Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
आज सरगुंडे हा विदर्भातील उन्हाळ्यात तयार करण्यात येणारा पदार्थ आठवण्याचे कारण म्हणजे लग्नानंतर दुसऱ्यांदा हा पदार्थ माझ्या खाण्यात आला. मला हा पदार्थ खायला कधीच जमले नाही. एकतर नवीन सुनबाई म्हणून सासरी वावरताना रोज काहीतरी नवीन प्रश्नांना सामोरे जावे लागायचे. खरंच, लग्नानंतर सासरी गेल्यावर तिथे नवीन लोकांशी आणि नवीन वातावरणात बाईच्या जातीला कितीतरी गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात नाही का? विदर्भात सरगुंडे हे प्रामुख्याने आंब्याच्या रसासोबत खाल्ले जातात. उन्हाळ्यात पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या पाहुणचारामध्ये या आमरस आणि सरगुंड्यांचा बेत हमखास असतो. तर, त्याच झाल असं की, माझे लग्न झाल्यावर माझ्या सासुबाईंच्या एका मैत्रिणीकडे आम्हा सर्वांना जेवायला बोलावले. ज्यांनी जेवायला बोलावले होते त्या मावशी…
पोह्यांचा इतिहास पाहिला, तर हा पदार्थ महत्त्वाचा आणि पवित्र ठरवण्यामागे थेट द्वापारयुगातील ‘कृष्ण-सुदामा’ भेटीचा फार मोठा वाटा आहे! जेव्हा अत्यंत गरीब सुदामा आपले परममित्र द्वारकेचे राजे श्रीकृष्ण यांना भेटायला निघाले, तेव्हा आपल्या मित्राला रिकाम्या हाताने कसे भेटावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. सुदामाच्या पत्नीने घरात असलेले मूठभर पोहे एका जुन्या कापडाच्या पुरचुंडीत बांधून दिले. द्वारकेच्या भव्य महालात सुवर्णपात्रात 56 भोग घेणाऱ्या श्रीकृष्णाने सुदामाची ती गरिबीची पुरचुंडी आनंदाने हिसकावून घेतली आणि अत्यंत आवडीने ते कच्चे पोहे खाल्ले. देवाला सोन्या-चांदीच्या ताटातील ऐश्वर्यापेक्षा भक्ताने प्रेमाने दिलेले ‘पोहे’ जास्त प्रिय वाटले. आयुर्वेदात आणि प्राचीन ग्रंथांमध्ये पोह्यांचा उल्लेख ‘पृथुक’ असा केला आहे. प्रवासात टिकणारा, पचायला हलका…
‘लबाड वांगे’ ऐकून हसायला आले ना? परंतु हीच खरी या भाजीची मेख आहे. विदर्भात आमरसाचा बेत असला की, पाटवडीची भाजी, भरली वांगी, शेव टमाटर भाजी, गोळा आमटी, मूग वड्यांची भाजी किंवा लबाड वांग्याची तर्रीदार भाजी आवर्जून केली जाते. गोड रसाच्या भरपेट जेवणाचा सुबक तोल सांभाळण्यासाठी या भाज्या अगदी उत्तम पर्याय आहेत. सोबतीला मऊ लुसलुशीत पोळ्या किंवा गरमागरम पुऱ्या असतील, तर मग जेवणाची रंगत काही वेगळीच! आमरस आणि अशा मसाल्याच्या भाज्या आणि अशा सुग्रास बेताचा विचार एकदम पारंपरिक आणि भारी आहे. विदर्भातील स्वयंपाकाचा आणि पारंपरिक सुगरणपणाचा हा एक अप्रतिम नमुना आहे. एरवी देखील भाजी नसेल तर ही फसवी वांगी किंवा लबाड…
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ‘धो-धो’ सुरुवात होते, पण आमच्या विदर्भात मात्र पावसाचे आगमन जरा उशिरानेच होते. सध्या आकाशातील ढग हुलकावणी देऊन, वाकुल्या दाखवून पळून जात आहेत आणि उकाड्याने सगळेच त्रस्त आहेत. पण या वातावरणातही निसर्ग आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो, ती म्हणजे ‘संयम’! मान्सूनपूर्व पावसामुळे आमच्या विदर्भातील ताडोबा, पेंच, मेळघाट आणि टिपेश्वर यासारखी घनदाट जंगले अबोलपणे हिरवाईची चादर ओढू लागली आहेत. त्या थोड्याशा पावसाने जंगलातील पशू-पक्षी आणि प्राण्यांच्या जिवाला सुखावणारा गारवा मिळतो. पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात वाघ किंवा रानगवे आनंदाने लोळताना, चिखलाने स्वतःचे अंग बरबटवून घेताना आणि हरणे उड्या मारताना, तर पक्षी पाण्यात डुबक्या मारताना पाहणे हा एक…
कढी हा प्रकार बहुतांश भारतीयांचा आवडता प्रकार आहे. ठिकठिकाणी कढी करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. काही लोकांना तुपाच्या फोडणीतील कढी आवडते तर, काहींना तेलाच्या फोडणीतील, काही लोकांना जरा आंबट कढी आवडते तर काहींना गोडसर चवीची, काहींना पातळसर कढी आवडते तर, काहींना घट्टसर, काही लोकांना दह्याची केलेली कढी चालते तर काहींचा आग्रहच असतो की, लोणी काढलेलं ताक असेल तरच कढी करावी नाहीतर नाही! बरं त्याच्या फोडणीत कढीपत्ता, जिरं, जाड मोहरी/ बारीक मोहरी किती आणि कसे वापरायचे तेही प्रमाण त्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडी निवडीनुसार ठरते. फोडणीमध्ये फक्त हिरवी मिरची आणि आलं वापरायचं की लसूणही घालायचा, यावरूनही बरीच काथ्याकूट होते. काहींना कढीपत्ता वगैरे दाताखाली…
