Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    October 23, 2026

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026

    Recipe : मेथी आणि तुरीच्या ओल्या दाण्यांची भरडा भाजी!

    October 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?
    ललित

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यOctober 23, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या विवाह, शर्वायला आराध्याची साथ, आनंदीला माधवची फूस, तन्वीची दुहेरी खेळी, माधवच्या कटात अज्ञात व्यक्ती
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 48

    “शर्वाय!” आराध्या त्याच्याकडे बघत म्हणाली, “तुमचं स्थान… तुमचा प्रभाव… कदाचित तुमचं आयुष्य… माधवच्या सहाय्याने तिला हे सगळं मिळवता येईल, असं वाटत असेल तिला. पण त्यासाठी ती स्वतःचा स्वतंत्र डाव खेळते आहे.”

    शर्वायच्या मनात हलकीशी संशयाची पाल चुकचुकली… “म्हणजे तू म्हणतेस, माधव अन्वीला वापरतोय, आणि तीही त्याला?”

    आराध्या मान डोलावली…

    “हो. आणि याच कारणामुळे आपल्याला दोघांवर लक्ष ठेवावं लागेल. माधववरच नाही, तर अन्वीवरही. कारण एखादी व्यक्ती जास्त चतुर असते, तेव्हा ती दुहेरी डाव खेळते.”

    दिवाकर पुढे झुकले आणि म्हणाले, “आपण अन्वीला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि तिचा विश्वास संपादन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.”

    आराध्या शांत, पण ठाम आवाजात म्हणाली — “अन्वीला विश्वासात घेण्याची गरज नाही लागणार. आपला काहीच फायदा नाही तिच्यात गुंतून. ती स्वतःहून बाजूला होईल.”

    शर्वाय तिच्याकडे बघत राहिला.

    “तुला इतकं खात्रीपूर्वक वाटतंय का?” त्याने विचारलं.

    “हो,” आराध्या उत्तरली… “ती जितकी हुशार आहे, तितकीच आत्मकेंद्रितही आहे. ज्यावेळी तिला जाणवेल की, या खेळात तिच्या पदरात काही पडत नाही… ती स्वतःहून बाजूला होईल. तिला माधव काकांच्या मोहजाळाची जाणीव होईल, पण त्याला साथ द्यायचं म्हणजे स्वतःची पत गमावणं… हे तिच्या अहंकाराला चालणार नाही.”

    शर्वाय गहिरा श्वास घेत म्हणाला, “कधी कधी वाटतं, तू माझ्याही आधी सगळं ओळखतेस.”

    आराध्याने हलकंसं हसत उत्तर दिलं — “कारण  हे युद्ध माझंही आहे आता… आणि शत्रू कोण आहे, त्याची कमजोरी कुठे आहे, हे ओळखणं आणि माझ्या नात्याचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे.”

    शर्वाय गंभीरतेने आराध्याकडे पाहतो… “आपण या डावात पूर्ण तयारीनं उतरायचं. कारण समोरचं फक्त एक नाही, दोन चेहऱ्यांचं युद्ध आहे.”

    आराध्या डोळे मिटते आणि म्हणते — “हा फक्त संघर्ष नाही, तो विश्वासाचंही परीक्षण आहे.”

    आराध्याने दिवाकरना प्रश्न केला…

    “हे माधव काका आणि तुमचं नातं कसं आहे? किती घट्ट, किती खोल, किती विश्वासाचं?”

    दिवाकर थोडे गडबडले… आराध्या समोर बसली होती, तिच्या डोळ्यात प्रश्न होते, पण आवाज शांत होता. कोणताही रोष नव्हता, फक्त जाणून घेण्याची स्पष्ट इच्छा होती आणि आज ती त्या घराची सून होती कोणी परकी नव्हती.

    दिवाकर काही क्षण शांत राहिले, मग खोलीच्या कोपऱ्यात पाहात म्हणाले —

    “माधव लांबच्या नात्याने माझा चुलत भाऊ आहे. वडिलांच्या दुसऱ्या शाखेतील. वडील गेल्यावर त्यांच्या कुटुंबाकडून काही वर्षं खूप मदत घेतली होती आम्ही… माधव तेव्हापासूनच घरात येत-जात राहायचा. पण…”

    ते थांबले…

    आराध्याने हळू आवाजात विचारलं, “पण?”

