Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतील फक्त कांदा-पोह्यासारखे नसते, तर ते कढईतील थालिपीठासारखे सुद्धा असू शकते… असा विचार कढईत थालिपीठ थापताना माझ्या मनात आला. कारण, कोंड्याचा मांडा करण्याची आपल्या आई, आजीची ही कला घरातीलचं मोजके सामान वापरुन कुटुंबातील प्रत्येक माणसाचे मन जपायला शिकवते. कढईतील थालिपीठ हा असाचं एक जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. कढईतले कांदे-पोहे जसे त्यातील तिखट, मीठाच्या चवीनुसार चांगले का वाईट ठरतात, तसेच हे कढईतले थालिपीठ त्याच्यातील पिठाच्या आणि मसाल्यांच्या मिश्रणावर तसेच खमंगपणावर आपली चविष्ट गुणवत्ता राखतात, असं मला वाटतं. माझी आजी, आई आणि सासूबाई देखील कढईतील थालिपीठ खूपच छान करायच्या. अर्थात, घरातील उरलेल्या अन्नाचा वापर करून असे चवदार पदार्थ तयार करण्यात…
शारदीय नवरात्री हा भारतीय संस्कृतीतील अतिशय पवित्र, उर्जादायी आणि आनंदाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून (घटस्थापनेपासून) नवमीपर्यंत चालणारा हा नऊ दिवसांचा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून तो सृष्टी, ऊर्जा आणि चैतन्याचा महोत्सव आहे. शारदीय नवरात्रीचे महत्त्व खालील प्रमुख पैलूंमधून स्पष्ट होते. हा काळ साक्षात आदिशक्तीच्या नऊ रूपांची (शैलपुत्री ते सिद्धिदात्री) आराधना करण्याचा असतो. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा करून जीवनात धैर्य, बुद्धी, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते. हे नऊ दिवस म्हणजे असुरी प्रवृत्तीवर दैवी शक्तीचा विजय प्राप्त करण्याचे दिवस! विजयादशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला आणि रामाने रावणाचा संहार केला. या आख्यायिकांवरून या सणांचा…
मला बाय रोड प्रवास करायला खूप आवडतं! कारने प्रवास करताना एखाद्या ढाब्यावर जेवण करणे म्हणजे पर्वणी असते. या धाब्यांवर खरपूस अशी तंदूर रोटी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि त्यासोबत कधी झणझणीत शेव भाजी, मसाला वांगी, भरीत, दाल तडका, तर कधी डाळ पालक, डाळ मेथी असल्या भाज्या मिळाल्या तर दुसरं काय हवं? या ढाब्यांवर फक्त स्वच्छता आणि तिथे मिळणारे पदार्थ थोडे तपासून घ्यावे लागतात! ढाब्यांवर मिळणाऱ्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये माझी आवडती लसुणी पालक ही एक भाजी आहे! ज्वारीची, बाजरीची भाकरी, तंदूर रोटी, तवा रोटी कशाही सोबत ही भाजी छान लागते, सोबतीला दाल तडका, जिरा राईस आणि कांदा-लिंबू असले की झाले… मग कशाचीच…
विदर्भ हा त्याच्या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आणि परंपरांमुळे विशेष नावाजलेला प्रांत आहे. या भागातील जिल्ह्यांमध्ये प्रदेश रचनेनुसार लोकप्रथा आणि त्यांच्या कलासंस्कृती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजऱ्या केल्या जातात. नागपूरमधील पोळ्याच्या दिवशी काळी/ पिवळी मारबत आणि बडग्यांची मिरवणूक ही जशी एक विशेष परंपरा आहे, त्याचप्रमाणे ‘हाडपक्या गणपती’ ही सुद्धा विदर्भातील एक निराळी प्रथा आहे. 2026 हे या मस्कऱ्या किंवा हाडपक्या गणपतीचे 239वे वर्ष असे आयोजकांकडून सांगण्यात आले. 27 सप्टेंबरला या गणरायाचे नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत आगमन झाले आहे. नागपुरातील सीनियर भोसले वाड्यात भाद्रपदातील गणपतीच्या अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर हाडपक्या गणपतीची स्थापना होते. पितृपक्षात सर्व धार्मिक कार्य, उत्सव बहुतेक निषिद्ध असतात; परंतु नागपुरात/ विदर्भात…
मी दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट वाचली या विषयावर. छानच पोस्ट होती… पण आई-वडील गेले की, माहेरपण संपतं हे काही माझ्या मनाला पटेना. मान्य आहे की, आई-वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही; पण त्याचा अर्थ माहेरपण संपलं, असा नाही होऊ शकत. लहानपणापासून ज्या घरात आपण राहिलो, ज्या भावंडांशी खेळलो, भांडलो, एकमेकांशी घरातील सुखं-दुःख वाटून घेतली, एकमेकांच्या यश-अपयशात सहभागी झालो… ते घर, ती माणसं आई-वडील नसतील, तर एकाएकी परकी कशी होतील? खरं पाहिले तर, लग्न होऊन सासरी गेलेल्या सर्वच स्त्रिया आपले माहेर, माणसं सोडून परक्या घरी येऊन त्या घराला घरपण देतात. तिथल्या माणसांमध्ये दुधातील साखरेप्रमाणे मिसळून जातात, मग आई-वडील नसले तर, आपलेच…
