Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!
    अवांतर

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMay 30, 2026Updated:May 30, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, जागतिक बटाटा दिन, खाद्यप्रेमींची बटाट्याला पसंती, परदेशी बटाटा भारतात लोकप्रिय, भाज्यांचा राजा बटाटा, गुणकारी बटाटा, सर्व भाज्यांशी एकरूप होणारा बटाटा, उपवास पदार्थांतील बटाटा, फराळी पदार्थ बटाटा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दरवर्षी 30 मे रोजी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ‘जागतिक बटाटा दिवस’ (International Day of the Potato) साजरा केला जातो. आपल्या सर्वांचा लाडका बटाटा हा मूळ भारतीय नाहीये तर, तो युरोपातून पोर्तुगीज आणि डच लोकांनी भारतात आणला. परकीय जातीची ही भाजी भारतीय मातीत अशी काही रुजली की, जशी ती इथेच जन्माला आली! आपल्या देशाचे वैशिष्ट्यच असे आहे की, या भूमीच्या प्रत्येक कणात कोणालाही आपल्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता आहे. कितीतरी परकीय असलेले लोक या मातीच्या प्रेमात पडले आणि ते नंतर त्यांच्या देशात परत गेलेच नाहीत. त्याउलट, त्यांनी आपली संस्कृती येथे रुजवण्याचा प्रयत्न केला. अगदी खानपानापासून पेहरावापर्यंत बदल या मातीत घडले… मग बटाटा त्याला अपवाद कसा असेल?

    आपल्या स्वयंपाकघरात अशी कोणती भाजी आहे, जी कोणत्याही दुसऱ्या भाजीसोबत अगदी सहज ‘अ‍ॅडजस्ट’ होते? किंवा अशी कोणती गोष्ट आहे, जी उपवासाच्या थाळीपासून थेट मॅकडोनाल्ड्सच्या फ्रेंच फ्राइजपर्यंत सगळीकडे राज्य करते? उत्तर एकच — आपला लाडका बटाटा! जगभरातील करोडो लोकांचे पोट भरणाऱ्या या किमयागार भाजीचा रंजक प्रवास आणि काही मजेशीर गोष्टी जाणून घेऊया…

    हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!

    बटाटा हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील पेरू (Peru) या देशात, आन्देस पर्वताच्या भागात झाला. तिथे हजारो वर्षांपूर्वीपासून बटाट्याची शेती केली जात होती. सोळाव्या शतकात स्पॅनिश लोकांनी बटाट्याला युरोपमध्ये आणले. सुरुवातीला युरोपात या भाजीकडे संशयाने पाहिले जात असे, कारण तो ‘विषारी वनस्पतीच्या कुटुंबातील’ आहे, असे मानले जात होते. पण हळूहळू त्याच्या पोषणमूल्यांचा तसेच उत्पादनाचा अंदाज आल्यावर तो लोकप्रिय झाला.

    भारतामधील बटाट्याचा इतिहास

    बटाटा हा आज प्रत्येक भारतीयांच्या ताटात असलेली प्रमुख भाजी आहे. ‘भाज्यांचा राजा’ म्हणून त्याला ओळखले जाते, पण त्याचा भारतामधील प्रवास अत्यंत रोचक आहे.

    सुरुवातीला बटाटा गोव्याच्या किनारपट्टीवर आणि नंतर कोंकण भागात लावण्यात आला. गोव्यातील स्थानिक लोकांनी त्याला ‘Batata’ असेच नाव दिले, जे पुढे सर्वत्र रूढ झाले.

    ब्रिटिशकालीन लागवड

    ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर बटाट्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. 18व्या शतकात बंगाल, उत्तर भारत, पुणे आणि महाबळेश्वर परिसरात बटाट्याची लागवड सुरू झाली. ब्रिटिश अधिकारी तसेच सैनिकांसाठी बटाटा स्वस्त आणि पौष्टिक अन्न होता. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन दिले गेले.

    महाबळेश्वर आणि उटी या थंड हवामानाच्या डोंगराळ भागात ब्रिटिशांनी बटाटा लागवडीचे मोठे केंद्र तयार केले.

    भारतीय जेवणात बटाट्याचे स्थान

    सुरुवातीला बटाट्याचा वापर मर्यादित होता, पण कालांतराने तो जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थात वापरला जाऊ लागला. बंगालमध्ये ‘आलू’ हा शब्द प्रचलित झाला आणि ‘आलू-पोस्तो’, ‘आलू-दम’ यासारखे पदार्थ लोकप्रिय झाले.

    महाराष्ट्रात बटाट्याने आतापर्यंत वडा-पाव, मिसळ, पोहे, उपवासातील फराळी पदार्थांत आपली जागा पक्की केली आहे. उत्तर भारतात पराठा, सब्जी, समोसा, टिक्की अशा पदार्थांत तो अविभाज्य घटक ठरला.

    समाज आणि संस्कृतीतील महत्त्व

    उपवासाच्या काळात बटाटा हा ‘फराळी भाजी’ म्हणून स्वीकारला गेला. त्यामुळे धार्मिकदृष्ट्याही त्याला मान्यता मिळाली. स्वस्त बटाट्यामुळे गरीब माणसालाही भरपूर अन्न मिळू लागले. शेतीत बटाट्याच्या लागवडीने शेतकऱ्यांना रोख पैसा मिळू लागला.

    आजचा भारतातील बटाटा

    आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब आणि गुजरात ही राज्ये बटाट्याची प्रमुख उत्पादक आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातही बटाट्याचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

    आज बटाट्याचा वापर फक्त घरगुती स्वयंपाकापुरता मर्यादित नसून चिप्स, फ्रेंच फ्राइज, स्टार्च उद्योग, मद्यनिर्मिती अशा विविध क्षेत्रात होतो. बटाटा हा फक्त आता भाजी नसून भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. परदेशातून आलेला हा पाहुणा आज ‘भारतीय अन्नसंस्कृतीचा अविभाज्य घटक’ झाला आहे.