    दिवाकर खोल श्वास घेत पुढे बोलू लागले — “पण कालांतराने त्याचा व्यवसायपाणी उत्तम पाहून  आनंदीच्या लहान बहिणीशी त्याचं लग्न झालं…. पुन्हा इथे लग्न झालं की, घडवून आणलं हा प्रश्न निर्माण झाला… कारण जसजसे आपण पुढे जात गेलो, जहागीरदार व्यवसाय उभा करत गेलो, तसतसं मला जाणवत गेलं की, माधवचा दृष्टिकोन बदलतोय. त्याला असं वाटतं की, ही सगळी सत्ता, हक्क, प्रतिष्ठा त्याच्याकडे यायला हवी होती. त्याला माझ्यावर… माझ्या निर्णयांवर… नियंत्रण हवं होतं. पण मी  मात्र त्याला घरात मान दिला, बिझनेसमध्ये सोबतीला घेतलं, आपलेपणा दिला… तो मात्र आपल्या पाठीमागे विष निर्माण करत गेला.”

    आराध्या तिथे स्तब्ध होती. तिचा श्वास जड झाला होता.

    “तुम्ही हे आधी का नाही सांगितलं?” तिने शांतपणे, पण थेट विचारलं.

    दिवाकर तिच्याकडे पाहत म्हणाले — “कारण माझा स्वतःवरही कधी संपूर्ण विश्वास नव्हता आणि मला वाटायचं, एक दिवस तो बदलेल. पण आता वाटतं, खूप उशीर झालाय.”

    हेही वाचा – शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    आराध्या उठली, निश्चयाने म्हणाली — “उशीर झाला तरी चुकीच्या विश्वासाचं ओझं दूर करायला मी आणि शर्वाय तुमच्यासोबत आहोत. आता हिशेब चुकता करावाच लागेल.”

    आराध्या आणि दिवाकर बोलत असताना शर्वाय आपला मोबाइल घेऊन बाजूला गेला… शर्वाय घराच्या गच्चीवर एकटाच उभा होता. रात्रीची वाऱ्याची झुळूक अंगावरून वाहत होती, पण त्याच्या मनात विचारांचे वादळ उसळत होतं. त्याने मोबाइल उचलला आणि थेट दत्ताला कॉल लावला. फोन उचलताच… आवाज गंभीर आणि ठाम होता —

    “दत्ता, माझं तातडीचं काम आहे.”

    दत्ताने त्वरित प्रतिसाद दिला, “बोला सर.”

    शर्वाय थोडासा थांबला, मग स्पष्टपणे म्हणाला, “मला अन्वी राजे, म्हणजे आराध्याची बहीण… तिची संपूर्ण हिस्ट्री हवी आहे. शिक्षण, ट्रॅव्हल, सोशल नेटवर्क, तिच्या संपर्कातले लोक, विशेषतः तिचे कोणतेही फायनान्स, गुंतवणूक किंवा कोणासोबतही झालेले व्यवहार – एकही गोष्ट चुकता कामा नये.”

    दत्ता थोडा अवाक झाला, “सर… काही विशेष कारण?”

    शर्वायने थोडा खोल श्वास घेतला…

    “ती फक्त मोहरा नाही दत्ता… माधवच्या खेळातलं ती प्यादं  आहे आणि तो  तिचं माझ्याशी लग्न लावायला पाहतोय कदाचित  या माहितीतून असं काही नक्कीच निघेल  की, आईच त्याला विरोध करेल.”

    दत्ताने लगेच गंभीर होत उत्तर दिलं, “समजलं सर. तुम्हाला उद्यापर्यंत सर्व माहिती पाठवतो.”

    शर्वायने दत्ताला विचारलं, आवाजात एक ताण स्पष्ट जाणवत होता — “दत्ता, प्रकाशचं काय? लक्ष ठेवून आहे ना, तो माधववर?”

    दत्ता थोडासा थांबला, पण लगेच म्हणाला, “हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रकाश त्याच्या पूर्ण मागावर  आहे… एकूणच, त्याच्या हालचालींवर माझं आणि टीमचं बारीक लक्ष आहे. तो सध्या कुठल्याही थेट संवादात नाही, पण काही विचित्र गोष्टी दिसू लागल्या आहेत.”

    शर्वायचा स्वर अधिक गंभीर झाला — “कोणत्या गोष्टी?”

    दत्ताने हळू आवाजात सांगितलं — “एका अज्ञात नंबरशी तो संपर्कात आहे. मेसेजेस एनक्रिप्टेड आहेत. मी त्यावर काम करतोय…”

    “आणि सर, कदाचित उद्या एक मोठी बातमी हाती लागेल. काही लिंक आहे असं वाटतं — माधवचं अन्वी आणि आता त्या अज्ञात नंबरशी काही गूढ  संपर्क दिसतंय.”

    शर्वाय शांत झाला, पण डोळ्यात एक ज्वाला पेटली…

    “दत्ता, काहीही झालं तरी यावेळी आपण एक पाऊल पुढेच असलो पाहिजे. प्रकाशला सांग  माधव कोणासाठी खेळतोय, हे समजायलाच  हवं. उद्या लवकरात लवकर अपडेट हवाय.”

