Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?
    आरोग्य

    दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरOctober 15, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, मानसिक आळस, Cognitive Laziness, पुन्हा पुन्हा त्याच चुका, दरवाजा ढकलणे, दरवाजा ओढणे, यशाचे श्रेय, डॉक्टरांची चूक, अपयशाचे खापर, सतर्कतेची गरज, सावधानतेची गरज, समजूतदारपणाचा अभाव,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आमच्या ओपीडीत केबिनच्या दरवाज्यावर मोठ्या अक्षरात PULL आणि ओढा असे दोन्ही लेबल्स लावले आहेत, त्याखाली ओढणाऱ्या माणसाचे चित्रसुद्धा आहे. तरीही दिवसातून अनेक वेळा तो दरवाजा ढकलला जातो. एकदा, दोनदा नव्हे, तर अनेकदा आणि वर्षानुवर्षे!

    आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्याचा तर हा कायमस्वरूपी कार्यक्रम. त्या येतात, दरवाजा ढकलतात, तो उघडत नाही. पुन्हा ढकलतात… मग मी आतून म्हणतो, “खाऽला,खिंचोऽऽ.”

    यावर त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, “मैं तो अनपढ हूँ, मुझे पढ़ना-लिखना नहीं आता…”

    मी अनेकदा विचार केला, ठीक आहे. अक्षरं वाचता येत नसतील, मग एकदा मी त्यांना चित्र दाखवलं… ओढणाऱ्या माणसाचं! पण उत्तर पुन्हा तेच, “मुझे क्या समझता? मैं तो अनपढ हूँ.”

    त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की, प्रश्न निरक्षरतेचा नाही. प्रश्न आहे लक्ष देण्याचा. कारण एखादी व्यक्ती अक्षरशत्रू असू शकते, पण निरीक्षणशत्रू असण्याची गरज नसते. माणसाला प्रत्येक गोष्ट माहीत असणे शक्य नाही आणि हे स्वाभाविक आहे; पण एकदा गोष्ट समजावून सांगितल्यानंतरही ती लक्षात ठेवण्याची इच्छा नसणं, हा वेगळाच विषय आहे.

    हेही वाचा – कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    मानसशास्त्रज्ञ याला ‘Cognitive Laziness’ म्हणजे मानसिक आळस म्हणतात. मेंदूची एक सवय असते. नवीन गोष्ट शिकण्यापेक्षा जुन्या सवयीनुसार पुन्हा पुन्हा तेच करणं… ते सोपं वाटतं म्हणूनच अनेक जण दररोज त्याच चुका करत राहतात. त्या चुका सुधारण्यासाठी थोडं लक्ष, थोडा विचार आणि थोडी जबाबदारी घ्यावी लागते…

    रस्त्यावर ‘इथे कचरा टाकू नये’ असा फलक असतो. त्याच्या खाली कचर्‍याचा ढीग पडलेला असतो. रेल्वे फाटक बंद असताना लोक फाटकाखालून घुसतात. वाहतुकीचा लाल सिग्नल असतानाही काही जण पुढं सरकतात… मोबाइलवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नका, असे शंभरदा ऐकूनही लोक फसतात…

    कारण समस्या माहितीच्या अभावाची नसते; समस्या माहितीचा वापर करण्याच्या अनिच्छेची असते.

    हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण येतो… डॉक्टर औषधं देतात, आहार सांगतात, तपासण्या सांगतात… दोन महिन्यांनी तोच रुग्ण परत येतो…

    “सगळी औषधं घेतली का?”

    “पूर्ण नाही…”

    “पथ्य पाळलं का?”

    “थोडंफार…”

    “तपासण्या केल्या का?”

    “नाही.”

    मग पुढचं वाक्य मात्र तयार असते…

    “डॉक्टरकडून काहीच फरक पडला नाही.”

    हे अगदी त्या दरवाज्यासारखंय. दरवाजा ओढायचा होता, पण आपण ढकलत राहिलो आणि मग दरवाज्यालाच दोष दिला… मानवाची एक अद्भुत क्षमता आहे, यशाचं श्रेय स्वतःकडं घेणं आणि अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणं…

    परीक्षेत चांगले गुण मिळाले तर “मी हुशार”; मार्क कमी आले तर “पेपरच अवघड होता…”

    व्यवसाय चालला तर “माझे कष्ट”; व्यवसाय बुडाला तर ‘नशीब खराब…’

    आरोग्य चांगलं राहिले तर “मी फिट”; आजार वाढला तर “डॉक्टर वाईट”!

    हेही वाचा – जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    स्वतःची भूमिका तपासण्याऐवजी बाहेर दोष शोधणं मेंदूला अधिक सोपं वाटतं… जगात असंख्य निरक्षर लोक आहेत, पण ते सर्वच बुद्धिहीन नसतात. अनेक अशिक्षित शेतकरी हवामानाचा अंदाज सांगतात. कारागीर मोजमाप अचूक करतात. व्यापारी हिशोब लक्षात ठेवतात… अक्षरं वाचता न येणं आणि परिस्थिती समजून न घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहे.

    केबिनचा दरवाजा एक गोष्ट शिकवतो, जीवनात अनेक दरवाजे असे असतात, जे ओढल्यावर उघडतात… पण आपण हट्टानं त्यांना ढकलत राहतो. मग दरवाजा चुकीचा आहे, व्यवस्था चुकीची आहे, डॉक्टर चुकीचे आहेत, नशीब चुकीचं आहे… असं म्हणत राहतो; पण कधी कधी प्रश्न इतकाच असतो, दरवाजा चुकीचा नसतो, फक्त आपण चुकीच्या दिशेनं जोर लावत असतो आणि तोपर्यंत कोणताही दरवाजा उघडत नाही, जोपर्यंत आपण स्वतःला एक साधा प्रश्न विचारत नाही, “मी फक्त दरवाजा ढकलतोय की, एकदा ओढूनही पाहिलाय?”

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन

    October 11, 2026 आरोग्य

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026 आरोग्य

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन

    By डॉ. शैलेंद्र वैशंपायनOctober 11, 2026

    होमिओपॅथीबद्दल बोलण्यासाठी आपण ज्या काळामध्ये होमिओपॅथीची निर्मिती झाली, तो काळ आधी समजून घेतला पाहिजे. कारण,…

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    विज्ञानाला नाकारण्याची मानवी प्रवृत्ती

    October 8, 2026

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026

    दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?

    October 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं

    October 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑक्टोबर 2026

    October 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 471
    • अवांतर 217
    • आरोग्य 159
    • पंचांग आणि भविष्य 630
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 32
    • ललित 994
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.