Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 27, 2026Updated:June 27, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 27 जून 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 06 आषाढ शके 1948;  तिथि : त्रयोदशी 24:43; नक्षत्र : अनुराधा 22:10;
    • योग : साध्य 12:31 ; करण : कौलव 11:31;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:19;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    शनिप्रदोष

    वटसावित्री व्रतारंभ

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    अर्वाचीन मराठी कवी दत्त

    टीम अवांतर

    अर्वाचीन मराठी कवी दत्त यांचा जन्म 27 जून 1875 रोजी अहमदनगर येथे झाला.‌ त्यांचे संपूर्ण नाव होते दत्तात्रेय कोंडो घाटे. शालेय शिक्षण अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील विल्सन कॉलेज आणि इंदूर येथील ख्रिश्चन कॉलेज येथे झाले. 1898 मध्ये ते कलकत्ता विद्यापीठाचे बी. ए. झाले.

    गायनवादनाचा कवी दत्त यांना विशेष छंद होता.महाविद्यालयीन जीवनातच दत्तांनी कविता करावयास सुरुवात केली. इंग्रजीतील स्वच्छंदतावादी (रोमँटिक) कवींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. पदवी मिळविल्यानंतर नोकरीनिमित्त दत्त बडोद्यास गेले. तेथे कवी चंद्रशेखर यांच्याशी त्यांचा उत्तम स्नेह जमला.

    हेही वाचा – बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    दत्त यांच्या संग्रहित रूपाने उपलब्ध असलेल्या कवितांची संख्या साधारणपणे 50 आहे. कवितेसंबंधीची उत्कट निष्ठा त्यांच्या ‘प्रिये-कविता सुंदरी’ सारख्या कवितेतून प्रत्ययास येते. त्यांच्या बहुतेक कविता या 1897 आणि 1898 या दोन वर्षांच्या कालावधीतील आहेत. ऐतिहासिक, प्रणयात्म, निसर्गपर अशा विविध प्रकारच्या कविता दत्त यांनी लिहिल्या. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या.

    ‘विश्वामित्रीच्या काठी’ ही त्यांची निसर्गपर कविता विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी काही सुंदर शिशुगीतांचीही रचना केली. ‘ताई गुणाची माझी छकुली’, ‘या बाई या’, ‘मोत्या शीक रे अ आ ई’, ‘गडे तू बोलत का नाही?’ यांसारखी त्यांची शिशुगीते आजही लोकप्रिय आहेत. ‘वत्सलतेचे कवी’ म्हणून ते ओळखले जातात. ‘नीज नीज माझ्या बाळा’ ह्या त्यांच्या प्रसिद्ध अंगाईत कारुण्य आणि वात्सल्य ह्यांचा परिणामकारक आणि एकात्म आविष्कार आढळतो.

    दत्त यांच्या कवितेने पूर्ण आकार घेण्याच्या आतच 13 मार्च 1899 रोजी दुर्दैवाने त्यांचे प्लेगच्या आजाराने बडोदा येथे निधन झाले. तथापि अर्वाचीन मराठी कवितेच्या आरंभीच्या मानकऱ्यांपैकी ते एक होत. प्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे  हे दत्त यांचे पुत्र होत. 1921 साली दत्तांची कविता या नावाने वि. द. घाटे यांनी वडिलांच्या 48 कवितांचा संग्रह प्रसिद्ध केला. तर ‘नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.


    आजचे राशिभविष्य

    मेष – दिवस चांगला जाईल. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला त्रास देणारे एखादे काम पूर्ण झाल्याने तुम्हाला दिलासा मिळू शकेल. कार्यालयीन काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण चांगले राहील. गुंतवणूकीच्या बाबतीत कोणतीही घाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

    वृषभ – आज काहीशी द्विधा मनःस्थिती असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांचा दिवस सामान्य असेल. व्यवसायातून मिळणारे छोटे उत्पन्नसुद्धा आनंद देऊन जाईल. आरोग्याची काळजी घ्या. ध्यानधारणा फायदेशीर ठरेल.

    मिथुन – आज तुमच्या शब्दांचा मोठा प्रभाव पडणार आहे त्यामुळे लोकांशी मोकळेपणाने बोला. तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. खर्च आणि बचत यांच्यात संतुलन राखा. संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते.

    कर्क – आजच्या दिवशी थोडे अधिक काम असेल, पण काळजी करण्याची गरज नाही. सर्व कामे एकेक करून हातावेगळी होतील. एखाद्या प्रकल्पासाठी कुटुंबाकडून भक्कम पाठिंबा मिळेल. परदेशात असणाऱ्या एखाद्या नातेवाईकाशी फोनवरून बोलणे झाल्याने आनंद होईल. आरोग्य सामान्य राहील.

    सिंह – तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे मत विचारात घेतले जाईल. त्यावर सविस्तर चर्चा देखील केली जाईल. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. घरात आनंदी वातावरण राहील. आरोग्य सामान्य असेल.

    कन्या – तुमच्या वरच्या जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे हाताळाल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. घरी एखाद्या शुभ प्रसंगाबद्दल चर्चा होऊ शकते. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडे विशेष लक्ष द्या.

    तुळ – आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. गुंतवणूक केलेले पैसे कुठे अडकले असतील, तर ते परत मिळण्याची आशा आहे. आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

    वृश्चिक – दिवसाच्या सुरुवातीला नव्या जोमाने कामाला सुरूवात कराल. एखाद्या जुन्या कामातून सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नातेवाईकांच्या अचानक भेटीमुळे मन आनंदी होईल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. आरोग्य चांगले असेल.

    हेही वाचा – मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम दिसू शकतात. एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला मदत करेल. जवळचा पैसा हुशारीने खर्च करा. कुटुंबासोबत संध्याकाळी एखाद्या ठिकाणी जेवायला जाल. आज आरोग्य उत्तम राहील.

    मकर – आत्मविश्वास टिकून राहील. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पुढे सरकण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि व्यवसायाच्या दोन्ही क्षेत्रांत परिस्थिती चांगली राहील. रागाच्या भरात निर्णय घेणे आणि बोलणे टाळा, कारण तुमच्या एखाद्या शब्दाने समोरच्याचे मन दुखावू शकते. आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

    कुंभ – नशीब तुमच्या बाजूने असू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. एखादी आर्थिक बाब तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. चांगल्या आरोग्यासाठी ध्यानधारणा करा आणि संतुलित आहार घ्या.

    मीन – आजचा दिवस काहीसा आरामदायक असेल. गेल्या काही दिवसांपासून मनात रेंगाळणारी चिंता दूर होऊ शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. महत्त्वाच्या कामात हळूहळू यश मिळेल. आराम करण्यासाठी थोडा वेळ काढा. मानसिक आणि शारीरिक विश्रांती घेणे आज फायदेशीर ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    June 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    By Team AvaantarJune 26, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 जून 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 05…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026

    Recipe : चमचमीत आलू पराठा अन् खमंग बटाटावडा…

    June 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 340
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 468
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 738
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.