रविवारी (01 जून 2026) एक आणखी कर्णमधुर आवाज काळाच्या पडद्याआड गेला. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने मागील शतकातील सदाबहार संगीत युगाचा अंत झाला आहे, असे म्हणावे लागेल. आवाजातील गोडवा आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेले साधर्म्य, यामुळे त्यांना ओळख तर मिळाली आणि त्या प्रस्थापितही झाल्या, पण तरीही त्या काहीशा मागेच राहिल्या. कुणासारखं तरी असणं हे फारसं फलदायी नसतं. कारण, सुमन कल्याणपूर यांचा मूळ आवाज जो लता मंगेशकर यांच्या अत्यंत जवळचा आणि तितकाच सुश्राव्य होता… पण लतादिदी संगीत जगताच्या केंद्रस्थानी विराजमान होत्या. कदाचित, सुमनजींनी जर एखादी वेगळी वाट निवडली असती, तर आशा भोसले आणि गीता दत्त यांच्यासारखे अढळ स्थान त्यांना नक्कीच…
दरवर्षी 30 मे रोजी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ‘जागतिक बटाटा दिवस’ (International Day of the Potato) साजरा केला जातो. आपल्या सर्वांचा लाडका बटाटा हा मूळ भारतीय नाहीये तर, तो युरोपातून पोर्तुगीज आणि डच लोकांनी भारतात आणला. परकीय जातीची ही भाजी भारतीय मातीत अशी काही रुजली की, जशी ती इथेच जन्माला आली! आपल्या देशाचे वैशिष्ट्यच असे आहे की, या भूमीच्या प्रत्येक कणात कोणालाही आपल्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता आहे. कितीतरी परकीय असलेले लोक या मातीच्या प्रेमात पडले आणि ते नंतर त्यांच्या देशात परत गेलेच नाहीत. त्याउलट, त्यांनी आपली संस्कृती येथे रुजवण्याचा प्रयत्न केला. अगदी खानपानापासून पेहरावापर्यंत बदल या मातीत घडले… मग बटाटा त्याला…
गरम चहाच्या घोटासोबत ताज्या बन-मस्का पावाचा आस्वाद देणारे आणि अनोळखी माणसांचे ओळखीत रुपांतर करणारे तसेच गप्पांचा फड जमविण्यासाठी मुंबईकरांचे आवडते ठिकाण म्हणजे ग्रांट रोड येथील ‘बी मेरवान कॅफे’! आता तो बंद झाल असला तरी, अनेकांच्या मनात त्याचा स्मृतीगंध अद्याप कायम आहे. मुंबई हे सातत्याने बदलणारं शहर आहे. इथे रात्रीतून इमारती उभ्या राहतात, जुनं मोडून नवं उभारलं जातं आणि लोक तंत्रज्ञानाच्या वेगासोबत धावत असतात. पण या धावपळीच्या मुंबईत एक अशी जागा होती, जिथे वेळ जणू 100 वर्षांपूर्वीच थांबली होती. ग्रांट रोड रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडे अगदी बाहेर पाऊल टाकताच डाव्या हाताला दिसणारा हा ‘बी मेरवान कॅफे’. जुने लाकडी दरवाजे आणि तिथून येणारा…
दुपारचा दीड वाजत आला होता, आज सुमनला सकाळची धुणं-भांड्यांची काम आटोपून घरी जायला जरा वेळच झाला होता. चार वाजता तिला परत सिन्हा बाईंकडे किटी पार्टी असल्यामुळे कामावर जायचे होते, तिला सध्या काळजी लागली होती ती, घरी एकटा असलेल्या आपल्या पोराची, दीपकची! सुमनचा नवरा रिक्षा चालवायचा, त्यामुळे त्याची घरी येण्याची अशी ठराविक वेळ नव्हती. दीपकचे सगळे काम सुमनलाच करावे लागत असे. दीपक, सुमनचा मुलगा तेवीस, चोवीस वर्षांचा होता. आता एवढ्या मोठ्या मुलाची कसली काळजी करायची? बाब त्याच्या वयाची नव्हती, तो सामान्य मुलांसारखा नसल्यामुळे काळजीची होती. तो वयाने आणि शरीराने जरी वाढला होता तरी, बुद्धीने विकसित नव्हता. तो अॅबनॉर्मल होता. त्याचे मन…
राजस्थानी दाल-बाटी हा केवळ एक पदार्थ नसून तो राजस्थानच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या चविष्ट पदार्थाचा इतिहास थक्क करणारा असून तो प्रामुख्याने युद्धभूमी आणि वाळवंटी हवामानाशी जोडलेला आहे. याची रंजक कथा कशी आहे ते वाचा! दाल-बाटीचा उगम साधारण आठव्या शतकात, मेवाडचे शासक बप्पा रावळ यांच्या काळात झाला, असे मानले जाते. त्या काळी राजपूत योद्धे दीर्घकाळ युद्धावर असायचे. वाळवंटात अन्न शिजवणे आणि ते टिकवून ठेवणे मोठे आव्हान होते. दालबाटी हा युद्धभूमीवरील ‘जुगाड’ आहे, असे म्हटले तर त्यात काही गैर नाही. सैनिक सकाळी युद्धावर जाण्यापूर्वी पिठाचे गोळे करून ते वाळवंटातील तप्त वाळूत पुरून ठेवत असत. दिवसभर रणरणत्या उन्हात आणि…

