Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
    आरोग्य

    आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान

    Team AvaantarBy Team AvaantarJune 28, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    म्हणजे, आयुर्वेद, आहार, जीवनशैली, Diet, lifestyle, Ayurveda
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रिया गुमास्ते

    (आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सल्टंट)

    सध्याच्या काळात नॅचरल, हर्बल हे शब्द वरचेवर कानावर पडत असतात आणि आयुर्वेद म्हणजे हर्बल औषधी हाच समज बहुतांश लोकांमध्ये आहे. पण आयुर्वेद फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही. मग काय आहे हे आयुर्वेद?

    आपल्या भारतात सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी अत्यंत विद्वान ऋषींनी अभ्यासपूर्ण असे वेद लिहिले. वेद म्हणजे ज्ञान देणारे ग्रंथ. त्यामधील एक उपवेद म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद या शब्दाची फोड केली तर ती होते आयुषो वेदः| यातील आयु म्हणजे जीवन तर, वेद म्हणजे विज्ञान. थोडक्यात सांगायचे झाले तर, आयुष्याविषयी माहिती देणारा, जीवनाचे विज्ञान उलगडून देणारा ग्रंथ म्हणजे ‘आयुर्वेद’!

    हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम्।
    मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते।।

    म्हणजेच ज्या शास्त्रामध्ये हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर आयुष्य म्हणजे काय  आणि त्या आयुष्यासाठी हितकर तसेच अहितकर गोष्टींचे वर्णन केलेले आहे, त्याला आयुर्वेद म्हणतात. आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान. ही एक प्राचीन भारतीय उपचार पद्धती आहे, जी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य नीट राहावे, यासाठी नैसर्गिकरित्या प्रयत्न करते. आयुर्वेद शरीरातील तीन ऊर्जा (वात, पित्त, कफ) यांच्या संतुलनावर भर देते.

    स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं च|

    हा आयुर्वेदाचा मुख्य उद्देश आहे. स्वस्थ म्हणजे निरोगी माणूस. तो आजारीच पडू नये यासाठी करायचे उपाय आणि तो आजारी पडल्यास त्या व्यक्तीस पुन्हा निरोगी करण्यासाठी औषधोपचारादि उपाय करणे, हे आयुर्वेदाचे ध्येय आहे. त्यामुळे अनेकदा यात केली जाणारी उपचार प्रक्रिया ही वैयक्तिक स्वरूपाची असते.

    हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा

    मनुष्याचे शरीर‌ दोष, धातु, मल‌ आणि अग्नि या चार मूळ तत्वांवर आधारलेले असते.  त्यामुळे आयुर्वेदातही याच चार मूलतत्वांना फार महत्त्व आहे. म्हणूनच दैनंदिन आचार, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यावर आयुर्वेदात भर दिला जातो.

    आजच्या धावपळीच्या जीवनात, जिथे ताणतणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, तिथे आयुर्वेद एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरतो.

    चरक संहिता या आयुर्वेदातील एका प्रमुख ग्रंथाची सुरुवात ‘दीर्घम् जीवितीय’ अध्यायाने केलेली आहे. या अध्यायात, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, जसे की आहार (diet) आणि जीवनशैली (lifestyle) यांचे मार्गदर्शन केलेले आहे. यावरुन आयुर्वेदात prevention of diseaseला किती महत्व दिले आहे, हे समजून येईल. तसेच रोगावर फक्त लाक्षणिक (Symptomatic) उपचार न करता तो मुळापासून बरा करण्यावर आयुर्वेद भर देते.

    हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!

    कोरोना काळात सर्वांनाच नैसर्गिक प्रतिकार शक्तीचे (Immune power of body) महत्त्व समजून आले आहे आणि म्हणूनच प्राचीनतम असणारे आपले हे वैद्यकीय शास्त्र आजही तितकेच महत्त्वाचे आणि उपायुक्त आहे.

    (क्रमश:)

    Mobile : 9819340378

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026 आरोग्य

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 16, 2026

    “डॉक्टर एक काम करता का? थेट फुफ्फुसात इंजेक्शन द्या की, वाफ घेऊन, गोळ्या खाऊन, औषधं…

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026
    Most Popular

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.