Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी

    October 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 ऑक्टोबर 2026

    October 23, 2026

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 23, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Fourteen, चौदावा अध्याय, अध्याय चौदावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय चौदावा

    म्हणे पार्था तुझी नवाई । हें येतुलेंचि पुससी काई । तें नामचि तया पाहीं । साचे लटिकें ॥323॥ गुणातीत जया नांवें । तो गुणाधीन तरी नव्हे । ना होय तरी नांगवे । गुणां यया ॥324॥ परी अधीन कां नांगवें । हेंचि कैसेनि जाणावें । गुणांचिये उखरवे- । माजीं असतां ॥325॥ हा संदेह जरी वाहसी । तरी सुखें पुसों लाहसी । परिस आतां तयासी । रूप करूं ॥326॥

    श्रीभगवानुवाच : प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव । न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ॥22॥

    तरी रजाचेनि माजें । देहीं कर्माचें आणोजें । प्रवृत्ति जैं घेईजे । वेंटाळूनि ॥327॥ तैं मीचि कां कर्मठ । ऐसा न ये श्रीमाठ । दरिद्रलिये बुद्धी वीट । तोही नाहीं ॥328॥ अथवा सत्त्वेंचि अधिकें । जैं सर्वेंद्रियीं ज्ञान फांके । तैं सुविद्यता तोखें । उभजेही ना ॥329॥ कां वाढिलेनि तमें । न गिळिजेचि मोहभ्रमें । तैं अज्ञानत्वें न श्रमे । घेणेंही नाहीं ॥330॥ पैं मोहाचां अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी । ज्ञानें कर्में नादरी । होतां न दुःखी ॥331॥ सायंप्रातर्मध्यान्हा । या तिहीं काळांची गणना । नाहीं जेवीं तपना । तैसा असे ॥332॥ तया वेगळाचि काय प्रकाशें । ज्ञानित्व यावें असें । कायि जळार्णव पाउसें । साजा होय ॥333॥ ना प्रवर्तलेनि कर्में । कर्मठत्व तया कां गमे । सांगें हिमवंतु हिमें । कांपे कायी ॥334॥ नातरी मोह आलिया । काइ पां ज्ञाना मुकिजेल तया । महाआगीतें उन्हाळेया । जाळवत असे ॥335॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अगा अज्ञानाचिया निदा, जो घोरत होता बदबदा

    अर्थ

    श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे! तो गुणातीत काय कर्मे करतो व गु्णातून कसा तरून जातो, हे एवढच (असे) असंबंद्ध काय विचारतोस? हे तुझे विचारणे ‘खरे हे कसे खोटे आहे?’ ह्या विचारण्यासारखे विसंगत आहे ॥323॥ (अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात). गुणातीत ज्याला म्हणतात, तो गुणांच्या आधीन तर नसतोच अथवा तो जरी गुणात सापडला असला तरी तो त्या गुणांच्या आधीन होत नाही. ॥324॥ (या ओवीत अर्जुनाच्या प्रश्नाची दुरुस्ती करतात) पण तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असतांना, तो गुणांच्या आधीन आहे किंवा तो गुणांच्या आधीन नाही, हे कसे ओळखावे? ॥325॥ हा संशय जर तुझ्या मनात असेल, तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल. आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो, तू ऐक. ॥326॥

    श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, (सत्त्वगुणाचे कार्य) प्रकाश, (रजोगुणाचे कार्य) प्रवृत्ति आणि (तमोगुणाचे कार्य) मोह, ही प्राप्त झाली असता (गुणातीत झालेला मनुष्य) त्यांचा तिरस्कार करत नाही. ही प्राप्त होऊन नाहीशी झाली असता तो त्यांची इच्छा करत नाही. ॥22॥

    तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो, त्या वेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. ॥327 तेव्हा (त्या गुणातीत पुरुषाला) ‘मी एक कर्मठ आहे’ असा अभिमान चढत नाही अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद तोहि होत नाही. ॥328॥ अथवा सत्त्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान फाकते, त्या वेळी चांगल्या विद्वत्तेने (मी ज्ञानी आहे असा) हर्षभरित होत नाही. (अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही) तरी त्याला खेदही होत नाही. ॥329॥ अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष, मोह व भ्रम यांजकडून ग्रासला जातच नाही, (त्याचप्रमाणे) तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही, अथवा तो अज्ञानाचा स्वीकार करीत नाही. ॥330॥ मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झाले तर त्याचा खेदही करत नाही. ॥331॥ ज्याप्रमाणे सूर्याला प्रात:काल, मध्याह्नकाल व सायंकाल या तिन्ही काळांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष असतो. (म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते). ॥332॥ त्याला काही वेगळ्याच (सत्त्वगुणाच्या, शास्त्रांच्या वगैरे) प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय? (तर नाही, तो ज्ञानाची मूर्तीच आहे). समुद्र हा पावसाच्या योगाने पूर्ण भरलेला होतो काय? ॥333॥ अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ति झाली तर त्याला कर्मठत्व (मी यथासांग कर्म करणारा आहे असा अभिमान) वाटेल काय? अर्जुना, सांग पाहू. हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय? ॥334॥ अथवा (तमाधिक्याने) त्याच्यासमोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय? उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय ? ॥335॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : घटाचिया खापरिया, घटभंगीं फेडिलिया

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    मी शिव आहे… मी चिदानंद आहे!

    October 22, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : घटाचिया खापरिया, घटभंगीं फेडिलिया

    October 22, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : अगा अज्ञानाचिया निदा, जो घोरत होता बदबदा

    October 21, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    मी शिव आहे… मी चिदानंद आहे!

    By डॉ. शिरीष कुलकर्णीOctober 22, 2026

    माया / आत्मषटक जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांचे ‘आत्मषटक’ ज्याला आपण निर्वाणषटक असेही म्हणतो ते मानवी…

    सार्थ ज्ञानेश्वरी : घटाचिया खापरिया, घटभंगीं फेडिलिया

    October 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अगा अज्ञानाचिया निदा, जो घोरत होता बदबदा

    October 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सत्त्वरजतमांचां, भेदीं पसरु कर्माचा

    October 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी

    October 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 ऑक्टोबर 2026

    October 23, 2026

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026

    Recipe : टेस्टी बेसन भात अन् आंबट-गोड चिंचेचे सार

    October 22, 2026

    मी शिव आहे… मी चिदानंद आहे!

    October 22, 2026

    मानवी मेंदूची खरी क्षमता किती?

    October 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 480
    • अवांतर 217
    • आरोग्य 162
    • पंचांग आणि भविष्य 642
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 261
    • मैत्रीण 32
    • ललित 1010
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी

    October 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 ऑक्टोबर 2026

    October 23, 2026

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.