कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे. ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा ठरू शकतो. हा आजार दूषित अन्न-पाणी, तेलकट पदार्थ आणि शिळे अन्न खाल्ल्यामुळे होतो. यामध्ये लिव्हर सुजणे, भूक न लागणे, शरीर आणि डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे अशा समस्या दिसतात.
कावीळ म्हणजे ज्याला पीलिया (Pilia) म्हणतात — हा आजार यकृताशी संबंधित असतो. याचे वेळेवर उपचार न केल्यास कावीळ भयंकर रूप घेऊ शकते आणि जीव धोक्यात येऊ शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळवर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत. कावीळ झाल्यावर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून पुढील घरगुती उपाय अवश्य करावेत. जे कावीळ, हेपेटायटीस A, B, C किंवा बिलरुबिन वाढलेले असल्यासही उपयोगी पडतील.
शहाळ्याचे पाणी
रोज दिवसातून दोन वेळा ताजे नारळपाणी प्या. तीन ते पाच दिवस सतत फक्त नारळपाण्यावर राहिल्यास लिव्हरला विश्रांती मिळते आणि कावीळ कमी होते.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
कांदे
एक कांदा सोलून त्याचे पातळ तुकडे करा, त्यात लिंबू रस, काळीमिरी पावडर आणि काळे मीठ टाका. दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन करा — कावीळ लवकर बरी होते.
चण्याची डाळ
रात्री भिजवलेली चण्याची डाळ सकाळी थोड्या गुळासोबत घ्या. हा उपाय एक-दोन आठवडे केल्यास फायदा होतो.
सुंठ
10 ग्रॅम सुंठ + 10 ग्रॅम गूळ मिसळून (माठातल्या) थंड पाण्यासोबत सकाळी घ्या. लिव्हर शुद्ध होऊन कावीळ बरी होते.
लसणाचे दूध
लसण्याच्या चार पाकळ्या बारीक करून 200 ग्रॅम दुधात टाका आणि प्या. यामुळे कावीळ मुळापासून नाहीशी होण्यास मदत होते.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या
चिंच
रात्री पाण्यात भिजवलेली चिंच सकाळी पिळून त्यात काळीमिरी पावडर आणि काळे मीठ टाका आणि प्या. दोन आठवडे सतत केल्यास परिणाम दिसतो.
मध आणि आवळा रस
एक चमचा मधात 50 ग्रॅम ताज्या आवळ्याचा रस मिक्स करा. सलग तीन आठवडे दररोज सकाळी घ्या — कावीळ बरी होण्यास मदत होते.