    बटाटा सर्व भाज्यांमध्ये मिक्स होतो. तसेच, बटाट्यापासून विविध पदार्थ बनवणे देखील सोपे आहे. अगदी फ्रेंच फ्राइजपासून भजीपर्यंत बटाट्याचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात.

    बटाट्याचे मुख्य अन्न म्हणून पौष्टिकमूल्य आणि महत्त्व याविषयी जगभरात जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाबद्दलची माहिती देताना खाद्यसंस्कृती अभ्यासक चिन्मय दामले यांनी एका दैनिकाला मुलाखत देताना बटाट्याचा लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्याशी काय संबंध आहे, याबाबत काही रंजक गोष्ट सांगितल्या आहेत.

    टिळक आणि बटाटा

    पुण्यात चहा प्रकरण झाले होते. चहा पिणाऱ्या लोकांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. नंतर शुक्लपक्ष आणि कृष्णपक्ष असे दोन गट पडले. टिळक हे चहा पिणाऱ्यांच्या बाजूने होते. त्यांनी वर्तमानपत्रातून जे विरोधक होते, त्यांच्याशी वाद घातला. त्यावेळी, त्यांना एक पत्र आले होते. जे ‘केसरी’ वृत्तपत्रात छापलं गेलं होतं. त्यात असे लिहिलं होते की, वेदांमध्ये किंवा पुराणांमध्ये कुठेही चहाचा उल्लेख नसल्याने चहा आपल्याला निषिद्ध आहे. त्यावर टिळकांनी विचारले होतं की, ‘बटाटा’ पुरणांमध्ये किंवा वेदांमध्ये नाही, मग तो तुम्हाला कसा चालतो?

    बटाटा खाण्याबाबात भीती निर्मूलनाचे महत्त्वाचे काम महात्मा फुले यांनी केले आहे. मांजरीजवळ जी जमीन होती, जिथे त्यांनी सर्व पिकं लावली होती. महात्मा फुले दर रविवारी तिथे सर्व शेतकऱ्यांना बोलवायचे. शेतकऱ्यांनी ही सर्व पिके लावण्यास प्रोत्साहन द्यायचे आणि तुम्हाला याचे पैसे मिळतील. तसेच तुमचे या पिकांमुळे पोट भरेल असे सांगायचे. जमलेल्या सर्व शेतकऱ्यांकरिता सावित्री बाई भाकरी घेऊन यायच्या. तेव्हा महात्मा फुले त्यांच्यासमोर तिथे लावलेली प्रत्येक भाजी खाऊन दाखवायचे आणि म्हणायचे बघा मला काहीच झाले नाही. बटाट्याबद्दल शेतकऱ्यांना असलेली भीती महात्मा फुलेंनी अशाच प्रयोगांमधून घालवली.

    हेही वाचा – मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    बटाट्याच्या रोपाबद्दल तथ्ये!

    बटाटे आणि रताळे हे दोन्ही जमिनीखाली वाढणारे कंदमूळ असले तरी, ते एकाच कुळातील नाहीत.

    एक फरक असा आहे की बटाटे हे कंद आहेत, तर रताळी ही रताळ्याच्या झाडाची वाढलेली मुळे आहेत, ज्यांना कंद मूळ म्हणून ओळखले जाते.

    रताळे कॉन्व्होल्व्हॅसी कुळातील असून, त्याच कुळात मॉर्निंग ग्लोरीचीही लागवड केली जाते.

    ‘टोमटाटो’ नावाची एक संकरित वनस्पती अस्तित्वात आहे, जिच्या एकाच झाडावर टोमॅटो आणि बटाटे येतात.

    युनायटेड नेशन्सद्वारे (UN) जागतिक बटाटा दिवस साजरा करण्यामागे एक मोठे कारण आहे. तांदूळ आणि गव्हाच्या खालोखाल बटाटा हे जगातील तिसरे सर्वात महत्त्वाचे पीक आहे. हे पीक कमी पाण्यात आणि कमी जागेत सहज होते. जगातील गरिबी आणि भूकबळी यासारख्या गंभीर समस्यांशी लढण्यासाठी बटाटा हा एक मोठा आणि स्वस्त आधार मानला जातो.

    लग्नाची पंगत असो, शनिवार-रविवारचा बेत असो वा उपवास… बटाटा प्रत्येक भूमिकेत चपखल बसतो. बटाटा केवळ एक भाजी नाही, तर तो जागतिक खाद्यसंस्कृतीचा आणि आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. आजच्या जागतिक बटाटा दिवसाच्या निमित्ताने, आपल्या ताटात येणाऱ्या या छोट्याशा, पण गुणकारी बटाट्याचे आणि तो घाम गाळून पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे मनःपूर्वक आभार!

    जागतिक बटाटा दिवसाच्या सर्व खवय्यांना हार्दिक शुभेच्छा!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026 अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026 अवांतर

    पालक शाळा…. एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम

    May 22, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    By माधवी जोशी माहुलकरJune 7, 2026

    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ‘धो-धो’ सुरुवात होते, पण आमच्या विदर्भात मात्र पावसाचे आगमन जरा…

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    पालक शाळा…. एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम

    May 22, 2026

    शहाण्यांनाही शहाणं करून सोडणारा ‘आनंद’यात्री

    May 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    June 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 326
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 452
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 221
    • मैत्रीण 20
    • ललित 699
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.