    दत्ताने ठामपणे उत्तर दिलं — “कॉपी सर. पहाटेपर्यंत रिपोर्ट तयार असेल.”

    फोन कट झाला… आणि शर्वायच्या मनात एक नवा संदिग्ध चेहरा स्पष्ट होत चालला होता.

    “प्रकाश, तुझ्या हाती लागलेलं नक्की काय  असेल आणि  त्याचा जहागीरदारांनावर काय प्रभाव पडेल  कळायला हवंच…”

    शर्वायने फोन कट केला. त्याच्या मनात आता एकच गोष्ट ठसली होती — “माधव  त्याच्या डावात अजून कोणाकोणाला आणि नक्की कशासाठी  जोडत चालला आहे? त्याचं नक्की उदिष्ट  आहे तरी काय? कोणाच्या आणि कसल्या सावल्या आहेत  या? जर या सावल्या अस्तित्वात आहेत, तर त्याचा अंधार आधीच समजून घ्यावा लागेल…” मनातच विचार करत तो आराध्या आणि दिवाकरांच्या जवळ आला.

    “आम्ही एकत्र येऊ नये म्हणून माधव काका प्रयत्न करत होते, असं का?” आराध्याने न राहवून  दिवाकर यांना विचारलं. आराध्याच्या प्रश्नात फक्त शंका नव्हती — त्यामागे एक वेदना होती अन् एक कोडं होतं.

    शर्वायने स्वतःला शांत केलं. खिडकीबाहेरच्या काळोखात बघत काही क्षण गेले. शेवटी त्याने हळूच उत्तर दिलं — “कारण, त्यांना हे नातं नको आहे… आपण एकत्र आलो, तर त्यांचे सर्व डाव मोडून निघतील, आराध्या.”

    आराध्या अजूनही समजून घ्यायच्या प्रयत्नात होती… “पण मी त्यांचं काय बिघडवलं? का मला अडवायचंय?”

    शर्वाय तिच्याजवळ सरकला, तिच्या हातात हात घेत म्हणाला — “कारण तू माझं बळ आहेस… आणि त्याला माझं बळ नको आहे. ते आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न करतायत, कारण त्यांना माहीत आहे — तुझ्या साथीनं मी अजिंक्य होतो… मी यशस्वी असलेलं पाहवत नाही त्याला… माझं नुकसान झालेलं पाहण्यात त्याला आनंद होतो.”

    हेही वाचा – माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    आराध्याच्या डोळ्यात आता स्पष्टपणे ठिणग्या पेटल्या… “त्यांना वाटतंय मी फक्त एक मोहरा आहे… पण आता मीही खेळी ओळखतेय,” ती म्हणाली… “मी तुझी आहे, शर्वाय. आता कोणी काहीही केलं, तरी मी मागे हटणार नाही.”

    शर्वायला तिच्याकडे बघून पुन्हा एकदा वाटलं — हे नातं कुणाच्याही कुचाळक्यांनी मोडणारं नाही. हे नातं आता युद्धाच्या रणभूमीवर विश्वासाचं शस्त्र बनून उभं आहे.

    दिवाकर एकटक त्या दोघांकडे पाहत होते. त्याच्या नजरेत काळजीही होती आणि एक हलकंसं समाधानही. बराच वेळ बोलणं झालं होतं. विषय गंभीर होते, पण दोघांची मानसिक तयारी पाहून त्याला हायसं वाटलं.

    ते थोडंसं हसत म्हणाले, “जाऊ द्या आता, खूप बोललात आज. थोडं विश्रांती घ्या. बाकी उद्याच उद्या पाहून घेऊ…”

    शर्वाय आणि आराध्या दोघंही उठले.

    शर्वाय म्हणाला, “गुडनाइट बाबा…”

    आराध्याही हसून म्हणाली, “शुभरात्री बाबा…”

    दिवाकर यांनी त्यांच्याकडे पाहत हलकेच मान डोलावली…

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026 ललित

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026 ललित

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    By हेमा पाटीलOctober 23, 2026

    भाग – 18 घरी गेल्यावर तिने आईला सांगितले की, ती शरयूला घेऊन आली आहे. तिच्यासाठी…

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    October 23, 2026

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026

    Recipe : मेथी आणि तुरीच्या ओल्या दाण्यांची भरडा भाजी!

    October 23, 2026

    अकल्पित अद्भुत अष्टम भाव

    October 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मोहाचां अवसरीं, ज्ञानाची चाड न धरी

    October 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 ऑक्टोबर 2026

    October 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 480
    • अवांतर 217
    • आरोग्य 162
    • पंचांग आणि भविष्य 643
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 32
    • ललित 1012
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    October 23, 2026

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026

    Recipe : मेथी आणि तुरीच्या ओल्या दाण्यांची भरडा भाजी!

    October 23, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.