Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 25, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 25 जून 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 04 आषाढ शके 1948; तिथि : एकादशी 20:08; नक्षत्र : स्वाती 16:28;
    • योग : शिव 10:53; करण : वणिज 07:08;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:18;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    निर्जला एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    इंग्रज कादंबरीकार जॉर्ज ऑर्वेल

    टीम अवांतर

    इंग्रज कादंबरीकार, स‌मीक्षक आणि विचारवंत जॉर्ज ऑर्वेल यांचा जन्म 25 जून 1903 रोजी भारतातील मोतीहारी (बंगाल) येथे झाला. त्यांचे खरे नाव होते एरिक ब्लेअर. इंग्लंडमधील ईटन येथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यानंतरची दीड वर्ष त्यांनी पॅरिसमध्ये भ्रमंती आणि लेखन करण्यात घालविली. इंग्लंडला परतल्यावर ‘जॉर्ज ऑर्वेल’ या टोपणनावाने त्यांचे लेखन सुरू झाले.

    बर्मिज डेज, क्लर्जिमन्स डॉटर, कीप द ॲस्पिडिस्ट्रा फ्लाइंग, ॲनिमल फार्म आणि नाइन्टीन एटीफोर या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या वाचकांनाही आवडल्या. बर्मीज डेजमधून त्यांनी ब्रिटिश साम्राज्यवादावर हल्ला चढविला, तर क्लर्जिमन्स डॉटर आणि कीप द ॲस्पिडिस्ट्रा फ्लाइंगमधून श्रमिकांच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण केले. ॲनिमल फार्म आणि नाइन्टीन एटीफोर या कादंबऱ्यांनी त्यावेळी प्रचंड खळबळ उडवून दिली. ॲनिमल फार्म ही कादंबरी म्हणजे रशियन राज्यक्रांतिवरील उपरोधप्रचुर रूपक असे मानले जाते. तर, नाइन्टीन एटीफोरमध्ये स‌र्वंकष राजसत्तेवर विदारक टीका केलेली आहे.

    हेही वाचा – प्रदीप नक्की कोण होता?

    इन्‌साइड द व्हेल, क्रिटिकल एसेज आणि शूटिंग ॲन एलिफंट  हे त्यांच्या टीकात्मक लेखांचे संग्रह देखील प्रसिद्ध झाले. यात त्यांनी केलेली स‌मीक्षा काही ठिकाणी पूर्वग्रहदूषित वाटली, तरी मर्मग्राही आणि स्वतंत्र विचारांची निदर्शक आहे असे अभ्यासक मानतात.

    रोड टू विगन पिअर आणि होमेज टू कॅटलोनिआ या पुस्तकांमधील त्यांचे लेखन राजकीय स्वरूपाचे आहे. रोड टू विगन पिअरमध्ये लँकाशरमधील श्रमिकांचे त्यांनी यथार्थ वर्णन केले आहे. तर, होमेज टू कॅटलोनिआमध्ये स्पेनमधील यादवी युद्धासंबंधीचे आपले अनुभव त्यांनी मांडले आहेत. लेखनाव्यतिरिक्त दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बीबीसीवरील कार्यक्रमांचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली होती. 21 जानेवारी 1950 रोजी लंडन येथे त्यांचे निधन झाले. आधुनिक संस्कृती, राजकारणावरचा ऑर्वेल यांचा पगडा अद्यापही अबाधित आहे. त्यांनी भाषेला बहाल केलेल्या अनेक नवीन संज्ञांबरोबरच ऑर्वेलियन ही संज्ञा शब्दकोशांत समाविष्ट झालेली आहे.


    आजचे राशीभविष्य

    मेष – काहीतरी नवीन सुरू करू शकता आणि त्यातून भविष्यात फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, मात्र मोठ्या आत्मविश्वासाने हे आव्हान तुम्ही सहजपणे पेलाल. व्यवसायात लहानशा निष्काळजीपणाचे मोठे परिणाम होऊ शकतात, म्हणून सावध रहा. विद्यार्थ्यांसाठी, दिवस कठोर परिश्रम आणि यशाचा एक सुंदर संगम घेऊन येईल.

