Author: माधवी जोशी माहुलकर

Avatar photo

एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकात्यामध्ये एका झालमुरीच्या दुकानाजवळ आपला ताफा थांबवून तेथील स्थानिक दुकानातील भेळीचा म्हणजेच तेथील झालमुरीचा आस्वाद घेतला, या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले… या भेळीमध्ये वेगळेपण असं काय आहे, त्याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. भेळ… नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं! दिसायला अगदी साधा, खिशाला परवडणारा, चवीलाही तितकाच लाजवाब असलेला हा पदार्थ. श्रीमंतांच्या पार्ट्यांपासून ते गरिबांच्या झोपडीपर्यंत… शाळेच्या बाहेरचे आजीचे दुकान ते ऑफिसच्या कट्ट्यापर्यंत भेळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. सर्व आबालवृद्धांना आवडणारा पदार्थ म्हणजे भेळ! या साध्याशा वाटणाऱ्या भेळीचा इतिहास आणि भूगोल दोन्ही तितकेच रंजक आहेत. मुंबईला भेळीचे ‘माहेरघर’ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भेळीचा खरा उगम आणि…

Read More

नागपूरसारख्या कडक उन्हात कैरीचे ‘उन्हातले लोणचे’ (Sun-dried Pickle) घालणे म्हणजे एक उत्तम प्रयोग असतो! या लोणच्यात कैरीच्या फोडी नैसर्गिकरीत्या उन्हात मुरवल्या जातात, त्यामुळे ते लोणचे वर्षभर टिकते आणि त्याची चवही अधिक खुलते. या लोणच्याकरिता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कैऱ्यांची निवड करणे आहे. दोन किलो कैरीसाठी ही ‘पारंपारिक उन्हातल्या लोणच्याची’ कृती खालीलप्रमाणे आहे. कडक आणि करकरीत तसेच आंबट गावरान कैऱ्या घ्या. कैऱ्या स्वच्छ धुवून, कोरड्या कपड्याने पुसून घ्या. मग त्यांच्या फोडी करून घ्या. (कोय नको असेल तर काढून टाका. मी तर यांच्या कोवळ्या कोयीपण लोणच्यात टाकते म्हणजे लोणचं खाताना मिठात मुरलेल्या कोयींची चव अफलातून लागते.) या फोडींना हळद आणि मीठ लावून…

Read More

माझे माहेर आणि सासर हे दोन्ही विदर्भातील अकोल्याचे. आमचे शालेय आणि महविद्यालयीन शिक्षण सर्व अकोल्यातून झाले. त्या काळात जीवाची चैन करणे हे सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे नव्हते. माझे वडील भिकमचंद खंडेलवाल या त्यावेळच्या नावाजलेल्या शाळेत शिक्षक होते, त्यामुळे घरी शिस्तीचे वातावरण असल्याने सिनेमा पाहणे, बाहेर जाऊन भेळपुरी, पाणीपुरी खाणे असले प्रकार नव्हते. त्याकरिता आठ-आठ दिवस आधीपासून वडिलांची परमिशन कशी काढायची आणि कोणी काढायची, हा मोठा प्रश्न असे. अगदीच ते काही ‘नाही’ म्हणायचे नाहीत, परंतु ही परवानगी आम्हाला दोन तीन महिन्यांतून एकदा मिळत असे. बरं, ते स्वतः चोखंदळ असल्याने बऱ्याच वेळेस तेच स्वतः घरी आईला विविध पदार्थ करायला लावत असत. सगळ्यांच्याच…

Read More

सन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून भारताने जाहीर केलं, कारण आपल्या कैक पिढ्या याच भरडधान्यावर पोसल्या गेल्या आहेत. भारतात जवळपास सर्वचं राज्यात वेगवेगळ्या प्रकारची भरडधान्य ऋतुमानानुसार आहारात समाविष्ट होत असतात. महाराष्ट्रात तर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये यांचा रोजच वापर केला जातो. माझ्या घरी मिलेट्स मी मागील पाच वर्षांपासून वापरते आहे. त्यामध्ये फॅाक्सटेल मिलेट्स, लिटील मिलेट्स, बार्नयार्ड मिलेट्स, कोदो मिलेट्स यांचा समावेश आहे. याशिवाय, बाजरी, ज्वारी, भगर, नाचणी, नागली यासारखे मिलेट्स तर आपण नेहमीच वापरत आलेले आहोत. त्यातीलच बाजरी (ज्याला पर्ल मिलेट्स असं म्हणतात) हिरवी मुगाची डाळ किंवा अख्खे मूग, आणि तांदुळ यांचे डोसे आणि इडल्यांची रेसिपी सांगणार…

Read More

नुकताच एक लेख वाचनात आला, ज्यामध्ये स्वयंपाकघर, स्त्री-पुरुषांमधील कामाची विभागणी आणि पुरुषांचा घरकामातील सहभाग यावर भाष्य केलं होतं. तो लेख वाचताना असं जाणवलं की, आपण आजकाल प्रत्येक विषयाकडे ठराविक चौकटीतून पाहू लागलो आहोत. पण या वादात ‘सहजीवन’ हा जो मूळ गाभा आहे, तो कुठेतरी हरवत चालला आहे. कोणत्याही नात्याचा विचार हा एकांगी करून चालत नाही, तर त्यातील परस्पर सामंजस्य समजून घेणं महत्त्वाचं असतं. बदलत्या काळातील आव्हाने पेलताना आज नवरा आणि बायको दोघांचीही ओढाताण होताना दिसते. आजच्या काळात सहजीवन पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त कठीण झालं आहे. वाढत्या महागाईमुळे पती-पत्नी दोघांनाही नोकरी करणं अनिवार्य झालं आहे. ‘न्यूक्लिअर फॅमिली’च्या संस्कृतीमुळे घरात वडिलधाऱ्यांचा आधार उरलेला…

