायचा मान आत्याचा आस्तो. तुम्ही कुटं घुटमळत बसलाय? व्हा की पुढं…” आईचा खणखणीत आवाजात झालेला नावाचा गजर ऐकून बाळाच्या…

Read More

अध्याय तेरावा आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूचे ॥1॥ जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे । सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥2॥ वक्तृत्व गोडपणें । अमृतातें पारु म्हणे । रस होती वोळगणें । अक्षरांसी ॥3॥ भावाचें अवतरण । अवतरविती खूण । हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेदें ॥4॥ श्रीगुरूचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय । तैं येवढें भाग्य होय । उन्मेपासी ॥5॥ ते नमस्कारूनि आतां । जो पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसें म्हणे ॥6॥ श्रीभगवानुवाच :- इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥1॥ पार्था परिसिजे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 04 आषाढ शके 1948; तिथि : एकादशी 20:08; नक्षत्र : स्वाती 16:28; योग : शिव 10:53; करण : वणिज 07:08; सूर्य : मिथुन; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 निर्जला एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष इंग्रज कादंबरीकार जॉर्ज ऑर्वेल टीम अवांतर इंग्रज कादंबरीकार, स‌मीक्षक आणि विचारवंत जॉर्ज ऑर्वेल यांचा जन्म 25 जून 1903 रोजी भारतातील मोतीहारी (बंगाल) येथे झाला. त्यांचे खरे नाव होते…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पांडुसुता । ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥238॥ ऐसें निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें । बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥239॥ राया जो निर्मळु । निष्कल लोककृपाळु । शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥240॥ जो धर्मकीर्तिधवळु । अगाध दातृत्वें सरळु । अतुलबळें प्रबळु । बळिबंधनु ॥241॥ जो पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥242॥ जो भक्तजनवत्सलु । प्रेमजनप्रांजलु । सत्यसेतु सकळु । कलानिधी ॥243॥ तो कृष्णजी वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा । सांगतुसे येरु दैवाचा । आइकतु असे ॥244॥ आतां ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारीं…

Read More