    वृषभ – तुमची प्रतिभा आणि सर्जनशीलता लोकांना प्रभावित करेल आणि तुम्हाला विशेष ओळख मिळवून देऊ शकते. तुमच्या कामाची समाजात चर्चा होईल. तुमची बुद्धिमत्ता आणि अनुभव अनेक कठीण मार्ग सोपे करतील. दुसऱ्यांच्या बोलण्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. एक छोटी सहल शक्य आहे, जी एका फायदेशीर संधीचे दारही ठरू शकते.

    मिथुन – आज उचललेले कोणतेही नवीन पाऊल भविष्यातील यशाचे बीज ठरू शकते. म्हणूनच, कामाच्या ठिकाणी काही अडचणी आल्यास, घाई करू नका. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखल्याने मन शांत राहील आणि परिस्थिती अधिक अनुकूल होईल. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा, वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या.

    कर्क – जवळपास पूर्ण झालेला एखादा प्रकल्प अचानक थांबू शकतो, पण संयम ठेवल्यास परिस्थिती स्थिर होईल. तर दुसरीकडे, एखादा जुना व्यवहार पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता असली तरी, आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. परदेशात शिक्षण किंवा करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.

    सिंह – आर्थिक बाबींमध्येही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विशेषतः पैसे उधार देताना. अपूर्ण कामे पुढे ढकलणे आज हानिकारक ठरू शकते. किरकोळ कौटुंबिक समस्यांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ शकते, परंतु तुमची समज परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. कोणतेही वचन देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

    कन्या – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या कोणत्याही सरकारी कामात प्रगती होऊ शकते. तथापि, काही कामे शेवटच्या क्षणी अडकू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. धोकादायक निर्णय टाळणे योग्य ठरेल. नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही. तुएका शुभ कौटुंबिक कार्यक्रमाच्या तयारीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

    तुळ – आज केलेले प्रत्येक नियोजित प्रयत्न यशस्वी होतील. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. स्थावर मालमत्ता किंवा प्रॉपर्टी व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा काळ फायदेशीर दिसत आहे. मात्र, वाहनाशी संबंधित खर्च अनपेक्षितपणे उद्भवू शकतो, त्यामुळे आर्थिक संतुलन राखा. सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

    वृश्चिक – आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि कोणतेही व्यवहार पूर्ण स्पष्टतेने करा. काही लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. तुमच्या एका दीर्घकाळच्या चिंतेतून तुम्हाला दिलासा मिळेल. तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दलची सौम्य चिंता कायम राहू शकते, परंतु लवकरच सकारात्मक चिन्हे दिसतील.

    हेही वाचा – मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    धनु – करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे टाळा. तुमच्या वागणुकीने आणि विचारांनी लोक प्रभावित होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, अन्यथा नंतर अडचणी येऊ शकतात. कुटुंबात प्रेम आणि एकोपा टिकून राहील.

    मकर – वेळ आणि पैसा हुशारीने वापरणे महत्त्वाचे ठरेल. भोवतालच्या लोकांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण प्रत्येक स्माइल देणारी व्यक्ती हितचिंतक नसते. व्यवसाय आणि करिअर या दोन्हीमध्ये सकारात्मक संकेत आहेत. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. तथापि, एखादा महत्त्वाचा करार शेवटच्या क्षणी अडकू शकतो, त्यामुळे संयम बाळगा.

    कुंभ –  ऑनलाइन काम करणाऱ्यांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील. रखडलेला एखादा व्यावसायिक करार पूर्ण होऊ शकतो आणि त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि हे कौटुंबिक क्षण अविस्मरणीय ठरतील.

    मीन – दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने होऊ शकते आणि अनेक सकारात्मक घटनांमुळे उत्साह वाढेल. एखादी चूक उघडकीस आल्यास, ती मान्य केल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. नम्रता आणि सत्यनिष्ठा तुमच्या नात्यात पुन्हा गोडवा आणण्यास मदत करतील. वैवाहिक जीवनात, लहानसहान गोष्टींना मोठे स्वरूप येऊ न देणे महत्त्वाचे ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    By Team AvaantarJune 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 जून 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    June 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026

    Dnyaneshwari : जो भक्तजनवत्सलु, प्रेमळजनप्रांजलु

    June 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 338
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 466
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 731
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026
    Most Popular

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.