Read More

‘खवय्येगिरी’ आणि ‘महाराष्ट्र’ हे समीकरण मांडताना पुरणपोळी, मिसळ किंवा वडापाव जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच महत्त्वाचे स्थान आहे, ते ‘भडंग’चे! प्रवासात सोबतीला असणारा, चहाच्या वेळेचा गप्पांचा फड रंगवणारा आणि जिभेवर रेंगाळणारी चव देणारा हा पदार्थ आहे. भडंगचा उगम प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील ‘जयसिंगपूर’ आणि कोल्हापूर परिसरात झाला असे मानले जाते. या भागातील हवामान आणि तिथल्या लोकांची तिखट-झणझणीत खाण्याची आवड यातूनच या चिवड्याचा जन्म झाला असावा. ‘भडंग’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘प्रचंड’ किंवा ‘मोठ्या प्रमाणात’ असा होतो. कदाचित, जुन्या काळी हा चिवडा मोठ्या प्रमाणावर एकत्र बनवला जात असे, म्हणून त्याला हे नाव पडले असावे. इतर चिवड्यांमध्ये लसणाचा वापर ऐच्छिक असतो, परंतु भडंगची खरी…

Read More

उन्हाळ्यात अंगाची काहिली करणारा उष्मा सहन करावा लागत असला तरी, या ऋतुची वाट पाहण्यासारखी जर काही एक गोष्ट असेल, तर ती म्हणजे ‘आंबा’!  कच्चा आणि पिकलेला, या दोन्ही आंब्यांची माझ्या घरात खूप आतुरतेने वाट पाहिली जाते. बाजारात सर्वात आधी येतो तो म्हणजे कच्चा आंबा म्हणजेच कैरी. कैरीचा मंद सुगंध आणि जिभेवर रेंगाळणारी तिची आंबट-गोड चव. कैरी म्हणजे केवळ एक फळ नाही, तर ती आपल्या भारतीय संस्कृतीतील ऋतुचक्राची एक महत्त्वाची खूण आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात कैरीचे पन्हे, तक्कू किंवा आंबे डाळ बनवून उन्हाळ्याचे स्वागत केले जाते. यापासून चटण्या, लोणची, सरबते तयार केली जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, कैरीचा हा प्रवास…

Read More

होळी झाली की, वातावरणामध्ये बदल होतो. दिवसाचे तापमान हळूहळू वाढायला सुरुवात होते. मार्चअखेर त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली असते. वातावरणातील बदलासारखेच निसर्गामध्ये वसंतोत्सवाची तयारी दिसायला लागते. पळस, पांगीरा, बहावा, गुलमोहर, बोगनवेलीया, करंज, काटेसावर आपापले देखणे रंग लेवून आपल्या हृदयात वसंत फुलवतात…  “हृदयी वसंत फुलतांना प्रेमास रंग यावे…” असे तर स्वतःशीच म्हणत नसतील ना? कारण झाडांना भावना असतात, असं लहानपणापासून ऐकिवात आहे,  ते काही असू दे पण निसर्ग मात्र आपल्या मुक्त हस्ताने रंगांची उधळण, या उत्सवात करत असतो, हे मात्र खरे आहे. प्रत्येक ऋतुमध्ये निसर्ग आपल्या मनमोहक अदाकारीने मानवाला भुरळ पाडतो. निसर्गातील हे ऋतुचक्र एकमेकांच्या हातात हात घालून अनादी काळापासून असेच सुरू…

Read More

दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नसून, मानवी संस्कृतीतील ज्ञानाचा वारसा जपणाऱ्या लेखकांचा सन्मान करण्याचा आणि वाचन संस्कृती वाढविण्याचा एक सुंदर सोहळा आहे. पुस्तके… आपले मूक मित्र धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेकदा शांतता शोधत असतो. पुस्तक हे अशा वेळी एक उत्तम सोबती ठरते. पुस्तकाच्या पानांत दडलेले शब्द आपल्याला कधी इतिहासाच्या सफरीवर नेतात, तर कधी भविष्यातील विज्ञानाची स्वप्ने दाखवतात. जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, तेव्हा आपण केवळ अक्षरे वाचत नसून एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतो. ‘वाचाल तर वाचाल’ – हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश…

Read More

पूर्वीच्या काळात म्हणजे साधारणपणे 1960 ते 1990च्या काळात लग्नसमारंभांमध्ये पंगतीला वरण भात, मसालेभात,  पातळ भाजी, एखादी सुकी भाजी, चटण्या, कोशिंबीरी, कढी किंवा मठ्ठा, पापड-कुरड्या (अख्खे नाही बरं, एकत्र चुरा केलेल्या), गोडाला बुंदीचा लाडू किंवा जिलेबी असा मेन्यू ठरलेला असायचा. त्यामध्ये आचारी सांगेल तसंच व्हायचं. यामध्ये कुठलाही बदल दिसायचा नाही. परंतु आधुनिक जीवनशैली लोक अनुसरत गेले आणि या लग्नातील पंगतींच्या गंमतीजमती मागे पडून सोफेस्टिकेटेड बुफे पद्धत अगदी शहरांपासून ते खेडेगावांपर्यंत अवलंबिली जाऊ लागली. पंगतीला बसायलाही लोक आजकाल गावठीपणा समजतात. यामध्ये मसालेभात अर्थात तोंडलीभाताला विशेष महत्त्व होते. कधी कधी याची जागा बटाटा घ्यायचा. हळूहळू यामध्ये फुलकोबी आणि मटारने आपले विशेष स्थान निर्माण…

Read More