‘टुट्टुमियाच्या शेंगा’! नाव चमत्कारीक वाटलं ना ऐकून? टुट्टुमिया म्हटल्यावर अस वाटत की, ते एखाद्या व्यक्तीचे नाव असावे. परंतु हे आहे गडचिरोली, चंद्रपूरच्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या एका झाडाचे नाव; ज्याला या शेंगा लागतात. ॲागस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या शेंगा बाजारात मिळतात. चंद्रपूर/ गडचिरोलीच्या खेड्यापाड्यांमध्ये तर घराच्या अंगणात, शेतामध्ये किंवा जंगलात कुठेही मिळतात. आम्ही अहेरी (गडचिरोली जिल्हा) येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असताना तेथील आठवडी बाजारात या शेंगा पहावयास मिळाल्या होत्या. त्यानंतर अलीकडेच मला या शेंगांचा फोटो थोर समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या फेसबुक वॅालवर पहायला मिळाला. असो! तर सांगायचा मुद्दा हा आहे की, अहेरीला आमच्या शेजारी महाराष्ट्र बँकेतील मॅनेजर सहकुटुंब रहायला होते. त्यांच्या…
माझ्या घराच्या (फ्लॅटच्या) टेरेससमोर कदंब वृक्ष आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, कदंबाचे झाड बहरून येते. थोडी आंब्याच्या पानांसारखी, पण आकाराने जरा मोठी असलेली याची हिरवीकंच पाने झाडाची फांदी न फांदी व्यापून टाकतात. या झाडाचे नाव आतापर्यंत फक्त कथा, कादंबऱ्यांमध्ये वाचण्यात आले होते किंवा श्रीकृष्णाच्या कालियामर्दनाच्या गोष्टीत या झाडाचा उल्लेख येतो. तितकीच काय ती या झाडाची माहिती! जंगल सफारी करतानाही अनेकदा हा वृक्ष नजरेस पडला असेल; परंतु जंगल भटकायचे म्हटले तर, वाघाच्या मागावर जावे लागते आणि तेही भर उन्हाळ्यात. कदंब वृक्ष पाऊस पडल्यानंतरच बहरतो. त्यामुळे जंगलात फिरताना हे झाड दिसतही असेल, परंतु त्या वेळेस या झाडाला बहर नसल्यामुळे तेथील या…
अथांग, गूढ, तरीही मनाच्या सर्वात जवळचा… ज्याला समजणे जितके कठीण, तितकाच तो भावनेने हाक मारताच धावून येणारा! श्रीकृष्णाच्या याच विरोधाभासी पण लोभस व्यक्तिमत्त्वावर आणि ‘कृष्णार्पणमस्तु’ या भावनेवर मांडलेला हा एक विचारप्रपंच… ॐ नमो भगवते वासुदेवाय! श्रीकृष्ण… भारतवर्षाला लाभलेले एक दैवी दिव्यास्त्र! लोभस रूप असलेले बालपण, मोहक हास्य असलेले तरुणपण आणि अचाट बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्त्व. कोणाचा आराध्य देव, कोणाचा सखा, तर कोणाचा प्रियकर! संपूर्ण मानवजात आपापल्या पसंतीनुसार स्वतःला त्याच्या बंधनात अडकवून ठेवू पाहते. विशेष म्हणजे, प्रत्येकाला असेच वाटते की, आपणच त्याच्या सर्वात जवळचे आहोत, त्याचे फक्त आपल्याकडेच लक्ष आहे. असा हा विलक्षण देव – होय, देवच! मला रामही आवडतो, पण कृष्ण…
गोकुळातल्या नंद आणि यशोदामातेकडे वाढणारे वासूदेव-देवकीचे बाळ, श्रीकृष्ण आपल्या लीलांनी सर्वांचे मन मोहून घेत होते. यशोदेला तर ते बाळ मिळताच आभाळ ठेंगणे झाले. त्याच्या वाढत्या वयासोबत त्या बाळाचे कोडकौतुक करता करता तिला दिवस पुरेनासा झाला. दही, दूध, लोणी तर त्याचे अत्यंत प्रिय पदार्थ त्यासोबत विविध प्रकारचे पोह्यांचे प्रकार, शिरा, सातू, रवा-बेसनाचे लाडू हेपण त्याला प्रियच! या गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थही त्याच्या आवडीचेच! कधीतरी एखाद्या गोपगोपिकेच्या घरी त्याचे असले चमचमीत पदार्थ खाणे होतच असे, घनुले हा तसाच प्रकार! बालगोपाळांना तो आवडतो म्हणून कणकेपासून केला जाणारा आणि चविष्ट असा प्रकार त्या काळात केला जात असावा, असं मला वाटत. आमच्या विदर्भात हे तिखट,…
माझं माहेर विदर्भातील अकोला! अकोल्याला स्वतःचा एक वेगळा असा खाद्यसंस्कृतीचा वारसा आहे. स्त्री वयाने कितीही मोठी झाली तरी, माहेरच्या आठवणी तिच्या कायम स्मरणात असतात, त्याला मीदेखील अपवाद नाही. आमच्या अकोल्याला भाज्या खूपच छान मिळतात. पालक, मेथी, आंबटचुका अशा ताज्या हिरव्या पालेभाज्यांच्या जुड्या पाहिल्या की, माणूस मोहात पडणारच ना? रसरशीत लालचुटुक टोमॅटो, काटेरी गुलाबीसर वांगी, हिरवी आणि जांभळी वांगी, भरताची मोठी पण मऊ-लुसलुशीत ठसठशीत वांगी, कोवळी-लुसलुशीत घोसाळी (ज्याला आम्ही गिलके म्हणतो), शिरी दोडके, पांढरेशुभ्र आणि हिरवीगार पाने असलेले कोवळे मुळे, तांबडा भोपळा (काशीफळ), वाल, चवळी, गवारीच्या कोवळ्या हिरव्या शेंगा… इतक्या ताज्या भाज्या पाहून मला काय घ्यावं अन् काय नको असं होतं.…

